2028 ते 2030 पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणार - फडणवीस
महाराष्ट्राच्या विकासाचा आलेख आणि आर्थिक उद्दिष्ट यासंदर्भात आपली दूरदृष्टी सांगताना महाराष्ट्राला लवकरच एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे ध्येय्य असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्याला “व्यावसायिक चुंबक आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे शक्तीस्थान” म्हणून स्थान दिले आहे. मुंबईतील एका इंडस्ट्री इव्हेंटमध्ये बोलताना त्यांनी घोषित केले की, “आम्ही (भाजप सरकार) परत आलो आहोत आणि आम्ही धमाकेदार परतलो आहोत.” फडणवीस यांनी महायुतीला दिलेल्या ऐतिहासिक जनादेशाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानत, भारताच्या आर्थिक विकासात भरीव योगदान देण्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राची भारतातील पहिली ट्रिलियन डॉलरची उप-अर्थव्यवस्था होण्याच्या क्षमतेवर मुख्यमंत्र्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला आहे. राज्याच्या आर्थिक वर्चस्वावर प्रकाश टाकताना फडणवीस यांनी नमूद केले की, आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतातील एकूण थेट विदेशी गुंतवणुकीपैकी (एफडीआय) महाराष्ट्राचा वाटा ५२ टक्के इतका आहे. भाजपच्या अनुपस्थितीत कर्नाटकने महाराष्ट्राला कसे मागे टाकले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. परंतु राज्यात मुंबईच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे महाराष्ट्र अद्वितीय आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले आहे.
महाराष्ट्र सरकारकडून 754 कोटींच्या कामाची ऑर्डर, ‘या’ शेअर्सद्वारे वर्षभरात 400 टक्क्यांचा परतावा!
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले आहे की, स्टार्टअपबद्दल बोलायचे झाले तर, देशातील एकूण स्टार्टअप नोंदणीची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रात सर्वाधिक स्टार्टअप आहेत. महाराष्ट्र पुढे जात आहे आणि जात राहणार… इतर राज्ये आमच्यापेक्षा खूप मागे आहेत. माझा विश्वास आहे की, कोणत्याही परिस्थितीत 2030 पर्यंत आपण ट्रिलियन डॉलर इकोनॉमिक बनवू. आमचा प्रयत्न आहे की, 2028 ते 2030 पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर इकोनॉमी बनवू. त्याचा एक रोडमॅप आम्ही तयार केला आहे. महाराष्ट्र कालही नंबर वन होता आजही नंबर वन आहे आणि भविष्यातही नंबर वन राहणार असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
सलग 16 सत्रात शेअर्सला अप्पर सर्किट; ‘या’ पेन्नी स्टॉकने वर्षभरात दिला 245 टक्के नफा!
नवी मुंबईजवळ “तिसऱ्या मुंबई” विकसित करण्याची घोषणा केली, सध्याच्या शहराच्या तिप्पट आकाराची, भारताची भविष्यातील व्यावसायिक राजधानी म्हणून कल्पना केली आहे. “आम्ही नुकतेच मुंबई ते नवी मुंबई जोडणाऱ्या अटल सेतूचे उद्घाटन केले. हे नवीन क्षेत्र व्यवसायांसाठी अतुलनीय संधी प्रदान करेल,” ते म्हणाले, राज्य गुंतवणुकीचे गुंतवणुकीचे वातावरण निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. असेही ते म्हणाले आहे.
महाराष्ट्राने पहिल्या सहा महिन्यांत आपल्या वार्षिक एफडीआय लक्ष्यापैकी 90 टक्के लक्ष आधीच गाठले असून, विक्रमी वर्षाचा टप्पा निश्चित केला आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यांनी आर्थिक नेता म्हणून राज्याच्या ऐतिहासिक भूमिकेचा पुनरुच्चार केला आणि गुंतवणूकदारांना सतत पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले, “आम्ही व्यवसायांना मदत करण्यासाठी येथे आहोत.” असेही ते शेवटी म्हणाले आहे.