Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Torres Case Update: टोरेस कंपनीतून 1 कोटी 90 लाखांचा ऐवज पोलिसांकडून जप्त

मुंबईकरांना गंडा घालणारी टोरेस कंपनीबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. आता पोलिसांनी या कंपनीतून 1 कोटी 90 लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 11, 2025 | 10:03 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई/ सावन वैश्य: नवी मुंबई, मुंबई, तसेच परिसरातील अन्य 5 ठिकाणी शाखा असलेली, व सध्या वादाचा व चर्चेचा विषय ठरलेली टोरेस कंपनीने अनेक नागरिकांना, हजारो करोड रुपयांना फसवल्याची माहिती समोर आल्यावर गुंतवणूकदारांनी एपीएमसी पोलिसांना धाव घेतली होती. आर्थिक फसवणुकीची रक्कम मोठ्या प्रमाणात असल्याने सदरचा तपासा आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आला होता. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या पंचनाम्यात सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐकून जवळपास 1 कोटी 90 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदरचा ऐवज हा तुर्भेतील टोरेस कार्यालयाच्या तळमजल्यात असलेल्या लॉकरमध्ये जमा करून ठेवला होता. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

90 तास काम करण्याच्या फॉर्म्युल्यावर Bajaj Auto च्या मॅनेजिंग डायरेक्टरचे परखड मत, म्हणाले…

दादर शाखेत झालेल्या गडबडीमुळे नवी मुंबई पोलिसांचा प्लॅन फसला

विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार टोरेस कंपनीच्या दादर, तुर्भे, कल्याण, मिरा रोड व कांदिवली या पाच ठिकाणी शाखा आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे या पाचही शाखेच्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून, एकाच वेळी पाच ठिकाणी छापा मारण्यासाठी तयारी करत होते. जेणेकरून एकाच वेळी जास्त मुद्देमाल हस्तगत करून मुख्य आरोपींना बेड्या ठोकता येईल. मात्र छापा मारण्याच्या एक दिवस अगोदर दादर शाखेत झालेल्या गडबडीमुळे नवी मुंबई पोलिसांचा प्लॅन फसला. अन्यथा नवी मुंबई पोलिसांनी या मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश करून आरोपींना जेर बंद करण्यात यश संपादन करता आले असते. तसेच ग्राहकांना आर्थिक फसवणुकीपासून बचाव करण्यात यश आले असते.

व्यवसाय करण्याची जिद्द, सरकारची साथ आणि आता 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, ‘या’ शेतकऱ्याची Success Story वाचाच

दादरमधील भाजी विक्रेत्याने गुंतवले होते तब्बल 4 कोटी रुपये

प्रदीपकुमार वैश्य (वय 31 वर्षे) नावाच्या दादरमधील भाजी विकेत्याने Torres Company मध्ये तब्बल 4 कोटींची गुंतवणूक केली होती. त्यांना वाटले की लवकरच त्यांना याचा चांगला परतवा मिळेल. पण असेल झालीये नाही. उलट कंपनीच्या मालकानेच ग्राहकांना धोका देत पळ काढला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रदीपकुमार यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. विशेष म्हणजे दादरमधील टोरेसच्या शोरूमजवळच प्रदीमकुमार यांचा भाजीपाल्याचे दुकानं होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढा पैसा भाजी विक्रेत्याकडे आला कसा? तर याचे उत्तर स्वतःच वैश्य यांनी दिले आहे. पत्नी, कुटुंबीय, मित्र परिवारासह अनेकांकडून पैसे घेऊन व घर गहाण ठेवून एकूण 4 कोटी 27 हजार रूपयांची गुंतवणूक केल्याचे प्रदीपकुमार यांनी सांगितले. आता ही रक्कम त्यांना पुन्हा परत मिळणार का मोठा प्रश्न प्रदीपकुमार वैश्य यांच्यासमोर आहे.

Web Title: Police seized 1 crore 90 lakh compensation from torres company

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 09:35 PM

Topics:  

  • Business News
  • Torres Company

संबंधित बातम्या

आघाडीचा फॅशन ब्रॅंड Libas चे मुंबईत नवे स्टोअर सुरु, वर्षाअखेरपर्यंत 50 पेक्षा जास्त शाखा उघडण्याचे लक्ष
1

आघाडीचा फॅशन ब्रॅंड Libas चे मुंबईत नवे स्टोअर सुरु, वर्षाअखेरपर्यंत 50 पेक्षा जास्त शाखा उघडण्याचे लक्ष

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या
2

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या

दिवाळीपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट! छोट्या गाड्या आणि विमा प्रीमियमवरील GST होऊ शकतो कमी
3

दिवाळीपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट! छोट्या गाड्या आणि विमा प्रीमियमवरील GST होऊ शकतो कमी

GST २.० मुळे बाजारात उत्साह, सेन्सेक्स ६७६ अंकांनी वधारला; निफ्टी २४८७६ वर बंद झाला, ऑटो आणि रिअल्टी क्षेत्र चमकले
4

GST २.० मुळे बाजारात उत्साह, सेन्सेक्स ६७६ अंकांनी वधारला; निफ्टी २४८७६ वर बंद झाला, ऑटो आणि रिअल्टी क्षेत्र चमकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.