रिलायन्सचा शेअर्स 70 टक्क्यांनी वाढणार? विदेशी ब्रोकरेज हाऊस सीएलएसएच्या अहवालातून माहिती समोर!
भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने 2023-24 या आर्थिक वर्षात सरकारी तिजोरीत एकूण 1,86,440 कोटी रुपयांचा भरणा केला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम नऊ हजार कोटी रुपयांनी अधिक आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात हरियाणाचे बजेट 183,950 कोटी रुपये होते. अर्थात हरियाणा या राज्याच्या अर्थसंकल्पापेक्षाही अधिक पैसा मुकेश अंबानी यांनी केंद्र सरकारच्या तिजोरीत भरला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजकडून चा वार्षिक अहवाल जाहीर
देशातील सर्वाधिक मार्केट कॅप असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून वार्षिक अहवाल जाहीर करण्यात आला आहे. कंपनीने या कालावधीत सीएसआरवर एकूण 1,592 कोटी रुपये खर्च केले. जे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 300 कोटी रुपये जास्त आहे. कंपनी नफा मिळवण्यातही पहिल्या क्रमांकावर राहिली. 2023-24 या आर्थिक वर्षात करानंतरचा नफा 79 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होता. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 7.3 टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी कंपनीचा नफा 73 हजार 670 कोटी रुपये होता.
हेही वाचा : संपत्तीच्या बाबतीतही विनेश फोगाट नाही मागे; वाचा… किती कोटींची आहे मालकीण!
बाजार भांडवलात जगातील ४८ वी कंपनी
देशाच्या अर्थव्यवस्थेत रिलायन्सचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात 20 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडणारी रिलायन्स देशातील पहिली कंपनी ठरली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही 27 टक्के वाढ आहे. बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्स ही जगातील ४८ वी कंपनी आहे. याशिवाय रिलायन्सने एकत्रित महसुलात 10 लाख कोटी रुपयांचा टप्पाही ओलांडला आहे.
हेही वाचा : कर्ज महागले..! ‘या’ बँकेकडून कर्जावरील व्याजदरात मोठी वाढ! वाचा… नवीन व्याजदर!
वर्षभरात 1 लाख 35 हजार कोटींची गुंतवणूक
दरम्यान, निर्यातीतही रिलायन्स देशाची अर्थव्यवस्था मजबूत करत आहे. गेल्या आर्थिक वर्षात रिलायन्सने सुमारे 3 लाख कोटी रुपयांची निर्यात केली आहे. रिलायन्स केवळ निर्यातीतच नव्हे तर देशातील भांडवली मालमत्तेच्या निर्मितीमध्येही खासगी क्षेत्रातील योगदान देणारा सर्वात मोठा समूह आहे. वार्षिक अहवालानुसार, रिलायन्सने 2023-24 या आर्थिक वर्षात 1 लाख 35 हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वार्षिक अहवालाबाबत म्हटले आहे की, “जागतिक आर्थिक परिस्थितीमध्ये भारताचे महत्त्व गेल्या दशकात अनेक पटींनी वाढले आहे. अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या या जगात भारत स्थिरता आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून समोर येत आहे. सर्व क्षेत्रातील मजबूत वाढ हे 140 कोटी भारतीयांच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम आहे. तर भारत आणि भारतीयत्वाची ही भावनाच रिलायन्सला सतत नवनवीन काम करण्यास आणि प्रत्येक प्रयत्नात उत्कृष्टता प्राप्त करण्यास प्रवृत्त करते.”