
Flex by Google Pay: गुगलने भारतात लाँच केलं Credit Card! असे आहेत खास फीचर्स, जाणून घ्या सविस्तर
एका ब्लॉग पोस्टमध्ये, माउंटेन व्यू-बेस्ड टेक जायंटने Flex by Google Pay नावाचे त्यांचे क्रेडिट लाइन प्रोडक्ट आणि अॅक्सिस बँकसह पार्टनरशिप करून पहिला क्रेडिट कार्ड लाँच करण्याची घोषणा केली आहे. भारतात केवळ 50 मिलियन क्रेडिट कार्ड होल्डर असल्याचे सांगितलं आहे. यासोबतच कंपनीने असा दावा देखील केला आहे की, हा निर्णय यूजर्सचा क्रेडिट अॅक्सेस अधिक चांगला बनवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
Google has announced Flex Credit Card with Google Pay in India. It would show in the “Money” menu in GPay. Currently in partnership with Axis Bank (more to come in the future) Can you see the card option in your Google Pay app? pic.twitter.com/KrG8YWn0W8 — Mukul Sharma (@stufflistings) December 17, 2025
सोप्या शब्दांत बोलायचं झालं तर, Flex एक UPI-पावर्ड, डिजिटल को-ब्रांडेड क्रेडिट कार्ड आहे, जे पूर्णपणे Google Pay अॅपमध्ये आहे. यूजर्स कोणत्याही फिजिकल पेपरवर्कशिवाय अॅपमध्ये अगदी काही मिनिटांतच कार्डसाठी अप्लाय करू शकतात आणि अप्रुवल मिळवू शकतात. त्यानंतर काही वेळातच याचा वापर देखील सुरु करू शकतात. हे RuPay नेटवर्कवर तयार करण्यात आले आहे आणि याचा वापर लाखो ऑफलाइन आणि ऑनलाइन मर्चेंट्सवर पेमेंटसाठी केले जाऊ शकते, जो RuPay स्विकारतो. हि पद्धत अशीच आहे, जसे रेगुलर UPI ट्रांजेक्शन होते.
टेक दिग्गजने दिलेल्या माहितीनुसार, Flex अनेक वेगवेगळे फीचर्स ऑफर करतो, जो क्रेडिट एक्सपीरिएंस अगदी सोपा बनवतो. पहिले म्हणजे अर्ज आणि मंजुरी, जी पूर्णपणे डिजिटल पद्धतीने हाताळली जाते (गुगल म्हणते की याला फक्त काही मिनिटे लागतात). RuPay सोबतच्या एकात्मिकतेमुळे, हे क्रेडिट कार्ड आता जवळजवळ प्रत्येक लहान-मोठ्या स्टोअर आणि ऑनलाइन वेबसाइटवर स्वीकारले जाईल.
Google Pay आणि Axis Bank एक रिवॉर्ड सिस्टम देखील देत आहे, जिथे यूजर्सना ट्रांजेक्शन केल्यावर ‘स्टार्स’ मिळतात. कंपनीचं असं म्हणणं आहे की, प्रत्येक स्टारची किंमत 1 रुपये आहे आणि भविष्यातील कोणत्याही व्यवहारादरम्यान ते त्वरित रिडीम केले जाऊ शकते. यासोबतच ट्रेडिशनल क्रेडिट कार्डप्रमाणे, Flex कार्ड देखील एक फ्लेक्सिबल रीपेमेंट ऑप्शन देतो, जिथे यूजर्स पेमेंट पूर्ण करू शकतात किंवा त्यांचे बिल EMI मध्ये बदलू शकतात. याशिवाय, यूजर्सना इन-अॅप कंट्रोल्स देखील मिळणार आहे, जसे ट्रांजेक्शन लिमिट, कार्ड ब्लॉक आणि अनब्लॉक करणं किंवा PIN रीसेट करणं.