
फोटो सौजन्य - Social Media
भारतातील लोकप्रिय कन्फेक्शनरी ब्रँड मेंटोसने आपल्या उत्पादनांच्या श्रेणीत आणखी एक नवीन भर घालत ‘मेंटोस फ्रेश ॲक्शन’ ही कडक कँडी बाजारात सादर केली आहे. पुदिना, नीलगिरी आणि विटामिन सीच्या मिश्रणासह तयार करण्यात आलेल्या या कँडीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या आत असलेला निळ्या रंगाचा द्रवपदार्थाने भरलेला केंद्रभाग. विशेष म्हणजे ही कँडी अवघ्या १ रुपयांत ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, ‘मेंटोस फ्रेश ॲक्शन’ ग्राहकांना अधिक ताजेतवाने आणि थंडगार अनुभव देण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. पुदिना आणि नीलगिरीच्या फ्लेवरमुळे तोंडात आणि घशात फ्रेशनेसची अनुभूती मिळते, तर पारदर्शक कँडीच्या आतील लिक्विड सेंटर प्रत्येक चाव्यासोबत वेगळी चव आणि रिफ्रेशिंग अनुभव देतो.
या उत्पादनामध्ये विटामिन सीचाही समावेश करण्यात आला असून, कँडी तोंडात टाकल्यानंतर तीव्र चव आणि ताजेपणाचा अनुभव मिळतो. ग्राहकांना पारंपरिक कडक कँडींपेक्षा वेगळा अनुभव देण्याच्या उद्देशाने लिक्विड-फिल्ड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी कँडी चावताना आतला द्रव बाहेर येऊन चवीत एक वेगळा ट्विस्ट निर्माण करतो.
बदलत्या ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन हे उत्पादन विकसित करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. विशेषतः ताजेपणा, नवीन फ्लेवर आणि परवडणारी किंमत या तीन गोष्टींवर भर देण्यात आला असून, केवळ १ रुपयांच्या किमतीत हा अनुभव अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
या लाँचबाबत बोलताना परफेटी वॅन मेल इंडियाचे मार्केटिंग डायरेक्टर गुंजन खेतान यांनी सांगितले की, ग्राहक आता अधिक तीव्र आणि वेगळ्या चवींचा अनुभव देणाऱ्या उत्पादनांना पसंती देत आहेत. ‘मेंटोस फ्रेश ॲक्शन’मध्ये पुदिना, नीलगिरी आणि लिक्विड सेंटर यांचे अनोखे संयोजन करण्यात आले असून, कडक कँडीच्या श्रेणीत नवा उत्साह निर्माण करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
डिझाइनच्या दृष्टीनेही या कँडीला आकर्षक स्वरूप देण्यात आले आहे. पारदर्शक बाह्यरचना आणि आत दिसणारे निळ्या रंगाचे लिक्विड उत्पादनाच्या वैशिष्ट्याला अधोरेखित करते. कंपनीच्या मते, हे ‘मॅजिक इनसाईड’ संकल्पनेवर आधारित असून ग्राहकांना दृश्य आणि चवीचा दुहेरी अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
‘मेंटोस फ्रेश ॲक्शन’ भारतातील प्रमुख बाजारपेठांमध्ये किराणा दुकाने, मॉडर्न ट्रेड स्टोअर्स आणि इतर किरकोळ विक्री केंद्रांवर उपलब्ध होणार आहे. उत्पादनाचा प्रसार वाढवण्यासाठी आकर्षक इन-स्टोअर डिस्प्ले, प्रचार मोहीम आणि ग्राहकांपर्यंत थेट पोहोचणारे विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. नव्या फ्लेवर आणि परवडणाऱ्या किमतीमुळे हे उत्पादन ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.