
नोकरी सोडल्यास मिळणार तब्बल11 लाख! ( सौजन्य - सोशल मीडिया )
हा प्रस्ताव मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ठेवला आहे. ही स्कीम निवडणाऱ्या मध्यम-स्तरीय कर्मचाऱ्यांना ३९ आठवड्यांचा मूळ पगार मिळतो, तर वरिष्ठ-स्तरीय कर्मचाऱ्यांना १२ महिन्यांचा मूळ पगार मिळतो. हा प्रस्ताव भारत, तसेच अमेरिका, युके आणि कॅनडा या देशांमध्ये लागू आहे. पण तुम्हाला ‘वॉलंटरी एग्जिट ऑफर ‘बद्दल माहिती आहे का? VEO म्हणजे काय? VEO फायदेशीर आहे की तोट्याचा, हे सगळं समजून घेऊयात.
वॉलंटरी एग्जिट ऑफ ही एक कॉर्पोरेट योजना आहे, ज्यामध्ये कर्मचारी कपात करण्याऐवजी, कंपनी कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने नोकरी सोडण्याचा पर्याय देते. मायक्रोसॉफ्टने देखील भारतातील आणि इतर चार देशांमधील आपल्या ६०,००० कर्मचाऱ्यांसाठी अशाच प्रकारचे ‘वॉलंटरी एग्जिट ऑफ’ दिले आहेत.
Reddit या सोशल मीडिया हँडलवर, हैदराबादमधील एका सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअरने सांगितले की, त्याला मायक्रोसॉफ्ट सोडण्यासाठी ₹१.१ दशलक्ष म्हणजेच १.१ मिलियनची ऑफर मिळाली आहे. त्यानंतर त्याने लोकांना विचारले की, हे पैसे स्वीकारून कंपनी सोडू का? ₹१.१ दशलक्ष ही रक्कम त्याच्या तीन महिन्यांच्या पगाराएवढी आहे. मात्र, समस्या ही आहे की, कंपनी सोडल्यानंतर त्याला दुसरी नोकरी कधी मिळेल याची खात्री नाही. जर त्याला लगेच दुसरी नोकरी मिळाली नाही, तर ₹१.१ दशलक्षमध्ये तो आपला खर्च किती काळ भागवू शकेल खरंतर ही विचार करण्यासारखी बाब आहे.
या पोस्टवर लोकांनी वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. काहींच्या मते, दुसरी नोकरी मिळेपर्यंत नोकरी सोडणे योग्य नाही. आयटी क्षेत्रात नवीन नोकरी मिळायला वेळ लागण्याची शक्यता आहे. तर, काही युझर्सनी सांगितले की, जर एखाद्या कर्मचाऱ्याकडे बचत असेल आणि तो आधीच नोकरी बदलण्याचा किंवा ब्रेक घेण्याचा विचार करत असेल, तर ही ऑफर त्याच्यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय ठरेल.
ऑफर नाकारल्यास त्यांची नोकरी जाईल का? अनेक कर्मचाऱ्यांना असाही प्रश्न पडला आहे की, जर त्यांनी ही ऑफर स्वीकारली नाही, तर त्यांची नोकरी जाण्याचा धोका आहे का. पण मायक्रोसॉफ्टने आपल्या अधिकृत निवेदनात असं म्हटलेले नाही की, VEO स्वीकारण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाईल. कंपनीने ही पुर्ण प्रक्रिया ऐच्छिक असेल असं स्पष्ट केलं आहे. ही स्कीम काही निवडक विभागांनाच लागू होते.
Ans: VEO चे पूर्ण रूप 'व्हॉलंटरी एक्झिट ऑप्शन'असे आहे, ज्या अंतर्गत कर्मचारी स्वतःहून स्वेच्छेने कंपनीतील आपली नोकरी सोडू शकतात.
Ans: मीडिया रिपोर्ट्सनुसार, या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना सुमारे ११ लाख रुपये किंवा त्यांच्या कार्यकाळानुसार ठराविक पॅकेज दिले जात आहे.
Ans: कंपन्या आपल्या मनुष्यबळाचे नियोजन पुनर्रचित करण्यासाठी, अंतर्गत खर्च कमी करण्यासाठी आणि व्यवसाय धोरणात बदल करण्यासाठी अशा प्रकारच्या स्वेच्छेने नोकरी सोडण्याच्या योजना लागू करत असतात.