Stock Market Today: कशी होणार आठवड्याची सुरुवात? तज्ज्ञांनी काय सांगितलं? जाणून घ्या
३० जून रोजी आज आठवड्याची सुरुवात कशी होणार आहे? गुंतवणूकदारांसाठी कोणते शेअर्स फायद्याचे ठरणार आहेत? याबाबत तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे, जाणून घेऊया. इस्रायल-इराण संघर्ष कमी होण्याबाबत आणि अमेरिका-चीन व्यापार कराराबद्दल आशावाद याच जागतिक बाजारातील उत्साही संकेतांचा मागोवा घेत तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, आज ३० जून रोजी सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, तेजीत उघडण्याची शक्यता आहे.
गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड ३० जून रोजी आज भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गेल्या आठवड्यात निफ्टी ५० ने निर्णायक ब्रेकआउट दिला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक २३७.२० अंकांनी म्हणजेच ०.४१% ने वाढून ५७,४४३.९० वर बंद झाला. आठवड्यात, निर्देशांक २.१२% च्या मजबूत वाढीसह बंद झाला, जो सलग दुसऱ्या आठवड्यात वाढला आणि ५७,४७५.४० या नवीन सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला. (फोटो सौजन्य – Pinterest)
आजच्या व्यवहरात गुंतवणूकदारांसाठी टाटा स्टील, वारी एनर्जीज, माझगाव डॉक शिपबिल्डर्स, टोरेंट फार्मा, आयआरसीटीसी, भेल, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, एनएलसी इंडिया, अदानी एंटरप्रायझेस, एशियन पेंट्स हे शेअर्स अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. तज्ज्ञांनी देखील गुंतवकणूदारांसाठी काही शेअर्सची शिफारस केली आहे. प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतणूकदारांसाठी नॅटको फार्मा, आयएफसीआय आणि भारत डायनॅमिक्स या शेअर्सची शिफारस केली आहे.
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना एनडीआर ऑटो कंपोनेंट्स, इंद्रप्रस्थ मेडिकल कॉर्पोरेशन, एलटी फूड्स, रेडिंग्टन आणि एसएमएल इसुझू हे पाच ब्रेकआउट स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. भारतीय शेअर्स बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतणूकदारांना भारती एअरटेल लिमिटेड, एसआरएफ लिमिटेड, एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, चंबळ फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड, डीएलएफ लिमिटेड, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि एनओसीआयएल लिमिटेड हे शेअर्स करेदी करण्याची शिफारस केली आहे.
Tech Tips: तुमच्या नव्या Washing Machine ला खटारा बनवतील या चूका, वेळीच टाळा नाहीतर होईल मोठं नुकसान
३० जून रोजी आज गुंतवणूकदारांना १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्यासाठी तज्ज्ञांनी काही स्टॉक्सची शिफारस केली. ज्यामध्ये मुक्ता आर्ट्स, रतनइंडिया एंटरप्रायझेस, आयएफसीआय, सुझलॉन एनर्जी आणि निवा बुपा, एएमजे लँड होल्डिंग्ज यांचा समावेश आहे.