हमीभाव कायद्यासाठी सरकारला घेरणार; विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा शेतकरी नेत्यांना शब्द!
“काँग्रेस पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात कायद्याने शेतकऱ्याने हमीभाव मिळण्यासाठी पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने असेल. असे म्हटले होते. विशेष म्हणजे पक्षाने यासाठी एक मूल्यांकन केले आहे आणि ते लागू केले जाऊ शकते. याबाबत पक्षाची नुकतीच एक बैठक घेण्यात आली आहे, ज्यामध्ये आम्ही इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांशी चर्चा करू आणि देशातील शेतकऱ्यांसाठी हमीभाव कायदा लागू करण्यासाठी अर्थात त्यांच्या पिकांना निश्चित हमी देण्यासाठी सरकारवर दबाव आणू.” असे काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
१२ सदस्यीय शिष्टमंडळाने घेतली भेट
आज (ता.२४) शेतकरी नेत्यांच्या १२ सदस्यीय शिष्टमंडळाने राहुल गांधी यांची संसदेत भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून पंजाब आणि हरियाणा राज्यातील शेतकरी हमीभाव कायद्यासाठी आंदोलन करत आहे. या आंदोलनामागे असलेलया प्रमुख शेतकरी संघटना किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चाने नुकतीच सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत लोकसभेत हमीभाव कायद्यासाठीचे विधेयक मांडण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले होते.
हेही वाचा : अर्थसंकल्पात ‘या’ राज्याला मिळाला सर्वाधिक निधी; वाचा… राज्यनिहाय यादी!
शेतकऱ्यांसाठी सरकारला संसदेत घेरणार
याच पार्श्वभूमीवर आज या संघटनांच्या १२ सदस्यीय शिष्टमंडळाने राहुल गांधी यांची भेट घेतली. अशातच या बैठकीत किमान आधारभूत किंमतीसाठी (एमएसपी) सरकारवर दबाव आणण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी विरोधी पक्षनेत्यांकडे केली. त्यावेळी राहुल गांधी यांनी शेतकरी नेत्यांना शब्द देत म्हटले आहे आहे की, काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, इंडिया आघाडीतील सर्व पक्षांना सोबा आपण शेतकऱ्यांसाठी सरकारला संसदेत घेरू, असा शब्दही त्यांनी शेतकरी नेत्यांना दिला आहे.
पंतप्रधानांना जाब विचारणार
यावेळी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना शेतकऱ्यांच्या समस्या सांगितल्या. या बैठकीला काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल, अमरिंदर सिंग राजा वारिंग, सुखजिंदर सिंग रंधावा, गुरजित सिंग औजला, धर्मवीर गांधी, डॉ. अमर सिंग, दीपेंदर सिंग हुडा आणि जय प्रकाश हेही उपस्थित होते. दरम्यान, शेतकरी नेत्यांना आज (ता.२४) आपल्या भेटीसाठी संसदेत प्रवेश दिला जात नव्हता. यावरून देखील आपण पंतप्रधानांना जाब विचारणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.