Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी मुकेश अंबानी, नीता अंबानी वॉशिंग्टनमध्ये; २० जानेवारीला ट्रम्प घेणार अध्यक्षपदाची शपथ

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी वॉशिंग्टनमध्ये शपथविधी समारंभापूर्वी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 19, 2025 | 07:43 PM
मुकेश अंबानी, नीता अंबानी यांनी शपथविधीआधी ट्रम्प यांची घेतली भेट ; २० जानेवारीला ट्रम्प घेणार अध्यक्षपदाची शपथ

मुकेश अंबानी, नीता अंबानी यांनी शपथविधीआधी ट्रम्प यांची घेतली भेट ; २० जानेवारीला ट्रम्प घेणार अध्यक्षपदाची शपथ

Follow Us
Close
Follow Us:

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी वॉशिंग्टनमध्ये शपथविधी समारंभापूर्वी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी समारंभ उद्या, २० जानेवारी रोजी होणार आहे.

IIT Baba : IIT बाबाची जुना आखाड्यातून हकालपट्टी; मोठं कारण आलं समोर

पीटीआयच्या मते, ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभाला अंबानी आणि अमेरिकेतील काही प्रभावशाली अब्जाधीश आणि राजकारणी तसेच परदेशी नेते, सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. अंबानी कुटुंब १८ जानेवारी रोजी अमेरिकेच्या राजधानी वॉशिंग्टनमध्ये पोहोचलं आणि ट्रम्प यांच्यासोबत कार्यक्रमात सहभागी झालेल्या निवडक १०० जणांमध्ये ते सहभागी झाले होते.

२०१७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी जागतिक उद्योजकता शिखर परिषदेसाठी हैदराबादला भेट दिली तेव्हा अंबानी उपस्थित होती. फेब्रुवारी २०२० मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून ट्रम्प भारत दौऱ्यावर आले तेव्हाही हे उद्योगपती उपस्थित होते.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी मार्चमध्ये गुजरातमधील जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसांच्या लग्नापूर्वीच्या समारंभात सहभागी झालेल्या काही सेलिब्रिटींमध्ये इवांका, त्यांचे पती जेरेड कुशनर आणि त्यांची मोठी मुलगी अराबेला रोज यांचा समावेश होता. दरम्यान पारंपारिक भारतीय पोशाखात सजलेल्या कुटुंबाने या समारंभातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. सोनेरी आणि चांदीच्या गाऊनमध्ये सजलेल्या इवांका यांनी तिच्या पहिल्या पोस्टमध्ये उत्सवाच्या पहिल्या रात्रीला “एव्हरलँडमधील जादुई संध्याकाळ” असं म्हटलं आहे.

Prayagraj Fire : प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात अग्नितांडव; अनेक तंबू जळून खाक

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रविवारी (20 जानेवारी 2025) पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या काळात ते दोन बायबल वापरतील. यापैकी एक त्यांना त्यांच्या आईने भेट म्हणून दिले होते, तर दुसरे लिंकन बायबल होते. कडाक्याच्या थंडीमुळे यावेळी ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा अमेरिकेच्या कॅपिटलच्या रोटुंडामध्ये होणार नाही. शेवटच्या वेळी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी 1985 मध्ये घरामध्ये पदाची शपथ घेतली होती. त्यावेळीही यूएस कॅपिटलमध्ये कडाक्याची थंडी होती. वॉशिंग्टनमध्ये सोमवारी तापमान उणे राहील, असा अंदाज आहे.

ट्रम्प यांच्या औपचारिक शपथविधी समारंभात मैफिली, उत्सव परेड यासह अनेक औपचारिक कार्यक्रम असतील. ते अमेरिकेचे  वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. अधिकृत शपथविधी सोहळा 20 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता) होईल. अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स ट्रम्प यांना त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी पदाची शपथ देतील.

Web Title: Reliance industries chairman mukesh ambani nita ambani meet us president donald trump before oath ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 07:25 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Mukesh Ambani
  • US President

संबंधित बातम्या

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण
1

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण

JioFinance Super Update : जिओफायनान्सचं नवं फीचर Launch! तुमचे सगळे पैसे आता एका अ‍ॅपमध्ये दिसणार?
2

JioFinance Super Update : जिओफायनान्सचं नवं फीचर Launch! तुमचे सगळे पैसे आता एका अ‍ॅपमध्ये दिसणार?

ट्रम्पच्या ‘हेकेखोरगिरीचा’ दिसू लागला परिणाम! अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संख्येत कमालीची घट
3

ट्रम्पच्या ‘हेकेखोरगिरीचा’ दिसू लागला परिणाम! अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संख्येत कमालीची घट

India-US Trade Deal: भारत-अमेरिकेतील मोठा पेच सुटला; नोव्हेंबरमध्ये होणार ऐतिहासिक व्यापार करार?
4

India-US Trade Deal: भारत-अमेरिकेतील मोठा पेच सुटला; नोव्हेंबरमध्ये होणार ऐतिहासिक व्यापार करार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.