Aadhaar Card धारकांनो इथे लक्ष द्या! ( सौजन्य - सोशल मीडिया )
UIDAI ने लॉन्च केलेल्या या टूलमुळे बँका, फिनटेक कंपन्या फाइनेंशियल सेक्टरच्या इतर कंपन्याना थेट त्यांच्या सर्व्हरवरून ग्राहकांचे फेस ऑथेंटिकेशन करता येणार आहे. यामुळे वेरिफिकेशन प्रक्रिया सहज आणि सोपी होणार आहे. आधार फेस ऑथेंटिकेशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट (SDK) आणि सँडबॉक्स हे ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६मध्ये लाँच करण्यात आले आहेत.
यामुळे इकोसिस्टम पार्टनर म्हणजे बँक, फिनटेक कंपन्या आणि इतर फाइनान्सशियल सेक्टर कंपन्या त्यांच्या डिजिटल ॲप्लिकेशन्समध्ये आधार फेस ऑथेंटिकेशन सहजपणे इंटीग्रेट, टेस्ट आणि डिप्लॉय करु शकतात.
आधार फेस ऑथेंटिकेशन SDK हे UIDAI च्या फेस ऑथेंटिकेशन क्षमता थेट नेटिव्ह अँड्रॉइड आणि iOS ॲप्समध्ये आणते. यामुळे वापरकर्त्यांना वेगवेगळ्या ॲप्समध्ये स्विच करण्याची गरज लागणार नाही त्यामुळे ही प्रक्रिया अतिशय सुलभ, सोपी आणि सिंगल-ॲप ऑथेंटिकेशनचा अनुभव देते. पीआयबीच्या मते, हे रेडी-टू-यूज एसडीके इकोसिस्टम पार्टनर्ससाठी इंटिग्रेशन सोपे बनवतं आणि यामध्ये एआय/एमएल-आधारित लाइव्हनेस व अँटी-स्पूफिंग क्षमतादेखील आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया आपल्यासाठी सुलभ बनते.
ही सिस्टीम ऑथेंटिकेशन डेटा सुरक्षितरित्या हाताळते आणि एन्क्रिप्शनसाठी देखील सपोर्ट करते. याला विशेषतः सर्व प्रकारच्या स्मार्टफोन्सवर हाताळण्यासाठी विशेष म्हणजे डिझाइन केलेलं आहे. हे SDK सरकारी विभाग, बँका, फिनटेक कंपन्या आणि इतर संस्थांना फेस ऑथेंटिकेशनची आवश्यकता असलेल्या सेवांना अधिक प्रभावीपणे लागू करण्यासाठी मदत करेल अशी अपेक्षा आहे.
SDK सोबतच, UIDAI ने आधार फेस ऑथेंटिकेशन सँडबॉक्स देखील सुरू केला आहे. हे एक सुरक्षित आणि नियंत्रित प्रणाली आहे जी संस्थांना संपूर्ण फेस ऑथेंटिकेशन प्रक्रिया प्रत्यक्ष वापरात आणण्यापूर्वी तिचे एकत्रीकरण, पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्याची परवानगी देते.
हा सँडबॉक्स डेव्हलपर्स आणि क्वालिटी अॅश्युरन्स टीम्सना बाह्य बायोमेट्रिक हार्डवेअरची आवश्यकता न भासता, युझर प्रोव्हिजनिंग आणि संमती, फेस कॅप्चर, लाइव्हनेस चेक्स, ऑथेंटिकेशन, एरर हँडलिंग आणि रिस्पॉन्स व्हॅलिडेशन यांसारख्या महत्त्वाच्या लेव्हल्सची चाचणी करतो. तसेच, तो अवैध डिजिटल स्वाक्षरी, नेटवर्कमधील व्यत्यय, टाइमआउट आणि स्पूफिंगचे प्रयत्न यांसारख्या अयशस्वी परिस्थितींची चाचणी करण्याची परवानगी देतो.






