Operation Sindoor: भारताच्या पाकिस्तानवरील हल्ल्याचा शेअर मार्केटवर परिणाम! बाजार सुरु होताच निफ्टी घसरला
6 मे रोजी रात्री भारताने पाकिस्तानच्या 9 दहशतवादी स्थळांवर हल्ला केला. या हल्ल्याचा परिणाम आता भारतासह जागतिक शेअर बाजारात देखील पाहायला मिळणार आहे. 6 मे रोजी भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर 7 मे रोजी सकाळी शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. शेअर बाजाराची सुरु होताच निफ्टीमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. भारताने केलेल्या या हल्ल्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे.
निफ्टी निर्देशांकही घसरला आणि सुमारे 80 अंकांच्या घसरणीसह 24350 वर व्यवहार करत आहे. भारताने केलेल्या हल्ल्याचा परिणाम केवळ भारतीय शेअर बाजारतच नाही तर जागतिक बाजारपेठेत देखील झाला आहे. या हल्ल्यानंतर जागतिक बाजारापेठेत मोठी हालचाल दिसून येत आहे.
जपानचा निक्केई निर्देशांक स्थिर आहे. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक 1.3% च्या वाढीसह व्यवहार करत आहे. चीनच्या शांघाय कंपोझिट निर्देशांकातही अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अमेरिकन फ्युचर्स मार्केटमध्येही वाढ पाहायला मिळत आहे. दोन दिवसांनंतर बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात विक्री दिसून आली. सेन्सेक्स 155 अंकांनी घसरून 80641 वर बंद झाला. निफ्टी देखील 81 अंकांनी घसरून 24379 वर बंद झाला.
आज शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांची सुरुवात घसरणीने होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. याप्रमाणेच सकाळी बाजार सुरु होताच निफ्टी घसरला. मात्र त्यानंतर पुन्हा वाढ पाहायला मिळाली. ऑपरेशन सिंदूरमुळे कारवाई होऊ शकणाऱ्या संरक्षण क्षेत्रातील साठ्याकडे विशेष लक्ष दिले जाईल. बुधवारी भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढू शकतो. याचाच परिणाम शेअर बाजारावर झाल्याचं पाहायला मिळालं.
प्रत्येक भारत-पाकिस्तान युद्धानंतर शेअर बाजारावर नक्कीच परिणाम होतो. कारगिल युद्ध (1999), भारतीय संसदेवर हल्ला (2001), 2008 मधील मुंबई ताज हल्ला, उरी सर्जिकल स्ट्राईक (2016) आणि पुलवामा-बालाकोट युद्ध (2019) या सर्व हल्ल्यांचा विचार केला तर प्रत्येक हल्ल्यानंतर भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. कधी शेअर बाजार वधारला तर कधी शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आता देखील पुन्हा झालेल्या शेअर बाजारात सुरुवातीला घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पुन्हा एकदा शेअर बाजारात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
Operation Sindoor: सोन्याच्या किंमतीवरही पाकिस्तान हल्ल्याचा परीणाम, तब्बल 4 हजारांनी वाढला भाव
आजच्या सुरुवातीला, बीएसई सेन्सेक्स 180.48 अंकांनी किंवा 0.22% ने घसरून 80,460.59 अंकांवर उघडला होता. त्याच वेळी, एनएसई निफ्टी 25.60 अंकांनी म्हणजेच 0.11% च्या घसरणीसह 24,354.00 वर उघडला. आम्ही तुम्हाला सांगतो की याआधी GIFT निफ्टीने थोडीशी नकारात्मक सुरुवात दर्शविली होती. सकाळी 7:03 वाजता, गिफ्ट निफ्टी 104 अंकांनी किंवा 0.43% ने घसरून 24,308 वर बंद झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा यामध्ये वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.
सकाळी 9:30 वाजता सेन्सेक्स 80,761.92 अंकांवर पोहोचला. त्यात 120.85 अंकांनी म्हणजेच 0.15% वाढ झाली. त्याच वेळी, निफ्टी 52.80 (0.22%) अंकांनी वाढून 24,432.40 वर व्यवहार करत आहे.