Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Income Tax Act 2025: १ एप्रिलपासून लागू होणार नवीन आयकर कायदा; अर्थमंत्री सीतारामन यांचे ६ महत्त्वाचे आदेश

आयकर अधिकाऱ्यांना करदात्यांचे जीवन सुलभकरण्यासाठी आणि हेतुपुरस्सर कर चुकविणाऱ्यांना पकडण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा, असे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. २०२६ आयकर कायदा देशव्यापी जनजागृती मोहीम आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 22, 2026 | 01:07 PM
Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे बजेट भाषण सुरू ! ७% विकासदराचा केला मोठा दावा

Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे बजेट भाषण सुरू ! ७% विकासदराचा केला मोठा दावा

Follow Us
Follow Us:
  • करचोरी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आदेश
  • नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करावे हा मुख्य उद्देश
  • तंत्रज्ञानाच्या मदतीने करचुकवेगिरीवर लागणार लगाम
 

New Income Tax Act 2025: आयकर अधिकाऱ्यांना करदात्यांचे जीवन सुलभकरण्यासाठी आणि हेतुपुरस्सर कर चुकविणाऱ्यांना पकडण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा, असे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. २०२६ आयकर कायदा, २०२५ वरील देशव्यापी जनजागृती मोहीम या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की, १ एप्रिलपासून लागू होणारा आयकर कायदा, २०२५ भारताला निश्चितपणे कर-स्नेही देश बनवेल. ही मल्टीमीडिया मोहीम प्रिंट, रेडिओ, टेलिव्हिजन, आउटडोअर, डिजिटल आणि सोशल मीडिया या माध्यमांमध्ये राबवली जात आहे. पुढील आर्थिक वर्षांच्या सुरुवातीपासून १ एप्रिल लागू होणाऱ्या या नवीन कायद्याच्या प्रमुख वैशिष्ट्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ही मोहीम तयार करण्यात आली.

नवीन कायदाची अंमलबजावणी सहानुभूती, निष्पक्षता आणि कार्यक्षमतेने केली पाहिजे. त्या असेही म्हणाल्या की, करदाता हा तुमचा शत्रू नसून राष्ट्र उभारणीतील तुमचा भागीदार आहे. ‘मला एक नवीन दृष्टिकोन, एक नवीन मानसिकता’ हवी आहे. मानसिकतेतील बदलाच्या गरजेवर जोर देण्यासाठी, त्यांनी ‘हम हिंदुस्तानी’ या हिंदी चित्रपटातील एका गाण्यातील ओळी आठवून काढली. जेव्हा जुना आयकर कायदा तयार केला जात होता. पंतप्रधान मोदी यांच्या ‘मानवतावादी’ दृष्टिकोनाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, हा उपक्रम मानवकेंद्रित डिजिटल युगासाठी आहे. नैतिक, मूल्यात्मक प्रणाली, राष्ट्रीय सार्वभौमत्व, सुलभ आणि सर्वसमावेशक एआय व कायदेशीर प्रणालीचा समावेश आहे.

Share Market March 2026: निफ्टी रोलर-कोस्टरवर; गुंतवणूकदारांसाठी ‘वेट अँड वॉच’ रणनीती महत्त्वाची?

नवीन अनुमानित करप्रणाली अधिक मजबूत केल्याने एमएसएमईना दिलासा मिळेल. विभागाकडून असलेल्या आपल्या ६ अपेक्षांबद्दल सांगताना अर्थमंत्री म्हणाल्या, संवाद सत्रांची अंमलबजावणी करणे, करदात्यांच्या वेळेचा आदर करणे, खटलेबाजी झपाट्‌याने कमी करणे, तरुणांशी संपर्क साधणे, करचुकवेगिरी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे, हा कायदा जुन्या कायद्याप्रमाणे क्लिष्ट होणार नाही याची खात्री करणे. या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी आयकर विभागाच्या नवीन आणि आधुनिक वेबसाइटचे अनावरणही केले. त्यांनी विधेयकाची तपासणी करणाऱ्या संसदीय निवड समितीचे आभार मानले. समितीने १९६ मुद्द्यांची शिफारस केली होती, त्यापैकी १८४ मुद्दे स्वीकारण्यात आले.

सीतारामन म्हणाल्या, कर भरणे इतके सोपे करा, की प्रामाणिकपणा हा एक नैसर्गिक पर्याय बनेल, पण जे कर चुकवतात, जे मुद्दाम कर भरण्याचे टाळण्याचा प्रयत्न करतात. त्यांना तंत्रज्ञान पकडेल. तुम्ही प्रामाणिक असाल तर व्यवस्था तुमचे जीवन सोपे करेल, पण तुम्ही फसवणूक केली, तर व्यवस्था तुम्हाला शोधून काढेल. हा संदेश करदात्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. संसदेने सहा दशके जुन्या आयकर कायदा, १९६१ च्या जागी १२ ऑगस्ट २०२५ रोजी नवीन आयकर विधेयक मंजूर केले. त्यात कोणत्याही नवीन कर दरांची तरतूद नाही, केवळ कायद्याची भाषा सोपी केली आहे.

New Income Tax Rules मुळे ‘HRA’ वर मिळणार मोठा करलाभ; १ एप्रिलपासून अंमलबजावणी

सीतारामन यांनी कर अधिकाऱ्याऱ्यांना नवीन कर कायद्यांबद्दल लोकांना स्थानिक भाषांमध्ये शिक्षित करण्यासाठी भारतभर जनजागृती मोहीम सुरू करण्यास सांगितले, खटलेबाजी मोठ्या प्रमाणात कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे त्या म्हणाल्या, त्या कर अधिकाऱ्यांना म्हणाल्या, तुम्ही केवळ कर गोळा करणारे नाही, तर सरकार आणि करदाता यांच्यातील संबंधांचे प्रतीक आहात. हा नवीन कायदा तुम्हाला ते सोपे करण्यासाठी एक स्पष्ट आणि संक्षिप्त चौकट देतो.

Web Title: New income tax act to come into effect from april 1 finance minister sitharamans 6 important directives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • income tax
  • Income Tax Department
  • New income tax bill
  • tax

संबंधित बातम्या

Tax Relief On Medical Bills: ऑफिसने रुग्णालयाचा खर्च नाकारला? इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये करा असा दावा; पाहा कसा होईल फायदा
1

Tax Relief On Medical Bills: ऑफिसने रुग्णालयाचा खर्च नाकारला? इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये करा असा दावा; पाहा कसा होईल फायदा

Tax Exemption Bill : विदेशी गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले! टॅक्स सूट बिल मंजूर; जाणून घ्या शेअर बाजारावर काय होणार परिणाम?
2

Tax Exemption Bill : विदेशी गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले! टॅक्स सूट बिल मंजूर; जाणून घ्या शेअर बाजारावर काय होणार परिणाम?

LPG Gas New Tax: सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकार घेणार मोठा निर्णय, नेमकी काय आहे तरतूद?
3

LPG Gas New Tax: सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकार घेणार मोठा निर्णय, नेमकी काय आहे तरतूद?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.