Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Post Office ची ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम योजना; गुंतवणुकीवर मिळतोय जबरदस्त व्याज परतावा

पोस्टाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठीची योजना ही सुरक्षितता आणि उत्तम परतावा देते. असंख्य ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेमध्ये गुंतवणूक केली आहे आणि त्यांना उत्तम परतावा मिळत आहे. जाणून घेऊया या योजनेबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Dec 17, 2024 | 05:01 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करताना ती सुरक्षित असावी आणि त्याचा जास्तीजास्त परतावा मिळावा हे दोन प्रमुख मुद्दे समोर ठेऊनच गुंतवणूक केली जाते. त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांना या दोन्ही मुद्द्यांमुळे लोकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद लाभला आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोस्टाच्या अनेक योजनांमध्ये देशातील करोडो लोकांनी गुतंवणूक केली आहे. त्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात प्रभावी ठरणारी स्किम आहे, ज्येष्ठ नागरिक बचत योजना ( SCSS). या योजनेतील गुंतवणूक ही ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितता आणि उत्तम परतावा देते त्यामुळे त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान होते. जाणून घेऊया या योजनेबद्दल आणि त्यामुळे मिळणाऱ्या फायद्यांबद्दल

पोस्टाकडून 2004 मध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना सुरु करण्यात आली. ही योजनाना 60 वर्षे आणि त्याहून जास्त वयाच्या भारतीय नागरिकांसाठी आहे. सध्या या योजनेवर मिळणारा व्याजदर हा तब्बल 8.2 टक्के इतका आहे.रक्कमेवर मिळत असलेला हा व्याजदर अलीकडच्या काळात देऊ केलेल्या उच्च परताव्याच्या लहान बचत योजनांपैकी एक योजना बनवतो.

सनातन टेक्स्टाईल्स लिमिटेडची IPO Offer 19 डिसेंबर पासून, प्राईस बँड असेल असा

योजनेचे वैशिष्ट्ये

ज्येष्ठ नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करतात त्यावेळी त्याचा कालावधी ठरवतात.  तेव्हा असलेला व्याजदर गुंतवणुकीवर योजनेच्या कालावधी पूर्ण होईपर्यंत स्थिर राहतो तो बदलत नाही हे या योजनेचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य आहे. तसेच योजनेच्या 8.2 टक्के असलेल्या व्याजदरासोबतच कलम 80C अंतर्गत कर लाभ देखील या योजनेमध्ये उपलब्ध आहे. तीन महिन्याच्या अतंराने व्याज तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाते.

योजनेच्या गुंतवणुकीची रक्कम 

राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक बचत योजने  Senior citizen saving scheme अंतर्गत गुंतवणुकदार हे किमान  1,000  रुपये ते  30 लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतात.

योजनेचा कालावधी

ज्येष्ठ नागरिक बचत योजना कालावधी हा पाच वर्षाचा आहे. यामध्ये जास्तीत जास्त 3 वर्षाची एकच मुदतवाढही दिली जाते. आयकर विभाग, 1961 च्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीसाठी SCSS करसवलत आहे.

Narayana Murthy : आठवड्याचे इतके तास काम करा, एकही सुट्टी घेऊ नका ; नारायण मूर्तीं आपल्या विधानावर ठाम

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) खाते कसे उघडायचे?

देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिस शाखेत ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते उघडू शकता. या योजनेसाठी खाते उघडण्याचा  फॉर्म भरावा लागेल आणि तो केवायसी कागदपत्रांच्या प्रतीसह सबमिट करावा लागेल. कागदपत्रांमध्ये व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि वयाच्या पुराव्यासह 2 पासपोर्ट आकाराचे फोटो यांचा समावेश होतो.

पोस्टाच्या या योजनेमध्ये देशातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केली आहे. त्यांना या योजनेद्वारे उत्तम व्याज परतावा मिळत आहे. त्यामुळे ज्यांना या योजनेमध्ये गुंतवणूक करायची आहे. त्यांनी तात्काळ नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेसाठी फॉर्म भरावा.

 

Web Title: Post offices best scheme for senior citizens offering huge interest returns on investment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 05:01 PM

Topics:  

  • Senior Citizen

संबंधित बातम्या

कसे बनवाल आयुष्मान वंदना कार्ड, वरिष्ठ नागरिकांना मिळणार मोफत आरोग्य सुविधा
1

कसे बनवाल आयुष्मान वंदना कार्ड, वरिष्ठ नागरिकांना मिळणार मोफत आरोग्य सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.