Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ चकमक; ३ अतिरेक्यांना वेढले

Jammu & Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. २०२६ मधील या पहिल्या मोठ्या ऑपरेशनमध्ये ३ दहशतवाद्यांना जवानांनी वेढले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 07, 2026 | 08:01 PM
जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ चकमक (Photo Credit- X)

जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ चकमक (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • २०२६ मधील पहिले मोठे ऑपरेशन!
  • जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ चकमक
  • ३ अतिरेक्यांना वेढले
Jammu & Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कठुआ (Kathua) जिल्ह्यात नवीन वर्षातील पहिले मोठे दहशतवादविरोधी ऑपरेशन सुरू झाले आहे. जिल्ह्यातील बिल्लावार भागातील कामड नाला परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू असून, लष्कराने तीन दहशतवाद्यांना चहूकडून वेढले असल्याची माहिती समोर येत आहे.

नेमकी घटना काय?

बिल्लावार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामड नाला येथे दुपारी ४ च्या सुमारास स्थानिक नागरिकांनी संशयास्पद हालचाली पाहिल्या. या भागात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळताच, पोलिसांच्या SOG (Special Operations Group) पथकाने तातडीने परिसराला वेढा घातला. शोध मोहीम सुरू असतानाच, लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला, ज्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.

#BREAKING: Encounter breaks out between Pakistan sponsored terrorists and security forces in Kathua of Jammu & Kashmir. J&K Police SOG Kathua has engaged terrorists in the forests of Kamadh Nullah, Kathua. CASO was underway since morning. More details are awaited. — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) January 7, 2026

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…

मोठे ऑपरेशन: वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

हे २०२६ मधील पहिले मोठे लष्करी ऑपरेशन असल्याचे मानले जात आहे. या ऑपरेशनचे गांभीर्य लक्षात घेता आयजी जम्मू भीम सेन तुती स्वतः या मोहिमेवर लक्ष ठेवून असून त्यांनी चकमकीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एसएसपी कठुआ मोहिता शर्मा या देखील प्रत्यक्ष घटनास्थळावरून परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहेत. दहशतवाद्यांना पळून जाण्याची संधी मिळू नये म्हणून गावात अतिरिक्त सैन्य तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

लपण्याचे ठिकाण उद्ध्वस्त

या चकमकीच्या पार्श्वभूमीवर, नुकतेच बारामुल्ला जिल्ह्यातील शेरी भागातील सुचलीवारन जंगलात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे एक मोठे लपण्याचे ठिकाण उद्ध्वस्त केले होते. तिथून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता. यानंतर आता कठुआमधील ही चकमक सुरक्षा दलांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याचा गुन्हेगार कोण? एनआयएच्या आरोपपत्रात तीन नावे समोर

Web Title: A fierce encounter is underway between the army and terrorists in kathua jammu and kashmir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • jammu kashmir
  • Jammu Kashmir News
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

देशांतर्गत नवा आंदोलनाचा प्रकार! दगडफेकीच्या घटनेत तीव्र वाढ, सुरक्षा रक्षक होतायेत जखमी
1

देशांतर्गत नवा आंदोलनाचा प्रकार! दगडफेकीच्या घटनेत तीव्र वाढ, सुरक्षा रक्षक होतायेत जखमी

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…
2

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.