दोन बँकांमध्ये खाते असल्यास दंड ठोठावला जाणार? वाचा... आरबीआयचा नियम काय?
तुम्हीही एचडीएफसी बँकेचे खातेदार आहात का? तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. देशातील आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. येत्या ८ ऑगस्टपासून ही कर्जावरील वयाजदरातील वाढ लागू होणार आहे. त्यामुळे आता एचडीएफसी बँकेच्या खातेदारांना महागड्या दराने कर्ज मिळणार आहे.
काय आहे नवीन व्याजदर?
एचडीएफसी बँकेने आपल्या एमसीएलआर म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड आधारित कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँकेने एमसीएलआरमध्ये 5 बेस पॉईंट किंवा 0.05 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता एमसीएलआरच्या आधारे बँकेने दिलेल्या कर्जावरील नवीन व्याजदर 9.10 टक्क्यांपासून 9.45 टक्क्यांपर्यंत असणार आहे.
(फोटो सौजन्य : istock)
हेही वाचा : जगभरातील शेअर बाजार सावरला; भारतीय शेअर बाजारात 875 अंकांची उसळी!
काय असतो एमसीएलआर?
कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था जेव्हा कर्ज देते. तेव्हा त्यासाठी लागणारे किमान व्याज असते त्याला एमसीएलआर म्हटले जाते. एमसीएलआर हा कोणत्याही कर्जावरील किमान व्याज दर्शवते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) त्यात कोणतेही बदल केले नसतील. तर कर्जदाराला संबंधित व्याज द्यावे लागते. विशेष म्हणजे बदललेल्या व्याजदराचा परिणाम हा बँकेच्या जुन्या कर्जदार ग्राहकांवरही होत असतो.
‘हे’ आहेत एचडीएफसी बँकेचे नवीन व्याजदर
– ओवरनाइट – 9.10 टक्के
– 1 महिना – 9.15 टक्के
– 3 महिना – 9.25 टक्के
– 6 महिना – 9.40 टक्के
– 1 वर्ष – 9.45 टक्के
– 2 वर्ष – 9.45 टक्के
– 3 वर्ष – 9.45 टक्के
हेही वाचा : वऱ्हाडींना मागवले स्वीगीकडून जेवण; ‘या’ जोडप्याच्या लग्नातील पाहुणचाराची सर्वदूर चर्चा!
एमपीसीच्या बैठकीतील निर्णयाआधीच एचडीएफसीकडून व्याजदरात वाढ
साधारणपणे बँका आरबीआयच्या रेपो दराच्या प्रमाणात व्याजदर बदलतात. रेपो दरात वाढ करायची की नाही? याबाबतचा निर्णय आरबीआयच्या एमपीसी (मॉनेटरी पॉलिसी कमिटी) द्वारे घेतला जातो. त्यासाठीच्या बैठकीचे अध्यक्ष आरबीआय गव्हर्नर असतात. सध्या एमपीसीची बैठक सुरू असून, गुरुवारी अर्थात ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या एमपीसीच्या बैठकीत घेतलेले निर्णय आरबीआयकडून जाहीर केले जातील. रेपो दरात कोणताही बदल होणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या रेपो दर 6.50 टक्के इतका आहे.