Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: दहशवाद्यांना पोसण्यासाठी पाकिस्तान खेळतोय ‘इतक्या’ पैशांचा खेळ, रक्कम वाचून फुटेल घाम

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी दिलेल्या धमकीनंतर काही दिवसांतच हा दहशतवादी हल्ला झाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 24, 2025 | 05:22 PM
दहशवाद्यांना पोसण्यासाठी पाकिस्तान खेळतोय 'इतक्या' पैशांचा खेळ, रक्कम वाचून फुटेल घाम (फोटो सौजन्य-X)

दहशवाद्यांना पोसण्यासाठी पाकिस्तान खेळतोय 'इतक्या' पैशांचा खेळ, रक्कम वाचून फुटेल घाम (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Pahalgam Terror Attack Update : जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाल्याने जग हादरले आहे. दहशतवाद्यांनी प्रसिद्ध पर्यटन स्थळ पहलगामला त्यांच्या कुटुंबासह भेट देणाऱ्या पर्यटकांना लक्ष्य केले, ज्यांचा काश्मीरच्या राजकारणाशी आणि तिथे घडणाऱ्या घटनांशी काहीही संबंध नव्हता. पर्यटकांवरील हल्ल्याचा जगभरात निषेध करण्यात आला आहे. त्याहूनही भयानक गोष्ट म्हणजे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, लोकांना त्यांची ओळख विचारल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा निर्माण झाला आहे.

Pahalgam Terror Attack : पाचगणी टेबल लँड बंद ; पहलगाम येथे हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आज तिसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मधुबनी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना म्हटले की, ज्या दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना मारले आहे आणि ज्यांनी यासाठी कट रचला आहे त्यांना कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा दिली जाईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटने घेतली आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख पाकिस्तानात राहतो, त्यामुळे या हल्ल्यामागील कटही पाकिस्तानशी जोडला गेला आहे. पण तुम्हाला माहितीय का?पाकिस्तान दरवर्षी या दहशतवाद्यांना पोसण्यासाठी किती पैसे खर्च करतो.

दहशतवाद्यांना पोसण्यासाठी पाकिस्तान किती खर्च करते?

एन.एस., कोलंबिया विद्यापीठ, यूएसएच्या जम्मू आणि काश्मीर रिसर्च जर्नलमध्ये दहशतवादी वित्तपुरवठा आणि समर्थन संरचना या विषयातील संशोधन अभ्यासक. भारतात दहशतवाद टिकवून ठेवण्यासाठी पाकिस्तान दरवर्षी किती पैसे खर्च करतो हे जामवाल यांनी सांगितले आहे. या जर्नलनुसार, पाकिस्तान सीमेपलीकडून भारतात दहशत निर्माण करण्यासाठी दरवर्षी सुमारे ५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे ४२ कोटी रुपये) खर्च करतो. त्याच वेळी, भारत सरकार हे दहशतवादी हल्ले संपवण्यासाठी दरवर्षी ७३० कोटी रुपये खर्च करते. एन.एस. जमवाल यांनी त्यांच्या संशोधन जर्नलमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांवर दरवर्षी सुमारे ७९ ते ८० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (म्हणजे ६८३ कोटी रुपये) खर्च करतो. हा खर्च दहशतवाद्यांची भरती करणे, हल्ले करणे आणि दहशतवाद्यांना पगार देणे यावर खर्च केला जातो.

दहशतवाद्यांसाठी भरती शुल्क

काश्मीरमध्ये दहशत पसरवण्यासाठी पाकिस्तान देशी आणि परदेशी दहशतवाद्यांचा वापर करतो. परदेशी दहशतवाद्यांची भरती करण्यासाठी पाकिस्तान ५०,००० रुपये देतो. तर लोकर काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांना २५,००० रुपये देतो. यासोबतच, पाकिस्तान दरमहा दहशतवाद्यांना पगार देखील देतो, ज्यामध्ये परदेशी दहशतवाद्यांना १० ते १२ हजार रुपये आणि स्थानिक दहशतवाद्यांना ८ ते १० हजार रुपये पगार दिला जातो.

