वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२२ नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. दुसरीकडे, किरकोळ महागाई मे महिन्यात वाढून ३.९३% झाली आहे, जी एप्रिलमध्ये ३.४८% होती. गेल्या ५ महिन्यांत पहिल्यांदाच किरकोळ महागाई रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ४% च्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे. राजकीय घडामोडींमध्ये व्यस्त असलेले सरकार महागाई नियंत्रणाचे दावे आणि बचतीचे उपदेश करत असले तरी, सरकारी आकडेवारी मात्र विदारक वास्तव मांडत आहे.
इक्राचे मुख्य अर्थतज्ज्ञ राहुल अग्रवाल यांच्या मते, पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्यामुळे जागतिक ऊर्जा आणि कमोडिटीच्या किमतीत झालेली घट जून २०२६ च्या घाऊक महागाईच्या आकडेवारीत थोडा दिलासा देऊ शकते. तर, इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च’च्या संचालिका मेघा अरोरा यांनी इशारा दिला की, २०२६ चा मान्सून ‘अल निनो ‘च्या प्रभावाखाली असेल, यामुळे नजीकच्या भविष्यात खाद्यपदार्थांच्या किमती उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. महागाईच्या या दुष्टचक्रामुळे उत्पादन क्षेत्रावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
३.७८% वरून वाढून ४.१९% झाल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू
३.११% वरून वाढून ४.४९% महागले खाद्यपदार
२४.८९% वरून वाढून ३०.३३% महागल इथन
६.६८% वरून वाढून ७.४८% महागले बंधकाम साहित्य
| महिना | घाऊक महागाई दर (%) | किरकोळ महागाई दर (%) |
| एप्रिल | ०.८५% | ३.१६% |
| मे | ०.३९% | २.८२% |
| जून | -०.१३% | २.१०% |
| जुलै | -०.५८% | १.६१% |
| ऑगस्ट | ०.५२% | २.०७% |
| सप्टेंबर | ०.१३% | उपलब्ध नाही |
| ऑक्टोबर | -१.२१% | ०.२५% |
| नोव्हेंबर | -०.३२% | ०.७१% |
| डिसेेंबर | ०.८३% | १.३३% |
| जानेवारी | १.८१% | २.७४% |
| फेब्रुवारी | २.१३% | ३.२१% |
| मार्च | ३.८८% | ३.४०% |






