सनातन टेक्सटाईल्स आयपीओ
मुंबई: सनातन टेक्स्टाईल्स लिमिटेड कंपनीने आपल्या पहिल्याच आयपीओ खुल्या समभाग विक्रीसाठी प्राईसबँड प्रतिसमभाग रु. 305/- ते रु. 321/- दरम्यान असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या प्रत्येक समभागाचे फेस व्हॅल्यू रु.10/- आहे. सनातन टेक्स्टाईल्स लिमिटेड कंपनी वस्त्रोद्योगासाठी लागणारे विविध प्रकारचे धागे निर्माण करण्याच्या व्यवसायात आहे.
कंपनीकडून पॉलीस्टन, कॉटन, व तांत्रिक व औद्योगिक वापरसाठीच्या धाग्यांची निर्मिती केली जाते. सनातन टेक्स्टाईल्सची प्रस्तावित आयपीओ ऑफर गुरुवार दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी बोलीसाठी खुली करण्यात येणार असून ती सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान 46 समभागांच्या एका लॉट साठी बोली लावू शकतील व त्यापुढे 46 च्या पटीत समभागांसाठी बोली लावू शकतील (फोटो सौजन्य – Facebook)
कसा असेल आयपीओ
प्रस्तुत आयपीओमध्ये रु. 4000 दशलक्ष फ्रेश इश्यूचा आणि ऑफर फॉर सेल अंतर्गत रु. 1500 दशलक्ष मूल्याचा समावेश आहे. कंपनी फ्रेश इश्यूद्वारे मिळणाऱ्या भांडवलापैकी रु. 1600/- दशलक्ष रक्कम कंपनीवरील कर्जांची परतफेड, मुदतपूर्व फेड, व अंशत: फेड करण्यासाठी वापरणार आहे. तसेच कंपनी आपल्या सनातन पॉलीकॉट प्रायव्हेट लिमिटेड नामक उपकंपनीत रु. 1400/- दशलक्ष गुंतवणूक देखील याच भांडवलातून करणार आहे. सनातन पॉलीकॉट कंपनीवरील कर्जाची परतफेड व मुदतपूर्व फेड करण्यासाठी या रकमेचा वापर होणार आहे. तसेच या भांडवलापैकी काही भाग सामान्य कॉर्पोरेट हेतुंसाठी वापरण्यात येणार आहे.
मोजक्या कंपन्यांपैकी एक
देशात पॉलीस्टर, कॉटन व टेक्नीकल टेक्स्टाईल्स उद्योगा क्षेत्रात ज्या काही मोजक्या कंपन्या आहेत त्यात सनातन टेक्स्टाईल्स कंपनीचा समावेश होतो. टेक्नीकल टेक्स्टाईल्स मध्ये वाहन उद्योग, आरोग्यसेवा उद्योग, बांधकाम उद्योग, क्रिडा क्षेत्र, बाह्यक्रिडा क्षेत्र, व संरक्षक वस्त्र या क्षेत्रांसाठी सूत अथवा वस्त्र निर्मितीचा समावेश होतो.
सनातन टेक्स्टाईल्स लिमिटेड कंपनीच्या प्रचालन महसूला आधारे वित्तीय वर्ष 2024 मध्ये देशातील एकूण सूत उद्योग विक्री बाजारात 1.7 % हिस्सा असल्याची माहिती क्रिसिल अहवालात छापून आली आहे. सध्या कंपनीच्या एकाच कॉर्पोरेटतर्फे तिन्ही प्रकारच्या सूतांची निर्मिती केली जाते. यामुळे कंपनीला नव्या क्षेत्रात विस्तार करण्याची सुविधा प्राप्त झाली आहे. परिणामी विविध क्षेत्रातील ग्राहकांच्या मोठ्या संख्येला आम्ही सेवा उपलब्ध करु शकत आहोत.
अदानी,अंबांनींच्या संपत्तीत मोठी घट; अब्जाधीशांच्या ‘या’ यादीतील स्थानही गमावले
SKU चा देखील समावेश
30 सप्टेंबर 2024 रोजीच्या माहितीनुसार आपच्या सूत निर्मितीमध्ये तब्बल 3200 प्रकारच्या धाग्यांचा समावेश आहे. यात 1 एप्रिल 2021 ते 30 सप्टेंबर 2024 दरम्यानच्या उत्पादित उत्पादनांचा समावेश आहे. तसेच 4500 स्टॉक कीपींग युनिटचाही (एसकेयू) समावेश आहे. तसेच कंपनीकडे विविध प्रकारचे 14000 धागे निर्माण करण्याची व 190,000 स्टॉक कीपींग युनीटची क्षमता आहे. स्टॉक कीपींग युनिट विविध रुपात विविध प्रकारच्या उपयुक्ततेसाठी वापरले जातात.
तसेच कंपनीचे लक्ष डोप-डाईड, सुपरफाईन/मायक्रो, फंक्शनल, इंडस्ट्रीयल, टेक्नीकल धागे, कॅटीयॉनिक डायेबल, आणि स्पेशालीटी धागे यासारखी मूल्यवर्धित उत्पादने निर्माण करण्यावर केंद्रित आहे. अशा प्रकारची उत्पादने ग्राहकांच्या विशिष्ट गरजांसाठी कंपनीच्या खास उत्पादन व्यवस्थेअंतर्गत तयार केली जातात. यातून अत्यंत दर्जेदार व मान्यताप्राप्त उत्पादनांची निर्मिती केली जाते. सनातन टेक्स्टाईल्स कंपनीचा निर्मिती कारखाना सिल्व्हासा येथे असून त्याचा लक्षणीय विस्तार देखील करण्यात आला आहे. 30 जून 2024 रोजीच्या आकडेवारीनुसार या कारखान्याची एकूण निर्मिती क्षमता वार्षिक 223,750 मेट्रीक टन आहे.
किती समभाग
डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड आणि आयसीआयसीआय सिक्युरीटीज लिमिटेड या कंपन्या प्रस्तुत आयपीओच्या बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. तसेच केफीन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी ही आयपीओची रजिस्ट्रार कंपनी आहे.
कंपनीची आयपीओ ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारा सादर करण्यात येत असून एकूण समभागांपैकी 50 टक्क्यांपेक्षा अधिक समभाग अर्हताप्राप्त संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी उपलब्ध करण्यात येणार नाहीत. तसेच 15 टक्क्यांपेक्षा कमी समभाग बिगर संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी उपलब्ध करण्यात येणार नाहीत. तसेच किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्क्यांपेक्षा कमी समभाग उपलब्ध करण्यात येणार नाहीत.