दहशतवाद्यांवर खर्च करणे

पैसे देण्याचा प्रकार  परदेशी दहशतवादी स्थानिक (काश्मीर + पाकिस्तानमधील दहशतवादी)
दहशतवादी भरती 50,000/- 25,000/-
मासिक पेमेंट १० ते १२ हजार रुपये ८ ते १० हजार रुपये
वर्षअखेरीस पेमेंट २ ते २.५ लाख रुपये २ ते २.५ लाख रुपये
दहशतवादी घटनेसाठी १ ते २ लाख रुपये १ ते २ लाख रुपये
दहशतवादाच्या सर्वोच्च नेत्याला  ५० हजार रुपये दिले जातात  ५० हजार रुपये दिले जातात

दहशतवादी म्होरक्याचा पगार

पाकिस्तानी दहशतवाद्यांचेही नेते आहेत, ज्यांना पाकिस्तान स्थानिक आणि परदेशी नेत्यांना मासिक ५०,००० रुपये पगार देतो. जेव्हा जेव्हा या दहशतवाद्यांना हल्ला करण्यासाठी पाठवले जाते तेव्हा त्यांच्या गटाला १ ते २ लाख रुपयांचा निधी दिला जातो. त्याचबरोबर, दहशतवाद्यांनी वर्षभरात केलेल्या गुन्ह्यांवर आधारित दरवर्षी २ ते अडीच लाख रुपयांचे बक्षीस देखील दिले जाते.

प्रशिक्षण आणि उपकरणांवर होणारा खर्च

पाकिस्तानने भरती केलेल्या दहशतवाद्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. ज्यामध्ये एका दहशतवाद्याला प्रशिक्षण देण्यासाठी सुमारे २५ हजार रुपये खर्च येतो. याशिवाय दहशतवाद्यांना दिलेल्या ड्रेस आणि उपकरणांवर २५ ते ३० हजार रुपये खर्च येतात.

दहशतवाद्यांवर खर्च करणे

दहशतवादी कारवाई अंदाजे खर्च
प्रशिक्षणावर २५ हजार रुपये खर्च
कपडे आणि उपकरणांवर  २५ ते ३० हजार रुपये खर्च
पाकिस्तानमधील मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना  २ लाख रुपयांची मदत
जम्मू-काश्मीरमधील मृत काश्मिरी दहशतवाद्याच्या कुटुंबाला  २०,००० रुपयांची मदत
दहशतवाद्यांच्या मदतीला  १० ते २० हजार रुपये
नवीन दहशतवादी जोडण्यासाठी  ५ ते १० हजार रुपये

 

दहशतवाद्याच्या मृत्यूबद्दल कुटुंबाला मदत

चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तान आर्थिक मदत करतो, ज्या अंतर्गत पाकिस्तान मारल्या गेलेल्या परदेशी दहशतवाद्याच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांपर्यंतची मदत देतो. काश्मीरमधील स्थानिक दहशतवादी मारला गेल्यावर त्याच्या कुटुंबाला दरमहा २०,००० रुपये आणि २००० ते ३,००० रुपये मदत म्हणून दिले जातात.

Pahalgam Terror Attack: भारताने सिंधू जल करारला स्थगिती देताच पाकिस्तानही चवताळला; ‘हा’ महत्त्वाचा करार करणार रद्द?

Web Title: Pahalgam terror attack how much does pakistan spend to feed terrorists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 05:22 PM

Topics:  

  • jammu kashmir
  • pahalgam
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर
1

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर

जम्मू काश्मीरमध्ये थरार! Indian Army ने 7 दहशतवाद्यांना घेरलं; उधमपुर अन् किश्तवाडमध्ये सैन्याने थेट…
2

जम्मू काश्मीरमध्ये थरार! Indian Army ने 7 दहशतवाद्यांना घेरलं; उधमपुर अन् किश्तवाडमध्ये सैन्याने थेट…

‘अफगाणिस्तानच्या नावाखाली दहशतवाद पसरवू नका’ ; भारताने पुन्हा UN मध्ये पाकिस्तानला फटकारले
3

‘अफगाणिस्तानच्या नावाखाली दहशतवाद पसरवू नका’ ; भारताने पुन्हा UN मध्ये पाकिस्तानला फटकारले

Kulgam Terror Attack: मोठी बातमी! कुलगाम चकमकीत सुरक्षा दलांचे 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, ३ सैनिक जखमी
4

Kulgam Terror Attack: मोठी बातमी! कुलगाम चकमकीत सुरक्षा दलांचे 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, ३ सैनिक जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.