Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्ह्यातील 887 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचच प्रशासक; सहा महिन्यांसाठी दिली जबाबदारी

विद्यमान सरपंचांनाच सहा महिन्यांसाठी प्रशासक म्हणून कामकाजाची जबाबदारी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या ग्रामीण विकास विभागाने घेतला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 23, 2026 | 11:50 AM
पुणे जिल्ह्यातील 887 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचच प्रशासक; सहा महिन्यांसाठी दिली जबाबदारी

पुणे जिल्ह्यातील 887 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचच प्रशासक; सहा महिन्यांसाठी दिली जबाबदारी

Follow Us
Follow Us:
  • पुणे जिल्ह्यातील 887 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचच प्रशासक
  • सहा महिन्यांसाठी दिली जबाबदारी
  • आदेशाची तातडीने अंमलबजावणी
पुणे : ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याऐवजी विद्यमान सरपंचांनाच सहा महिन्यांसाठी प्रशासक म्हणून कामकाजाची जबाबदारी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या ग्रामीण विकास विभागाने घेतला आहे. यासंदर्भातील अधिसूचना बुधवारी जारी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील तब्बल ८८७ ग्रामपंचायतींमध्ये मावळत्या सरपंचांना तात्पुरती मुदतवाढ मिळाली आहे.

 

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सदस्य मंडळाची मुदत संपल्यानंतर सरकारी अधिकारी प्रशासक म्हणून नेमण्याचा निर्णय रद्दबातल ठरवला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने धोरणात बदल करत, पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत निवडणुका घेईपर्यंत विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून आणि उपसरपंच व सदस्य मंडळ प्रशासकीय समिती म्हणून कार्यरत राहतील, असे स्पष्ट केले आहे.

यापूर्वी पुणे जिल्ह्यातील १४२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले होते. तसेच, गेल्या महिन्यात आणखी ७२५ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, नव्या अधिसूचनेनुसार ग्रामविस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून करण्यात आलेली नेमणूक रद्द करून कारभार पुन्हा मावळत्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या प्रशासकीय मंडळाकडे सोपविण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय; भव्य ‘अजितसृष्टी’ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

आदेशाची तातडीने अंमलबजावणी

जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आणि पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या निर्देशानुसार संबंधित आदेशांची अंमलबजावणी तातडीने केली जाईल. या निर्णयामुळे निवडणुका होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार लोकप्रतिनिधींकडेच राहणार असल्याने प्रशासनातील सातत्य कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रशासनातील अडचणी टाळण्यासाठी बदल

राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार हा निर्णय सध्या 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठीच लागू राहणार आहे. या कालावधीत प्रशासक आणि प्रशासकीय समिती नेमण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे असतील. राज्यातील मोठ्या संख्येने ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने सर्वत्र बाहेरील प्रशासक नेमणे व्यवहार्य ठरणार नव्हते. पंचायत समित्यांमधील विस्तार अधिकाऱ्यांची मर्यादित संख्या ही देखील मोठी अडचण होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन सरकारने स्थानिक स्तरावरच विद्यमान सरपंच आणि त्यांच्या टीमकडे तात्पुरता कारभार सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनात सातत्य, पारदर्शकता आणि वेग राखला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: In many gram panchayats in pune district the sarpanch will be the administrator

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Maharashtra Goverment
  • pune news

संबंधित बातम्या

Q Sports League Pune: डेक्कन जिमखाना ऐसेस संघाची विजयी सुरुवात! आरसीबीसी ऑल स्टार्सचा ४-१ असा धुव्वा
1

Q Sports League Pune: डेक्कन जिमखाना ऐसेस संघाची विजयी सुरुवात! आरसीबीसी ऑल स्टार्सचा ४-१ असा धुव्वा

रोहन सुरवसे-पाटलांच्या पाठपुराव्याला यश; चंदननगर दुय्यम निबंधक कार्यालयातील कथित गैरप्रकारांची होणार चौकशी
2

रोहन सुरवसे-पाटलांच्या पाठपुराव्याला यश; चंदननगर दुय्यम निबंधक कार्यालयातील कथित गैरप्रकारांची होणार चौकशी

Pune Homes: पुण्यात घर खरेदीदारांची माघार! ३ महिन्यात घटली घरांची मागणी; अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर
3

Pune Homes: पुण्यात घर खरेदीदारांची माघार! ३ महिन्यात घटली घरांची मागणी; अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर

पुण्यात Badminton चा थरार! मानांकन असूनही पराभव; ‘या’ युवा खेळाडूंनी रचला इतिहास
4

पुण्यात Badminton चा थरार! मानांकन असूनही पराभव; ‘या’ युवा खेळाडूंनी रचला इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.