Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GST Fraud In Restaurants : रेस्टॉरंट GST च्या नावाखाली फसवणूक करतंय? बिल देण्याआधी 30 सेकंदात ‘असं’ करा चेक

GST Fraud In Restaurants :अनेकदा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर बिलावर लावलेला GST खरा आहे की बनावट, हे ग्राहकांच्या लक्षात येत नाही. काही रेस्टॉरंट्स जीएसटी नोंदणी नसतानाही ग्राहकांकडून बेकायदेशीरपणे टॅक्स वसूल करतात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 09, 2026 | 07:01 PM
GST Fraud In Restaurants

GST Fraud In Restaurants

Follow Us
Follow Us:
  • रेस्टॉरंट GST च्या नावाखाली फसवणूक?
  • बिल देण्याआधी 30 सेकंदात ‘असं’ करा चेक
  • कोणाला GST गोळा करण्याचा अधिकार नसतो
GST Fraud In Restaurants : भारतात GST अनिवार्य आहे. पण प्रत्येक वेळी बिल भरत असताना तुमच्याकडून GST च्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारलं जात नाही ना? हे तपासणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्ही अशा रेस्टॅरंटच्या जाळ्यात अडकू शकता. बऱ्याचवेळा लोकं हे न तपासताच किराणा आणि रेस्टॉरंटची बिलं भरतात. हा विळखा लक्षात घेऊन एका चार्टर्ड अकाउंटंटने GST तपासण्याची सोपी पद्धत सांगितली आहे. जी तुम्ही रेस्टॉरंटमध्ये बिल भरण्यापूर्वी वापरु शकता. नेमकी काय आहे ती पद्धत? जाणून घेऊयात. ( GST Fraud In Restaurants ) 

काय सांगता? मिश्रित इंधनामुळे इंजिन खराब झालं तर मिळणार Claim; Zuno Insurance ने लाँच केले Fuel Guard

व्यावहारिक सीए असलेल्या प्रतीक भारदा यांनी ८ सप्टेंबर रोजी घडलेला एक प्रसंग सांगितला. त्यांनी स्पष्ट केले की, ते उदयपूरमधील एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते आणि त्यांचे बिल ₹६४१.९० होते. त्यात ₹३२.१० GST म्हणून जोडले होते, ज्यात २.५% CGST आणि २.५% SGSTचा समावेश होता. पैसे देण्यापूर्वी, प्रतीकने पहिलं तपासले की कंपोझिशन टॅक्स भरणारे ते रेस्टॉरंट ग्राहकांकडून GST आकारु शकतं की नाही.

असं तपासता येईल GST

प्रतीकने पुढे सांगितले की, बिल भरण्यापूर्वी त्याने http://gst.gov.in या वेबसाईटला भेट दिली. त्याने बिलावरील GSTIN टाईप करून सर्चवर क्लिक केले आणि जेव्हा ‘रेग्युलर टॅक्सपेअर’ हा स्टेटस दिसला, तेव्हा त्याने लगेच पेमेंट केले. मात्र, प्रत्येकजण असे करत नाही. रेस्टॉरंट आणि ढाब्यांवर जेवणानंतर पैसे देताना, तो व्यवसाय योग्य कर योजनेअंतर्गत नोंदणीकृत आहे की नाही, हे लोक अनेकदा तपासत नाहीत. प्रतीक सांगतो की, “कंपोझिशन टॅक्सपेअर तुमच्याकडून GST आकारू शकत नाही.”

कोणाला GST गोळा करण्याचा अधिकार नसतो?

नियमांनुसार, कंपोझिशन डीलर म्हणून नोंदणीकृत असलेली रेस्टॉरंट्स सरकारला एका निश्चित दराने कर भरतात. त्यांना ग्राहकांकडून GST गोळा करण्याचा अधिकार नसतो आणि ते बिलामध्ये स्वतंत्रपणे GST जोडू शकत नाहीत. जर त्यांनी तसे केले, तर तो पैसा थेट मालकाच्या खिशात जातो, सरकारकडे नाही. म्हणजेच, रेस्टॉरंट कंपोझिशन योजनेअंतर्गत नोंदणीकृत आहे की नियमित योजनेअंतर्गत, हे शोधण्यासाठीच ही ३०-सेकंदांची तपासणी प्रामुख्याने केली जाते.

३० सेकंदात अशी करा पडताळणी

पहिल्यांदा तुमच्या फोनवर अधिकृत GST पोर्टल, gst.gov.in, वर जा.
मेनूवर जाऊन Search Taxpayer हा पर्याय निवडा.
आता, रेस्टॉरंटच्या बिलावर छापलेला १५-अंकी GSTIN क्रमांक टाका आणि कॅप्चा भरून शोधा.
पुढे, स्क्रीनवर करदात्याच्या प्रकाराची स्थिती तपासा.
जर तिथे Composition असे लिहिले असेल, तर ते तुमच्याकडून एक रुपयासुद्धा GST आकारू शकत नाहीत. त्यांना बिलातून GST ताबडतोब काढून टाकण्यास सांगा.
जर तिथे Regular असे लिहिले असेल, तर नियमांनुसार ते ५% किंवा १८% GST आकारण्यास पात्र आहेत.
जर एखादे कंपोझिशन रेस्टॉरंट जबरदस्तीने GST आकारत असेल, तर तुम्ही पुराव्यासह GST परिषद किंवा ग्राहक मंचात तक्रार करू शकता.

खूशखबर… IT क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी! Mirae Asset चा नवा IT Index Fund बाजारात, ‘ही’ खास वैशिष्ट्ये

Web Title: Restaurant charging fake gst how to verify gstin number online details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • GST
  • GST Rates
  • Restaurants

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.