Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti आणि Hondaचा मोठा प्लॅन! जुलै महिन्यात येणार नव्या कारची जबरदस्त रेंज

Maruti: सर्वाधिक चर्चा आहे ती मारुती सुझकीच्या ब्रेझाच्या नव्या अवताराची. कंपनी 24 जुलै रोजी या लोकप्रिय एसयूव्हीचे अपडेटेस मॉडेल बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. बाहेरील लूकमध्ये अनेक बदल करण्यात आले असून गाडीला अधिक आकर्षक आणि स्पोर्टी स्वरुप देण्यात आले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 21, 2026 | 05:21 PM
Maruti and Honda's Big Plan (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Maruti and Honda's Big Plan (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

New Car Launches 2026 : भारतीय वाहन बाजारात जुलै महिना खूपच गजबजलेला ठरला आहे. अनेक कंपन्यानी नवीन मॉडेल्स सादर केल्यानंतर आता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणखी तीन महत्त्वाच्या गाड्या ग्राहकांच्या भेटीला येणार आहेत. या नव्या डिझाइनसोबत आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षिततेची अधिक चांगली साधने आणि सुधारित परफॉर्मन्स यामुळे या गाड्यांकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

लोकप्रिय एसयूव्हीचे अपडेटेस मॉडेल

सर्वाधिक चर्चा आहे ती मारुती सुझकीच्या Maruti ब्रेझाच्या नव्या अवताराची. कंपनी 24 जुलै रोजी या लोकप्रिय एसयूव्हीचे अपडेटेस मॉडेल बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. बाहेरील लूकमध्ये अनेक बदल करण्यात आले असून गाडीला अधिक आकर्षक आणि स्पोर्टी स्वरुप देण्यात आले आहे. पुढील बाजूस, नवीन ग्रिल, बदललेला बंपर आणि ताज्या डिझाइनचे एलईडी दिवे पाहायला मिळू शकतात. मागील बाजूलाही नवीन टेललॅम्प आणि स्टायलिश अलॉय व्हील्समुळे गाडीचा लूक अधिक उठून दिसणार आहे.

ड्रायव्हिंग फीचर्स

आतील भागातही अनेक आधुनिक सुविधा मिळण्याची शक्यता आहे. मोठा टचस्क्रीन डिस्प्ले, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, आरामदायी सीट्स आणि काही व्हेरिएंटमध्ये अतिरिक्त ड्रायव्हिंग फीचर्स देण्याची तयार कंपनीने केली आहे. इंजिनच्या बाबातीतही ग्राहकांना विविध पर्याय मिळू शकतात. पेट्रोल आणि CNGसोबत अधिक ताकदवान टर्बो पेट्रोल पर्यायही उपलब्ध होण्याची चर्चा आहे. किंमतीच्या बाबतीत ही एसयूव्ही मध्यम श्रेणीतील ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकते.

पर्यावरणपूरक आणि इंधनाची बचत

दुसरी मोठी एन्ट्री होंडाच्या ZR-V हायब्रीडची असणार आहे. पर्यावरणपूरक आणि इंधनाची बचत करणाऱ्या वाहनांची मागणी वाढत असल्याने कंपनी ही एसयूव्ही भारतीय बाजारात आणत आहे. ही गाडी मर्यादित संख्येत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. शक्तिशाली हायब्रीड इंजिनमुळे चांगली कामगिरी आणि कमी इंधन खर्च हे या मॉडेलचे मुख्य वैशिष्ट्य मानले जात आहे.

आकर्षणाचा केंद्रबिंदू

फीचर्सच्या बाबतीतही होंडाने कोणतीही तडजोड केलेली नाही. मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, डिजिटल डिस्प्ले, वायरलेस मोबाईल कनेक्टिव्हिटी, प्रीमियम म्युझिक सिस्टम, वायरलेस चार्जिंग आणि आरामदायी क्लायमेट कंट्रोल यांसारख्या सुविधा या गाडीत मिळू शकतात. सुरक्षिततेलाही विशेष महत्त्व देण्यात आले असून अनेक एअरबॅग्ज, 360 अंश कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग आणि प्रगत ड्रायव्हिंग असिस्ट सिस्टम यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही एसयूव्ही प्रीमियम ग्राहकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकते.

नवीन मॉडेलमध्ये बाहेरील डिझाइन

महिन्याच्या शेवटी टोयोटा देखील आपल्या लोकप्रिय हिलक्स पिकअप ट्रकचे नवीन मॉडेल सादर करणार आहे. ऑफ-रोड ड्रायव्हिंगची आवड असणाऱ्या ग्राहकांमध्ये या वाहनाची चांगली ओळख आहे. नवीन मॉडेलमध्ये बाहेरील डिझाइन अधिक आधुनिक करण्यात आले असून फ्रंट लूकमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील. नवीन हेडलॅम्प, रुंद ग्रिल, आकर्षक चाके आणि ताज्या रंगांचे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध होऊ शकतात.

Adani Enterprises निकालांची तारीख जाहीर! शेअरमध्ये येणार मोठा अॅक्शन?

अनेक आधुनिक फीचर्स

केबिनमध्येही तंत्रज्ञानाची भर घालण्यात आली आहे. मोठे डिजिटल डिस्प्ले, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, वायरलेस चार्जिंग, कनेक्टेड कार सुविधा आणि अधिक आरामदायी इंटिरियरमुळे लांबचा प्रवासही सुखकर होईल. सुरक्षेच्या दृष्टीने अनेक आधुनिक फीचर्स देण्यात येणार असून चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर कंपनीने विशेष भर दिला आहे.

Crude Oil Prices Today: तेल बाजारात मोठा यू-टर्न! तेलाच्या किमतींची उसळी अखेर थांबली

इंजिनमध्ये फारसा बदल होणार नसला तरी ताकद, टिकाऊपणा आणि ऑफ-रोड क्षमता कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कठीण रस्त्यांवरही ही गाडी सहज धावू शकेल. चारचाकी ड्राइव्ह प्रणालीमुळे ती साहसी प्रवास करणाऱ्यांसाठी अधिक उपयुक्त ठरेल.

तीन गाड्या बाजारात दाखल

एकूणच पाहता, जुलैचा शेवट भारतीय वाहन बाजारासाठी खूपच खास ठरणार आहे. वेगवेगळ्या किंमत श्रेणीतील आणि विविध गरजा लक्षात घेऊन या तीन गाड्या बाजारात दाखल होत आहेत. शहरातील वापर, लांबचा प्रवास किंवा ऑफ-रोड ड्राइव्ह अशा प्रत्येक प्रकारच्या ग्राहकांसाठी एक ना एक पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नवीन कार खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी येणारे काही दिवस नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत.

Web Title: Maruti and honda new cars launch in july 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • Honda Car
  • Maruti Suzuki
  • New car Launch

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.