Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market: धडाधड शेअर विकण्याच्या तयारी सरकारी बँक, 15 कंपनीचे लिस्टिंग; काय आहे पूर्ण प्लॅन

सरकारी बँकांनी अनेक संयुक्त उपक्रम आणि उपकंपन्या स्थापन केल्या आहेत. त्यांना आता या गुंतवणुकीतून नफा कमविण्यास सांगण्यात आले आहे. ते त्यात त्यांचा हिस्सा विकू शकतात किंवा दुसरा मार्ग शोधू शकतात.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 15, 2025 | 12:18 PM
बँक कशा मिळवणार गुंतवणुकीतून नफा (फोटो सौजन्य - iStock)

बँक कशा मिळवणार गुंतवणुकीतून नफा (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

अर्थ मंत्रालयाने सरकारी बँकांना त्यांच्या उपकंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे मुद्रीकरण करण्याबद्दल विचार करण्यास सांगितले आहे. बँकांनी त्यांच्या उपकंपन्यांचे शेअर बाजारात सूचिकृत करावे अशी मंत्रालयाची इच्छा आहे. यामुळे बँकांना चांगला परतावा मिळू शकेल. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारी बँकांच्या सुमारे १५ उपकंपन्या किंवा संयुक्त उपक्रम आयपीओ आणण्याची किंवा भागभांडवल विकण्याची तयारी करत आहेत. हे काम काही काळानंतर केले जाईल.

सूत्रांनी सांगितले की, बँकांनी त्यांच्या उपकंपन्यांमध्ये गुंतवणूक करून त्यांना पुढे नेले पाहिजे. योग्य वेळ आल्यावर बँका त्यांच्याकडून चांगला नफा मिळवू शकतात. पैसे कमवण्यापूर्वी बँकांना त्यांच्या उपकंपन्यांचे कामकाज सुधारावे लागेल. त्यांना व्यावसायिक पद्धतीने निर्णय घ्यावे लागतील आणि त्यांच्या कामाच्या पद्धती सुधाराव्या लागतील (फोटो सौजन्य – Google Gemini AI) 

लिस्टिंग प्लॅन

देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भविष्यात SBI जनरल इन्शुरन्स आणि SBI पेमेंट सर्व्हिसेसना शेअर बाजारात सूचीबद्ध करू शकते. पण हे तेव्हाच होईल जेव्हा या कंपन्या मोठ्या होतील. SBI जनरल इन्शुरन्स कंपनीची सुरुवात २४ फेब्रुवारी २००९ रोजी झाली. मार्च २०२५ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात या कंपनीने ५०९ कोटी रुपयांचा नफा कमावला. SBI च्या या विमा कंपनीने मार्च २०२५ मध्ये १० रुपयांचे ३,७१,६९३ शेअर्स वितरित केले. यानंतर, SBI जनरल इन्शुरन्स कंपनीमधील SBI चा हिस्सा ६९.१% वरून ६८.९% वर आला आहे.

Stock Market Today: कशी होणार आठवड्याची सुरुवात? तज्ज्ञांनी काय सांगितलं? जाणून घ्या

कसे करते काम 

त्याचप्रमाणे, एसबीआय पेमेंट सर्व्हिसेस व्यापाऱ्यांकडून पेमेंट घेण्याचे काम करते. एसबीआयचा त्यात ७४% हिस्सा आहे, तर उर्वरित २६% हिस्सा हिताची पेमेंट सर्व्हिसेसकडे आहे. एसबीआय पेमेंट्स ही देशातील सर्वात मोठ्या पेमेंट स्वीकारणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत, त्यांच्याकडे ३३.१ लाखांहून अधिक टच पॉइंट्स होते. यामध्ये १३.७ लाख पीओएस (पॉइंट ऑफ सेल्स) मशीन्स समाविष्ट आहेत, ज्या वेगवेगळ्या ठिकाणी बसवल्या आहेत. पीओएस मशीन्स म्हणजे ज्याद्वारे तुम्ही दुकानांमध्ये कार्ड स्वाइप करून पेमेंट करता.

सरकारी बँकांनी अनेक संयुक्त उपक्रम आणि उपकंपन्या स्थापन केल्या आहेत हे खरं असलं तरीही आता  त्यांना आता या गुंतवणुकीतून नफा कमविण्यास सांगण्यात आले आहे आणि या मिळवलेल्या नफ्यातून ते त्यात त्यांचा हिस्सा विकू शकतात अथवा कोणताही दुसरा मार्ग त्यांना शोधता येऊ शकतो. बँकांनी त्यांच्या गुंतवणुकीचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करावा अशी सरकारची इच्छा आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या किंमतीत पुन्हा झाली घसरण! 24 कॅरेटसाठी मोजावे लागणार केवळ इतके रुपये

टीपः गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन असते. जर तुम्हाला यामध्ये पैसे गुंतवायचे असतील तर प्रथम प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या नफ्यासाठी किंवा तोट्यासाठी Navarashtra.com जबाबदार राहणार नाही.

Web Title: Public sector or banks monetizing investments in subsidiaries business news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 10:59 AM

Topics:  

  • Bank
  • Business News
  • MONEY

संबंधित बातम्या

IDBI Bank: आयडीबीआयचे खासगीकरण! ६१% हिस्स्यासाठी कोटक महिंद्रा बँक आघाडीवर?
1

IDBI Bank: आयडीबीआयचे खासगीकरण! ६१% हिस्स्यासाठी कोटक महिंद्रा बँक आघाडीवर?

WHEF  मुंबईत आयोजन; जागतिक गुंतवणूक, विकास, उद्योजकतेचा विस्तारावर होणार बैठक
2

WHEF मुंबईत आयोजन; जागतिक गुंतवणूक, विकास, उद्योजकतेचा विस्तारावर होणार बैठक

Middle Class EMI: “मुंबईतील प्रदूषित समुद्र पाहण्यासाठी ५,००,००० चा ईएमआय”, मध्यमवर्गीयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला
3

Middle Class EMI: “मुंबईतील प्रदूषित समुद्र पाहण्यासाठी ५,००,००० चा ईएमआय”, मध्यमवर्गीयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला

प्रगत Data Analytics मुळे Insurance क्षेत्र अजून ॲडव्हान्स होतंय! ग्राहकांना याचा कोणता फायदा होणार?
4

प्रगत Data Analytics मुळे Insurance क्षेत्र अजून ॲडव्हान्स होतंय! ग्राहकांना याचा कोणता फायदा होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.