Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

होर्मुज संकट आणि गॅस टंचाईतही आमची Mumbai सुसाट; मेल-एक्स्प्रेस प्रवाशांत दीड टक्के वाढ

हॉटेल व्यवसाय डगमगेल आणि त्यात काम करणारे हजारो परप्रांतीय कामगार गावाकडे परततील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या ताज्या आकडेवारीने हा अंदाज फोल ठरला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 12, 2026 | 02:35 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गॅस टंचाईतदेखील मुंबईची गती कायम
  • मेल-एक्स्प्रेस प्रवाशांत दीड टक्के वाढ
  • तर स्थलांतराचा अंदाज ठरला फोल
Mumbai Thrives : इराण-अमेरिका-इस्त्रायल तणावामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेचे पडसाद जगभर उमटत आहेत. मुंबईतही व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याने, हॉटेल व्यवसाय डगमगेल आणि त्यात काम करणारे हजारो परप्रांतीय कामगार गावाकडे परततील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या ताज्या आकडेवारीने हा अंदाज फोल ठरल्याचे दिसत आहे. उलट प्रवाशांच्या संख्येत सुमारे दीड टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

Petrol – Diesel च्या वाहनांचा Game Over! 2028 पासून येणार बंदी; दिल्ली सरकारचा Mega Plan…

अधिक प्रवाशांनी मेल-एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवास

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, मार्च २०२६ मध्ये ३४.४७ लाखांहून अधिक प्रवाशांनी मेल-एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवास केला. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ किरकोळ असली तरी, संभाव्य आर्थिक परिणामांच्या पार्श्वभूमीवर ती महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः परप्रांतीय कामगारांची ये जा सुरूच असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

महसुलातही ८ टक्क्यांची वाढ

प्रवासी महसुलातही जवळपास ८ टक्क्यांची वाढ झाली असून, तिकीट तपासणी मोहिमा, विनातिकीट प्रवाशांवर कारवाई तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासातील वाढ यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात भर पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवरही मुंबईकडे होणारी ये-जा कायम असल्याचे चित्र आहे.

रेल्वेला मिळालेला महसूल

मार्च 2025 हा महसूल 328 कोटी रुपये इतका होता.
मार्च 2026 मध्ये हा महसूल 304 कोटी रुपये इतका झाला आहे.

जागतिक परिस्थिती बेताची असतानाही जवळपास ८ टक्क्यांची वाढ झाली असून ३४.४७ लाखाहून अधिक प्रवास झाला आहे.

स्थलांतराचा अंदाज फोल

गॅस टंचाई आणि रोजगारावर परिणाम होईल या भीतीमुळे परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात गावाकडे जातील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र मेल-एक्सप्रेस प्रवाशांची संख्या स्थिर राहिल्याने मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

भीतीपेक्षा वास्तव वेगळे

मार्च २०२६ मध्ये ३४.४७ लाख प्रवाशांनी मेल एक्स्प्रेस गाड्यांतून प्रवास केला, तर मार्च २०२५ मध्ये ही संख्या ३४ लाख होती. त्यामुळे सुमारे १.५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. गॅसटंचाईच्या चर्चानंतरही प्रवासी संख्येत घट न होता उलट वाढ झाली आहे.

Bank Holiday : पुढच्या आठवड्यात बँका राहणार बंद, गैरसोय टाळण्यासाठी ‘या’ तारखा नोट करा

Web Title: Mumbai thrives amidst hormuz crisis and gas shortage 15 rise in mail and express train passengers marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Business News
  • Local in Mumbai
  • Local Trains
  • Marathi News

संबंधित बातम्या

America News : अमेरिकेत गोळ्या झाडून फाशीच्या शिक्षेचे थेट प्रक्षेपण? पोप लिओ चौदाव्यांचा मृत्युदंडाला विरोध
1

America News : अमेरिकेत गोळ्या झाडून फाशीच्या शिक्षेचे थेट प्रक्षेपण? पोप लिओ चौदाव्यांचा मृत्युदंडाला विरोध

Israel News : गाझा युद्धाच्या निषेधार्थ लंडनमध्ये हजारोंचा मोर्चा; पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले नागरिक
2

Israel News : गाझा युद्धाच्या निषेधार्थ लंडनमध्ये हजारोंचा मोर्चा; पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले नागरिक

World News : नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प संतप्त; नॉर्वेच्या नोबेल समितीवर देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप
3

World News : नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प संतप्त; नॉर्वेच्या नोबेल समितीवर देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप

Russia-Ukraine War : रशियन डिझेलवरील निर्बंध शिथिल; झेलेन्स्कींचा अमेरिकेला संतापजनक सवाल, निर्णयाला ‘पुतिन यांना भेट’ म्हटले
4

Russia-Ukraine War : रशियन डिझेलवरील निर्बंध शिथिल; झेलेन्स्कींचा अमेरिकेला संतापजनक सवाल, निर्णयाला ‘पुतिन यांना भेट’ म्हटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.