
NPCI eNACHLite Launch
पूर्वी पेमेंट करताना युजर्सना ब्राउझरवर रिडायरेक्ट केले जात होतं. जिथे पेमेंट बऱ्याचवेळा फेल होत असायचं. आता, ही प्रक्रिया थेट ॲपमधूनच काही सेकंदात पूर्ण करता येणार आहे. हैदराबादमधील NPCI-सर्टिफाइड टेक्नोलॉजी सर्विस प्रोवाइडर असलेल्या व्हिओना फिनटेकने पूर्णपणे तयार केलं आहे आणि याला टेस्ट केलं आहे. हा बँका आणि कर्जदात्यांना या नवीन वैशिष्ट्यासह त्वरित जोडण्यासाठी तयार करणअयात आला आहे.
जेव्हा एखादा ग्राहक EMI, विमा हप्ता किंवा म्युच्युअल फंडासाठी ऑटो-डेबिट सेट करायचा, तेव्हा ॲप त्यांना बऱ्याचदा बाहेरच्या वेब ब्राउझर पेजवर redirect केलं जायचं. त्यानंतर, पेज हळू चालणे, ॲप क्रॅश होणे किंवा तांत्रिक बिघाड होणं यांसारख्या कारणांमुळे ही प्रक्रिया अपूर्ण राहायची. यामुळे ग्राहकांमध्ये बराच असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे बँकेच्या कॉल सेंटर्समध्ये तक्रारींचा भडीमार झाला होता.
NPCI ने आता बाह्य वेब पेजेसवर जाण्याची गरज भासणार नाही. तर त्याऐवजी आता, सर्व व्यवहार एकाच ॲपमध्ये पूर्ण करता येतील. वापरकर्त्यांना यापुढे ॲपमधून बाहेर पडण्याची गरज भासणार नाही. मँडेट्स सेट करणे, त्यात बदल करणे, ते थांबवणे किंवा रद्द करणे, हे सर्व ॲपमधूनच सहजपणे करता येईल. ॲपमध्ये, ग्राहकाला स्क्रीनवर तपशील दिसेल. त्यानंतर ते त्यांच्या कार्ड किंवा आधारचा वापर करून आपली ओळख पडताळणी करु घेईल. त्यांच्या मोबाईलवर मिळालेला OTP टाकतील आणि ही प्रक्रिया काही सेकंदात पूर्ण होईल. महत्त्वाचे म्हणजे, जर कोणताही व्यवहार कोणत्याही कारणास्तव अयशस्वी झाला, तर सिस्टम समस्येचे कारण स्पष्टपणे समजावून सांगेल.
टेक्निकल अडचणी दूर झाल्यानंतर अधिक ग्राहकांना त्यांची पेमेंट प्रक्रिया पूर्ण करता येईल. यामुळे कॉल सेंटरमध्ये येणाऱ्या तक्रारींची संख्या लक्षणीयरीत्या कमी होईल आणि पेमेंट अयशस्वी होण्याचे नेमके कारण ओळखून कस्टमर केअरवाले तात्काळ मदत करू शकतील. शिवाय, बँकांना यासाठी नवीन ॲप विकसित करण्याची गरज लागणार नाही. व्हिओना फिनटेकसारख्या NPCI-प्रमाणित कंपन्या तांत्रिक पायाभूत सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थापन हाताळतील. विशेष म्हणजे, ग्राहकांचे संवेदनशील कार्ड आणि ओळख तपशील थेट NPCI च्या सुरक्षित प्रणालीमध्ये संग्रहित केले जातील, ज्यामुळे डेटा गळतीचा धोका नाहीसा होईल.
Refined Sugar असते तरी काय? बाजारातील भाव कमी करण्यासाठी कंपन्या वाढवणार पुरवठा, नेमका प्लॅन काय?