Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा… सरकारने दिले 3000 रुपये, हाती पडले 500, 1000 रुपये!

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. राज्य सरकारने महिलांना ३००० रुपये दिले असताना, त्यांच्या हातात प्रत्यक्षात ५०० आणि १००० रुपये पडले असल्याचे समोर आले आहे. बँकांकडून किमान शिल्लक शुल्क, जीएसटी आणि एसएमएस शुल्काच्या नावाखाली ही कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता अनेक लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच पडली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 20, 2024 | 04:45 PM
लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा… सरकारने दिले 3000 रुपये, हाती पडले 500, 1000 रुपये!
Follow Us
Close
Follow Us:

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली. रक्षाबंधनाचे औचित्य साधून, राज्यभरातील पात्र महिलांच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे योजनेचे पैसे जमा देखील झाले. मात्र, आता सरकारने महिलांना ३००० रुपये दिले असताना, त्यांच्या हातात प्रत्यक्षात ५०० आणि १००० रुपये पडले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अनेक लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच पडली आहे.

पुणे साताऱ्यात हजारो महिलांच्या तक्रारी

याबाबत पुणे आणि सातारा जिल्ह्यातून याबाबत हजारो महिलांच्या तक्रारी समोर येत आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या खात्यात योजनेचे पैसै जमा तर झाले, मात्र बँकांनी दंडाच्या नावाखाली अनेक महिलांचे पैसे कापले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना, राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेचा निधी महिलांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे. असे असतानाच बँका या निधीतून मोठ्या प्रमाणात कपात करत असल्याचे अहवाल सांगतात. त्यामुळे अनेक महिलांचा योजनेबाबत भ्रमनिरास झाला आहे.

हेही वाचा – देशात कोण भरते सर्वाधिक टॅक्स, अंबानी की अदानी? धोनी पहिल्या तर अक्षय कुमार दुसऱ्या क्रमांकावर

हाती पडलेत अवघे 500, 1000 रुपये

पुणे जिल्ह्यात हजारो महिलांनी त्यांच्या लाडकी बहिण योजनेचा निधी जमा तर झाला. मात्र, बँकांनी तो किमान शिल्लक शुल्क, जीएसटी आणि एसएमएस शुल्क यांसारखी कारणे देत कापला असल्याचे म्हटले आहे. तर सातारा जिलह्यात देखील याबाबत अनेक महिलांनी बॅंकांकडून पैसे कपात झाल्याचे सांगितले जात आहे. मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली बँकांनी दंड वसूल केल्याने, महिलांच्या हाती अवघे 500 ते 1000 रुपये आले आहेत. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांत महिला आणि बँक कर्मचारी यांच्यात वाद-विवाद झाल्याचे पाहायला मिळाले.

काय म्हटलंय बॅंक अधिकाऱ्यांनी

याबाबत काही महिलांनी बॅंक अधिकाऱ्यांकडे पैसे कपातीची तक्रार केली असताना, संबंधित महिलांच्या खात्यात कमीत कमी जेवढी रक्कम पाहिजे. तितकी रक्कम नसल्याने तुम्हाला दंड लागला व ती रक्कम सिस्टिमने कापली, असे बॅंक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – ‘या’ मराठमोळ्या कंपनीची शेअर बाजारात जोरदार एन्ट्री; पहिल्याच दिवशीच गुंतवणूकदार मालामाल!

बँकांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

दरम्यान, बँकांनी लाडकी बहिण योजनेच्या निधीतून ही शुल्क कपात करणे तात्काळ थांबवावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी केली आहे. ही कपात सुरू राहिल्यास बँकांविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत आदेश देण्याची विनंती केली आहे. याशिवाय काही प्रकरणांमध्ये, बँकांनी महिलेच्या पती किंवा पालकांसोबत असलेल्या संयुक्त खात्यांमध्ये जमा केलेल्या पैशांमधून दंड कपात करणे किंवा कर्ज वसूल करणे सुरू केले आहे. असेही दिसून आले आहे. असेही सावळे म्हणाल्या आहे.

Web Title: Mazi ladki bahin yojana bank cuts 1500 rupees of ladki bahin yojna for minimum balance charges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 04:45 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • pune news
  • Satara News

संबंधित बातम्या

कंत्राटी कामगार चेंबरमध्ये गुदमरले, श्वास कोंडला अन्…; पुण्यातील घटनेनं हळहळ व्यक्त
1

कंत्राटी कामगार चेंबरमध्ये गुदमरले, श्वास कोंडला अन्…; पुण्यातील घटनेनं हळहळ व्यक्त

Pune News: ९ दिवसांच्या बाळाला सोडून २४ वर्षीय महिला बेपत्ता; घरात कुणालाही न सांगता महिला…
2

Pune News: ९ दिवसांच्या बाळाला सोडून २४ वर्षीय महिला बेपत्ता; घरात कुणालाही न सांगता महिला…

पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? कार्यकर्त्यांना थेट सूचना
3

पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? कार्यकर्त्यांना थेट सूचना

Ambedkar National Memorial : पुण्यात भीमसैनिकांचे ठिय्या आंदोलन; आंबेडकर राष्ट्रीय स्मारकांच्या मागणीसाठी आक्रमक
4

Ambedkar National Memorial : पुण्यात भीमसैनिकांचे ठिय्या आंदोलन; आंबेडकर राष्ट्रीय स्मारकांच्या मागणीसाठी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.