Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…’या’ 76 रुपयांच्या आयपीओवर तुटून पडले गुंतवणूकदार; अजूनही आहे खरेदीची संधी!

देशातील आघाडीची इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या 6,145.56 कोटींच्या तगड्या आयपीओला गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. या आयपीओला आतापर्यंत 38 टक्के सबस्क्रिप्शन मिळाले आहे. बहुतांश किरकोळ गुंतवणूकदारांनी 1.70 पट सबस्क्रिप्शन घेतले आहे. तर, गैर-संस्थांनी 0.22 टक्के सबस्क्रिप्शन घेतले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 04, 2024 | 08:17 PM
...'या' 76 रुपयांच्या आयपीओवर तुटून पडले गुंतवणूकदार; अजूनही आहे खरेदीची संधी!

...'या' 76 रुपयांच्या आयपीओवर तुटून पडले गुंतवणूकदार; अजूनही आहे खरेदीची संधी!

Follow Us
Close
Follow Us:

देशातील आघाडीची इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी ओला इलेक्ट्रिक कंपनीचा आयपीओ उघडला आहे. हा आयपीओ 2 ऑगस्ट रोजीच गुंतवणुकीसाठी उघडण्यात आला होता. अवघ्या 76 च्या या आयपीओवर गुंतवणूकदार अक्षरशः तुटून पडले आहेत. मात्र, यात गुंतवणूक करण्याची वेळ अजून संपलेली नाही. तुम्हाला या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही 6 ऑगस्ट 2024 पर्यंत यात गुंतवणूक करू शकतात. या आयपीओची किंमत 72 ते 76 रुपये आहे.

तुटून पडले गुंतवणूकदार

गुंतवणूकदार ओला इलेक्ट्रिकच्या 6,145.56 कोटींच्या या तगड्या आयपीओची बऱ्याच काळापासून प्रतीक्षा करत होते. कंपनीने 195 शेअर्सचा लॉट निश्चित केला आहे. म्हणजेच, तुम्हाला कमीत कमी 14,820 रुपयांचे 195 शेअर्स घ्यावे लागणार आहेत. सध्याच्या घडीला ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 38 टक्के सबस्क्रिप्शन मिळाले आहे. बहुतांश किरकोळ गुंतवणूकदारांनी 1.70 पट सबस्क्रिप्शन घेतले आहे. तर, गैर-संस्थांनी 0.22 टक्के सबस्क्रिप्शन घेतले आहे. याशिवाय, ओला कर्मचाऱ्यांच्या श्रेणीमध्ये हा आयपीओ 5.42 पट सबस्क्राईब झाला आहे.

हेही वाचा : …याला म्हणतात बिझनेस! काहीही न देता… झोमॅटोने उकळले तुमच्याकडून 83 कोटी रुपये! वाचा… कसे ते?

उभारणार 6,145.56 कोटी रुपये

ओला इलेक्ट्रिक कंपनी आपल्या या आयपीओद्वारे बाजारातून 6,145.56 कोटी रुपये उभारणार आहे. या अंतर्गत एकूण 808,626,207 शेअर्स विक्री केले जातील. आपण ताज्या इश्यूबद्दल बोलायचे झाले तर, 10 चे दर्शनी मूल्य असलेले 723,684,210 नवीन शेअर्स जारी केले जाणार आहेत. या शेअर्सची एकूण किंमत 5,500 कोटी रुपये असणार आहे. दुसरीकडे, ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे 645.56 कोटी रुपयांच्या 84,941,997 शेअर्ससाठी बोली मागवण्यात येणार आहे.

हेही वाचा : लंडनमध्ये ‘या’ भारतीयाने खरेदी केले 1,446 कोटींचे घर; मुकेश अंबानींनाही सोडले मागे!

‘ही’ असेल लिस्टिंगची तारीख

दरम्यान, 2 ते 6 ऑगस्ट दरम्यान बोली प्राप्त झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्सचे वाटप 7 ऑगस्ट रोजी होऊ शकते. बोली लावणाऱ्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यांमध्ये शेअर क्रेडिट 8 ऑगस्ट रोजी होणार आहेत. ओला इलेक्ट्रिक कंपनीने बीएसई आणि एनएसई या दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट करण्यासाठी 9 ऑगस्ट ही संभाव्य तारीख निश्चित केली आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Rs 76 of ola electric company ipo investors broke down

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2024 | 08:17 PM

Topics:  

  • IPO
  • Ola Electric IPO
  • share market

संबंधित बातम्या

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणावर उघडण्याची शक्यता; तज्ज्ञांनी दिले ‘हे’ शेअर्स खरेदीचे संकेत
1

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणावर उघडण्याची शक्यता; तज्ज्ञांनी दिले ‘हे’ शेअर्स खरेदीचे संकेत

FD, Mutual Fund की Gold? 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवल्यास कोण देईल सर्वात तगडा रिटर्न?
2

FD, Mutual Fund की Gold? 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवल्यास कोण देईल सर्वात तगडा रिटर्न?

Market Outlook : रुपयाची घसरण, परदेशी गुंतवणूकदारांकडून Shares ची विक्री…  नव्या आठवड्यात मार्केटची घसरण सुरुच राहणार?
3

Market Outlook : रुपयाची घसरण, परदेशी गुंतवणूकदारांकडून Shares ची विक्री… नव्या आठवड्यात मार्केटची घसरण सुरुच राहणार?

Share Market Today: ट्रम्प-शी जिनपिंग बैठकीचा बाजारावर परिणाम? या स्टॉक्सवर ठेवा तुमची नजर
4

Share Market Today: ट्रम्प-शी जिनपिंग बैठकीचा बाजारावर परिणाम? या स्टॉक्सवर ठेवा तुमची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.