
NCP has clear majority for the post of Pune Zilla Parishad President Pune Political News
Pune Political News : पुणे : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आवश्यक असलेला ३८ या बहुमताचा आकडा गाठण्यासाठी यावेळी कोणत्याही राजकीय (Political News) कसरतीची गरज भासणार नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तब्बल ५१ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत संपादन केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महायुती किंवा अन्य कोणत्याही पक्षाशी युती करण्याची आवश्यकता नसल्याची माहिती पक्षाच्या अंतर्गत सूत्रांकडून समोर येत आहे. (Pune News)
पुणे जिल्हा परिषदेतील एकूण जागांपैकी अध्यक्षपद मिळवण्यासाठी किमान ३८ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. राष्ट्रवादीकडे स्वतःच्या बळावरच ५१ सदस्यांचे भक्कम संख्याबळ असल्याने अध्यक्षपदासह स्थायी समिती आणि विविध विषय समित्यांवरील नियंत्रणही पक्षाकडेच राहणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या निकालामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे एकतर्फी झाल्याचे दिसून येत आहे.
हे देखील वाचा : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; तीन दशकानंतर अजित पवारांशिवाय अधिवेशन
दुसरीकडे भारतीय जनता पार्टीला १० जागांवर समाधान मानावे लागले असून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांना ५ जागा मिळाल्या आहेत. मात्र या दोन्ही पक्षांच्या जागांची एकत्रित बेरीज केली तरी ती बहुमताच्या आकड्यापासून दूरच राहते. त्यामुळे महायुती म्हणून सत्ता स्थापनेची शक्यता धूसर असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेत आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे महायुतीचा प्रयोग करण्याची गरज नाही. पक्ष एकहाती सत्ता स्थापन करेल,अशी भूमिका अंतर्गत बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असली, तरी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्या सल्लामसलतीनंतर जाहीर केला जाईल, असेही सांगण्यात येते.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतच चुरस वाढण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत गटबाजी टाळत एकमुखी निवड करण्याचे आव्हान नेतृत्वासमोर राहणार आहे. स्पष्ट बहुमताच्या जोरावर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
हे देखील वाचा : सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर होता का? अमोल मिटकरी यांचा अजित पवारांच्या अपघाताबाबत खळबळजनक दावा
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात
आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. विधीमंडळाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन अधिवेशनाचा शुभारंभ झाला. त्याचबरोबर विधानसभेच्या आवारात राज्य पोलीसांकडून राज्यपालांना सलामी देण्यात आली. यंदाच्या अर्थसंकल्पाला दुःखाची किनार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांचे नुकतेच निधन झाले आहे. अनेक दशकांनंतर अजित पवार यांच्या शिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. अजित पवारांच्या अनुपस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी कारभार स्वीकारला असला तरी अर्थखाते हे मुख्यमंत्री फडणवीसांकडेच आहे. येत्या 6 मार्च रोजी मुख्यमंत्री स्वतः अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये एकूण 15 विधेयके सादर होणार आहेत.