
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
न्यूयॉर्क पोस्टच्या एका अहवालात ७९ वर्षीय रॉबर्ट कियोसाकी यांच्याबद्दल एक महत्त्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, जगभरातील लोकांना आर्थिक यशाचे धडे देत असताना, ते मात्र कर्जाच्या खोलात अडकले आहेत. त्यांच्यावक मोठ्या प्रमाणातील स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीमुळे कर्ज आहेत आणि त्यांच्यावर १.२ अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे १०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त इतके कर्ज जमा झाले आहे.
१.२ अब्ज डॉलर्सच्या प्रचंड कर्जाच्या ओझ्याबाबत रॉबर्ट कियोसाकी यांना विचारलं असता, त्यांना त्याचा कोणताही पश्चात्ताप नाही. त्यांनी एका पॉडकास्टमध्ये आपले कर्ज उघडपणे मान्यही केले आहे. अहवालानुसार, ‘गेट रिच एज्युकेशन’ या पॉडकास्टमध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं की, “तर काय, मी या कर्जात आहे.” यामागील कारण स्पष्ट करताना ते म्हणाले की, उत्पन्न मिळवून देणारी मालमत्ता खरेदी करण्यासाठी कर्ज घेणे ही श्रीमंत लोकांची एक स्टॅटर्जी असते. त्यांनी पुढे सल्ला दिला, “मी जे करतो ते तुम्ही करू नका, बरोबर?” त्याने स्पष्ट केले, “मी १९७४ पासून याचा अभ्यास करत आहे. जर तुम्हाला कर्जाचा वापर कसा करायचा हे शिकायचे असेल, तर तुम्ही याबाबत थोडे धडे घेतलेलेच बरे.”
त्याची माजी पत्नी आणि व्यावसायिक भागीदार, किम कियोसाकी, हिने देखील प्रचंड कर्जाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. तिने अलीकडेच ‘व्हॅनिटी फेअर’ला सांगितले की, १.२ अब्ज डॉलर्सच्या आकड्याबद्दल मोठ्या प्रमाणावर गैरसमजाचा आहे आणि ते कियोसाकीचे वैयक्तिक कर्ज नाही. तिने स्पष्ट केले, “आमच्या व्यावसायिक भागीदारांसोबत, आमच्या मालकीची अनेक अपार्टमेंट घरे आहेत, ज्यात एकूण अंदाजे १,५०० युनिट्स आहेत.” किमच्या मते, “तांत्रिकदृष्ट्या, होय, आमच्यावर हे मोठे कर्ज आहे, पण ते स्थावर मालमत्तेशी संबंधित आहे आणि कियोसाकीचा वैयक्तिक वाटा कमी आहे. हे प्रचंड कर्ज केवळ कियोसाकीच्या गुंतवणूक धोरणाचा एक भाग आहे.”
न्यूयॉर्क पोस्टच्या एका अहवालात रॉबर्ट कियोसाकीचा संपूर्ण मांडणी स्पष्ट केली. त्यात म्हटले आहे की, रॉबर्ट कियोसाकी स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी बँकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतो आणि जेव्हा या मालमत्तांच्या किमती वाढतात, तेव्हा वाढलेल्या किमती दाखवून ते नवीन कर्ज घेतो. याचा त्यांना फायदा होतो कारण बँकेची कर्जे उत्पन्न म्हणून गणली जात नाहीत आणि ते हा पैसा करमुक्त रोख रक्कम म्हणून वापरत राहतात.
Amazon मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! सणासुदीच्या काळात 160000 हून अधिक जागांची भर्ती, मिळणार विशेष लाभ