प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा परिसरात भीषण आग, अनेक तंबू जळून खाक
प्रयागराज महाकुंभमेळ्यातून मोठी बातमी समोर येत आहे. महाकुंभ परिसरातील शास्त्री ब्रिज सेक्टर-१९ कॅम्पमध्ये भीषण आग लागली असून काही तंबू जळून खाक झाल्याचं सांगितलं जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.ही आग इतकी भीषण आहे की आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले आहेत. तसेच, अग्निशमन दलाच्या पथकाने आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा केला आहे.
IIT Baba : IIT बाबाची जुना आखाड्यातून हकालपट्टी; मोठं कारण आलं समोर
#WATCH | Prayagraj, Uttar Pradesh | A fire breaks out at the #MahaKumbhMela2025. More details awaited. pic.twitter.com/pmjsAq9jkA
— ANI (@ANI) January 19, 2025
स्वयंपाक करताना सिलेंडरमध्ये स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर आग संपूर्ण परिसरात पसरली. तथापि, या दाव्याला अद्याप अधिकृतपणे पुष्टी मिळालेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अखिल भारतीय धर्म संघ गीता प्रेस गोरखपूरच्या कॅम्पमध्ये आग लागली आहे. ही आग इतकी भीषण आहे की आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले आहेत. तसेच, अग्निशमन दलाच्या पथकाने आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा केला आहे. त्याच वेळी, या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, जो ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांनी रेकॉर्ड केला आहे.
या दिवशी सुरू होणार संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; किती दिवस चालणार? जाणून घ्या
आगीच्या घटनेत अद्याप कोणत्याही जीवितहानीबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही, असे सांगण्यात येत आहे. जोरदार वाऱ्यामुळे, सेक्टर १९ मधील आग हळूहळू २० पर्यंत पसरली आणि जवळच्या तंबूंनाही वेढलं आहे.
आगीत कोणतीही जीवितहानी नाही
या आगीच्या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. सेक्टर ५ मध्ये सुरू झालेली आग हळूहळू सेक्टर १९ आणि २० मध्येही पसरत आहे. जोरदार वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली आणि आजूबाजूच्या तंबूंनाही वेढलं. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. प्रशासनाने आवाहन केले आहे की काळजी करण्यासारखे काही नाही. अफवांकडे लक्ष देऊ नका असं आवाहनही करण्यात आले आहे. मात्र, आग कशी लागली आणि तिने इतके भयानक रूप कसं धारण केले हे प्रशासनाने स्पष्ट केलं नाही.
भाविकांना राहण्यासाठी उभारण्यात आलेत तंबू
जत्रा परिसरात भाविकांच्या राहण्यासाठी तंबूंची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यासाठी भाविकांना पैसे मोजावे लागतात. आग तंबूतूनच सुरू झाली. तंबूत जेवणाची आणि राहण्याची संपूर्ण व्यवस्था उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, तंबूत ठेवलेल्या सिलेंडरमध्ये स्फोट झाल्यानंतर ही आग लागल्याचे मानले जात आहे. तंबू एका रांगेत उभारलेले आहेत आणि सर्व एकमेकांना लागून आहेत. अशा परिस्थितीत, आगीने काही क्षणातच अनेक तंबूंना वेढले.