Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Myanmar News : म्यानमारला मोठा दणका; रोहिंग्या मुस्लिमांच्या नरसंहारासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ठरवले जबाबदार

Myanmar News : रोहिंग्या मुस्लिमांच्या नरसंहारप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्यानमारला ऐतिहासिक निकालात जबाबदार ठरवले आहे. २०१७ मधील लष्करी कारवाईसाठी म्यानमारला दोषी धरत न्यायालयाने दोषींवर कारवाई, पीडितांना नुकसानभरपाई आणि निर्वासितांच्या सुरक्षित पुनर्वसनाचे आदेश दिले आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 20, 2026 | 05:27 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • २०१७ मधील लष्करी कारवाईत हजारो रोहिंग्यांचा बळी
  • रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश
  • म्यानमारला निकाल मान्य करावा लागणार; अपीलची संधीही नाही
Myanmar News : रोहिंग्या मुस्लिमांवरील अत्याचारांच्या प्रकरणात म्यानमारला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा धक्का बसला आहे. नेदरलँड्समधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) १९ नोव्हेंबर २०२६ रोजी ऐतिहासिक निकाल देत २०१७ मध्ये रोहिंग्या समुदायाविरोधात झालेल्या लष्करी कारवाईला नरसंहार ठरवले आहे.

१५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने ९ विरुद्ध ६ मतांनी म्यानमारला नरसंहारासाठी जबाबदार धरले. एखाद्या देशाला नरसंहारासाठी जबाबदार ठरवण्याची आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या रोहिंग्या निर्वासितांना मोठा दिलासा मिळाला आहे.

२०१७ मधील लष्करी कारवाईत हजारो रोहिंग्यांचा बळी

म्यानमारच्या रखाइन प्रांतात २०१७ मध्ये लष्कराने रोहिंग्या मुस्लिमांविरोधात मोठी लष्करी मोहीम राबवली होती. या कारवाईदरम्यान हजारो नागरिकांची हत्या, महिलांवर लैंगिक अत्याचार, लहान मुलांवरील हिंसाचार आणि शेकडो गावांची जाळपोळ करण्यात आली होती. या हिंसाचारामुळे सात लाखांहून अधिक रोहिंग्या नागरिकांना आपली घरे सोडून शेजारील बांगलादेशात आश्रय घ्यावा लागला.

या प्रकरणी गांबिया या आफ्रिकन देशाने नोव्हेंबर २०१९ मध्ये म्यानमारविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली होती. रोहिंग्या समुदायाचा नायनाट करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप गांबियाने केला होता. न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे म्यानमारला नरसंहारासाठी जबाबदार ठरवले.

Lahore Air Pollution : जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर पुन्हा लाहोर; AQI 465 वर, नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका

रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश

या ऐतिहासिक निकालात न्यायालयाने म्यानमारला अनेक महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. नरसंहाराशी संबंधित गुन्ह्यांची चौकशी करून संशयित आरोपींवर खटले चालवावेत आणि दोषींना शिक्षा द्यावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

याशिवाय विस्थापित रोहिंग्या नागरिकांना सुरक्षित, स्वेच्छेने आणि सन्मानाने मायदेशी परतण्याची व्यवस्था करावी, तसेच विभक्त झालेल्या कुटुंबांचे पुनर्मिलन घडवून आणावे, असे निर्देश दिले आहेत. पीडितांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची जबाबदारीही म्यानमारवर टाकण्यात आली आहे. नुकसानभरपाईची रक्कम आणि प्रक्रिया निश्चित करण्यासाठी पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

Goldy Brar Most Wanted: गोल्डी बराडला पकडण्यासाठी कॅनडाचे मोठे बक्षीस; माहिती देणाऱ्याला २.५ लाख कॅनेडियन डॉलर मिळणार

म्यानमारला निकाल मान्य करावा लागणार; अपीलची संधीही नाही

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा हा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे. त्यामुळे म्यानमारला या निकालाविरोधात अपील करता येणार नाही. मात्र, न्यायालयाकडे स्वतःची स्वतंत्र अंमलबजावणी यंत्रणा नसल्याने निकालाची प्रत्यक्ष अंमलबजावणी हे मोठे आव्हान ठरणार आहे. म्यानमारने यापूर्वी नरसंहाराचे आरोप फेटाळत लष्करी कारवाई ही दहशतवादविरोधी मोहीम असल्याचे म्हटले होते.

दुसरीकडे, बांगलादेशातील निर्वासित रोहिंग्या नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, केवळ न्यायालयाचा निकाल मिळून चालणार नाही, तर मायदेशी सुरक्षित परतण्याची हमी मिळणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय समुदाय म्यानमारवर निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी किती दबाव आणतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Myanmar rohingya genocide icj verdict cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • Bangladesh News
  • Marathi News
  • Myanmar

संबंधित बातम्या

Satara News : पानटपऱ्यांमधून नशेचा धंदा खपवून घेतला जाणार नाही; पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांचा चालकांना थेट इशारा
1

Satara News : पानटपऱ्यांमधून नशेचा धंदा खपवून घेतला जाणार नाही; पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांचा चालकांना थेट इशारा

Nagpur News : ईडीकडून रेती माफियांची १६ कोटींची मालमत्ता जप्त; नागपूर-भंडाऱ्यात मोठी कारवाई
2

Nagpur News : ईडीकडून रेती माफियांची १६ कोटींची मालमत्ता जप्त; नागपूर-भंडाऱ्यात मोठी कारवाई

Mumbai Railway Demolition: मुंबईत पुन्हा बुलडोजर ॲक्शन! प्रभादेवीत १०० कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर,पाहा photos
3

Mumbai Railway Demolition: मुंबईत पुन्हा बुलडोजर ॲक्शन! प्रभादेवीत १०० कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर,पाहा photos

Jalgaon News: जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत ठिणगी, मेळाव्यातच नेत्यांमध्ये खडाजंगी
4

Jalgaon News: जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत ठिणगी, मेळाव्यातच नेत्यांमध्ये खडाजंगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.