संपत्तीच्या बाबतीतही विनेश फोगाट नाही मागे; वाचा... किती कोटींची आहे मालकीण!
ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर, आंदोलनात लाथा-बुक्क्यांनी ज्या खेळाडूला लाथाडण्यात आले. त्याच कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठली. मात्र, आता अंतिम सामन्याआधीच तिला ५० किलोहून १०० ग्रॅम अधिक वजन झाल्याने अपात्र ठरवण्यात आले. ज्यामुळे सध्या समाजमाध्यमांवर अनेकांकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
परंतु, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिची कामगिरी लक्षणीय ठरल्याने, तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मात्र, आता देशाची मान उंचावणारी कुस्तीपटू विनेश फोगाट नेमकी किती कोटींची मालकीण आहे. तिची किती मालमत्ता आहे? नेटवर्थ किती आहे? याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत…
हेही वाचा : कांदा प्रश्नावरून राजू शेट्टींचे पंतप्रधान मोदींना पत्र; बांग्लादेशबाबत केली ‘ही’ महत्वाची मागणी!
किती आहे विनेशची संपत्ती?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, २९ वर्षीय विनेश फोगाट ही एकूण ३६.५ कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. ती खेळाशिवाय इतर ठिकाणांहूनही मोठी कमाई करते. कुस्तीशिवाय ती ब्रँड एंडोर्समेंट्समधूनही कमाई करते. त्याशिवाय मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्सकडूनही तिला कुस्तीपटू म्हणून पगार दिला जातो. मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्सकडून तिला महिन्याला ५० हजार रुपये पगार मिळतो. तर वर्षाला तिला ६ लाख रुपये मिळतात. त्याशिवाय विनेश फोगाट बेसलाइन वेंच्युर्स आणि कोर्नरस्टोन स्पोर्ट्सची ब्रँड ॲम्बेसेडर आहे. यातूनही तिची कमाई होते.
किती आहे तिची मालमत्ता?
विनेश फोगाटचा हरियाणामध्ये एक लग्झरी व्हिला आहे. या बंगल्यात ती कुटुंबासोबत राहते. त्याशिवाय तिची इतरही काही ठिकाणी प्रॉपर्टी आहे. मात्र याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. तिच्याकडे लग्झरी कार कलेक्शन देखील आहे. तिच्याकडे एकूण तीन कार्स असून, त्यापैकी एक टोयोटा फॉर्च्युनर आहे. जिची किंमत ३५ लाख रुपये आहे. त्याशिवाय तिच्याकडे टोयोटा इनोव्हा असून, तिची किंमत २८ लाख रुपये आहे. तसेच तिने मर्सिडिज जीएलई १.८ कोटींची लग्झरी कार देखील खरेदी केली आहे.
हेही वाचा : तब्बल 400 टक्क्यांहून अधिक परतावा; डिव्हिडंडची घोषणा; ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल!
वाखाणण्याजोगी कामगिरी
हरियाणातील दादरी येथे जन्मलेल्या विनेशने तिच्या करिअरमध्ये अनेक पदके मिळवली आहेत. ती भारताची पहिली महिला कुस्तीपटू आहे, जिने कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. त्याशिवाय विनेश जागतिक कुस्ती स्पर्धेत अनेक पदक जिकणारी एकमेक भारतीय महिला कुस्तीपटू आहे. आता तिने ऑलिम्पिकमध्येही इतिहास रचला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत फायनलमध्ये पोहोचणारी ती पहिली महिला भारतीय कुस्तीपटू बनली. मात्र, दुर्दैवाने अंतिम सामन्याआधीच तिला अपात्र ठरवण्यात आले आहे.