
गुगल पहिल्या ऑफरला दिला नकार...; आणि एका वर्षानंतर केली इतक्या अब्ज डॉलर्सची विक्रमी डील
Google New Deal With Israel : गुगलने एका इस्रायली स्टार्टअपला विकत घेण्यासाठी २ लाख कोटी रुपयांची ऑफर दिली होती, पण त्यावेळी स्टार्टअपने ही ऑफर नाकारली. मात्र, पुन्हा एक वर्षानंतर या स्टार्टअपने सहमती दर्शवत अवघ्या एका वर्षात विक्रमी किंमत मिळाली आहे. गुगलने आता त्या कंपनीला ३२ अब्ज डॉलर्स अंदाजे २.८ लाख कोटी रुपये देऊन खरेदीसाठी सहमती दर्शविली आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागाने संबंधित कराराला कायदेशीर मान्यता देऊन कराराशी संबंधित अविश्वास प्रकरणाचा घेत असल्याचे सांगितले. निश्चित ते तंत्रज्ञानाच्या इतिहासातील सर्वात मोठे पाऊल असेल. टेक स्टार्टअपला २०२४ मध्ये विकत घेण्यासाठी २३ अब्ज डॉलर्सची ऑफर गुगलने देऊ केली होती. कंपनीचे सह-संस्थापक तसेच, सीईओ असफ रॅपापोर्ट यांनी मात्र ही ऑफर नाकारली. परंतु, अवघ्या एका वर्षात कंपनीची किंमत १ लाख कोटी रुपयांनी वाढल्याने त्या स्टार्टअप कंपनीला प्रचंड फायदा झाला.
हेही वाचा : NMIA येथे २४ तास आरोग्यसेवा: एनएमआयए आणि अपोलो हॉस्पिटल्सचा संयुक्त उपक्रम
इस्राईल स्टार्टअपच्या संस्थापकाने सुरुवातीला विक्रीसाठी नकार दिला, परंतु गुगलने हा करार सुरू राहू दिला. गुगलने ३२ अब्ज डॉलर्स अर्थात अंदाजे ३ लाख कोटी रुपयांचा हा करार मंजूर केला, जो सायबरसुरक्षा इतिहासातील सर्वात मोठा करार मानलाजात आहे. 2025 मार्चमध्ये दोन्ही कंपन्यांमध्ये हा करार अंतिम झाला असून २०२६ च्या सुरुवातीला हा करार पूर्ण होण्याची शक्यता आहे.
इस्रायलमध्ये ‘विझ’ ही सायबरसुरक्षा कंपनी सुरु करण्यात आली. ज्याचे मुख्यालय न्यू यॉर्कमध्ये आहे. ही स्टार्टअप कंपनी क्लाउड-आधारित सायबरसुरक्षा क्षेत्रात खूप चांगलं काम करत आहे. मायक्रोसॉफ्ट अझ्युर, गुगल क्लाउड आणि अमेझॉन वेब सर्व्हिसेस सारख्या कंपन्यांना सेवा प्रदान करत असते. मॉर्गन स्टॅनली आणि डॉक्युसाइन सारख्या कंपन्यांनीही यावर विश्वास व्यक्त केला आहे.
या इस्रायली कंपनीचा व्यवसाय अमेरिका, युरोप आणि आशियातील अनेक देशांमध्येही विस्तारला असून ही कंपनी हजाराहून अधिक लोकांना रोजगार देते. गुगलचा क्लाउड विभाग अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यासाठी त्यांना विकत घेण्याची तयारी करत आहे. हा करार नियामक मान्यता मिळाल्यानंतर आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून करार पूर्ण झाल्यानंतरही, कंपनीचे कर्मचारी त्यांच्या संबंधित ठिकाणीच राहतील.