Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तलाव, प्रायव्हेट पूल, रूम…खुप काही; 8,000 कोटींचा लक्झरी प्रोजेक्ट; ‘या’ शहराने मुंबई, दिल्लीलाही टाकलंय मागे!

डीएलएफ कंपनीने गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स रोडवरील ‘द डहालियास’ प्रकल्पाची सध्या चांगलीच चर्चा आहे. त्यामुळे आता गुरुग्रामने आता दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला देखील मागे टाकले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 05, 2024 | 09:08 PM
तलाव, प्रायव्हेट पूल, रूम…खुप काही; 8,000 कोटींचा लक्झरी प्रोजेक्ट; ‘या’ शहराने मुंबई, दिल्लीलाही टाकलंय मागे!

तलाव, प्रायव्हेट पूल, रूम…खुप काही; 8,000 कोटींचा लक्झरी प्रोजेक्ट; ‘या’ शहराने मुंबई, दिल्लीलाही टाकलंय मागे!

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या रिअल इस्टेट इतिहासातील सर्वात महागड्या प्रकल्पाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. हा प्रकल्प आर्थिक राजधानी मुंबईत किंवा दिल्लीत नसून गुरुग्राममध्ये आहे. लक्झरी प्रकल्प नव्हे स्वर्गच म्हणता येईल. डीएलएफ गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स रोडवर ‘द डहालियास’ हा आणखी एक शानदार प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत आहे. हा प्रकल्प कंपनीचे टॉप सीईओ आणि उच्च नेटवर्थ व्यक्ती राहत असलेल्या ‘द कॅमेलियास’च्या समोर असेल. या महागड्या प्रकल्पाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत…

सर्वात मोठी रियल्टी कंपनी असलेली डीएलएफ गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स रोडवरील ‘द डहालियास’ प्रकल्पाची सध्या चांगलीच चर्चा आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पावरुन असे म्हटले जात आहे की, गुरुग्रामने आता दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला देखील मागे टाकले आहे, गुरुग्राम भारतातील सर्वात महागडे रिअल इस्टेट मार्केट बनले आहे.

लक्झरी प्रकल्पात कोणत्या सुविधा मिळणार?

‘द डहालियास‘ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांना 2 लाख चौरस फुटांचे क्लबहाऊस मिळणार आहे. हे क्लबहाऊस कॅमेलियासच्या क्लबहाऊसपेक्षा दुप्पट मोठे आहे. यात खासगी थिएटर, पोकर रूम, बॉलिंग गल्ली, पूल रूम, इनडोअर टेबल टेनिस, स्क्वॅश कोर्ट, मसाज रूम, स्पा, आईस बाथ, 2 पूल, कोल्ड ब्लँप आणि हॉट डुबकी अशा सुविधा असतील.

हे देखील वाचा – बटाट्याची ऑर्डर मिळताच ‘या’ शेअरची जोरदार उसळी; वर्षभरात गुंतवणूकदारांना दिला 5000 टक्के परतावा!

टेनिस, बास्केटबॉल कोर्ट, कृत्रिम तलावही

‘द डहालियास’ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांना मैदानी सेक्शनमध्ये टेनिस, बास्केटबॉल कोर्ट सारख्या क्रीडा सुविधाही असतील. याशिवाय कृत्रिम तलावाचा ही आनंद घेता येणार आहे.

400 सुपर लक्झरी अपार्टमेंट

‘द डहालियास’ या प्रकल्पाच्या उभारणीसाठी डीएलएफ 8 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पात 17 एकर जागेवर सुमारे 400 सुपर लक्झरी अपार्टमेंट बांधण्यात येणार आहेत. अपार्टमेंटचा आकार 9 हजार 500 चौरस फूट ते 16 हजार चौरस फूट असेल. तर सरासरी आकार 11 हजार चौरस फूट असेल.

किंमत 80 हजार रुपये प्रति चौरस फूट

‘द डहालियास’ या प्रकल्पाच्या लक्झरी अपार्टमेंटची किंमत 80 हजार रुपये प्रति चौरस फूट असेल. त्यानुसार प्रत्येक फ्लॅटचे सरासरी तिकीट आकार सुमारे 100 कोटी रुपये असेल. अलीकडेच DLF चे व्यवस्थापकीय संचालक अशोक त्यागी यांनी बाजार तज्ज्ञांशी कॉन्फरन्स कॉलमध्ये संवाद साधला.

अशोक त्यागी यांनी सांगितले की, सध्याच्या लाँचपूर्व किंमतींच्या आधारे गुरुग्राममधील या नवीन सुपर-लक्झरी प्रकल्पातून कंपनीला 26 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पातील अपार्टमेंटचा किमान आकार 10 हजार 300 चौरस फूट आहे.

Web Title: Pools private pools room so much more 8000 crore luxury project gurugram city has left mumbai and delhi behind

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 09:08 PM

Topics:  

  • delhi
  • Mumbai

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार
3

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
4

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.