'हा' पेन्नी स्टॉक 5 शेअरवर 3 बोनस देणार, 17 जानेवारी 2025 ही असेल रेकॉर्ड डेट!
पेन्नी स्टॉक फोन 4 कम्युनिकेशन्स (इंडिया) लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिला आहे. मागील काही दिवस या शेअर्सला राेज अप्पर सर्किट लागत आहे. बुधवारी हा शेअर्स 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागून 13.60 रुपयांवर पोहोचला आहे. मागील एका वर्षात शेअर्सने गुंतवणूकदारांना 232 टक्के नफा दिला आहे. एकट्या वर्ष 2024 मध्ये शेअर्सने 245 टक्क्यांची बंपर वाढ नोंदवली आहे. या वर्षातील केवळ पाच महिन्यांत शेअर्सने जबरदस्त परतावा दिला आहे.
शेअर्सचा परतावा
मागील एका वर्षात फोन4 कम्युनिकेशन्सच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 232 टक्के नफा दिला आहे. एकट्या वर्ष 2024 मध्ये शेअर्सने 245 टक्क्यांची बंपर वाढ नोंदवली आहे. या कालावधीत हा शेअर 3.95 रुपयांवरून सध्याच्या किमतीपर्यंत वाढला आहे. या वर्षातील केवळ पाच महिन्यांत शेअर्सने जबरदस्त परतावा दिला आहे. नोव्हेंबरमध्ये 70 टक्क्यांनी वाढल्यानंतर डिसेंबरमध्ये फोन 4 कम्युनिकेशनचा शेअर्स 41 टक्क्यांहून अधिक वाढला. ऑक्टोबरमध्ये 10.3 टक्के आणि सप्टेंबरमध्ये 9.3 टक्के घसरण नाेंदवल्यानंतर ही माेठी वाढ झाली आहे. मात्र, ऑगस्टमध्ये शेअर्समध्ये 70 टक्क्यांची मजबूत वाढ नोंदवली गेली आहे.
(फोटो सौजन्य – istock)
पीएफ खातेधारकांसाठी मोठी बातमी! थेट एटीएममधून काढता येणार पीएफचे पैसे, वाचा… कसे ते?
सतत अप्पर सर्किट
फोन4 कम्युनिकेशन्सचा शेअर्स गेल्या अठरा ट्रेडिंग सत्रांपासून वधारत आहे, यापैकी 16 सत्रांमध्ये शेअर्सने 5 टक्क्यांचे अप्पर सर्किटला गाठले आहे. या कालावधीत शेअरची किंमत 13 नोव्हेंबर रोजी 6.15 रुपयांवरून 13.60 रुपयांच्या सध्याच्या उच्चांकावर पोहोचली. हा वाढ जवळपास 40 टक्के आहे.
विक्रमी उच्चांकाला स्पर्श
फोन4 कम्युनिकेशन्सचा शेअर्स या वर्षी मेमध्ये 10 टक्के, जूनमध्ये 13.5 टक्के आणि जुलैमध्ये 11.2 टक्के घसरला होता. मात्र, एप्रिलमध्ये 26 टक्के आणि जानेवारीमध्ये 48 टक्के वाढ झाली. तर मार्चमध्ये 20.5 टक्के आणि फेब्रुवारीमध्ये 7.4 टक्के घट झाली. फोन4 कम्युनिकेशन्सने 11 डिसेंबर 2024 रोजी 13.60 रुपयांच्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला.
सप्टेंबर तिमाही निकाल
सप्टेंबर तिमाहीत फोन-4 कम्युनिकेशन्सने 1.42 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला होता. तर गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीला 8 लाख रुपयांचा ताेटा झाला हाेता. कंपनीचे एकूण उत्पन्न तिमाहीत 34.27 कोटी इतके घसरले. कंपनीची स्थापना 2014 मध्ये काेची येथे झाली. कंपनी कम्युनिकेशन्स इलेक्ट्रॉनिक रिटेल साखळी म्हणून कार्यरत आहेत. ही कंपनी मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, ॲक्सेसरीज, लॅपटॉप आणि इतर ग्राहक टिकाऊ वस्तू किरकोळ स्टोअर्स आणि fone4.in या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे विकते.