Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धमाका… SBI च्या IPO ने बदललं शेअर बाजाराचं चित्र! जुलै महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून तब्बल 42000 कोटींची गुंतवणूक

SBI Funds Management च्या IPO ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. जुलै महिन्यात भारतीय शेअर बाजारात परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची लाट आली आहे. जुलै महिन्यात एफपीआयने भारतीय इक्विटी बाजारात तब्बल ₹४२,००० कोटींची विक्रमी गुंतवणूक केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 27, 2026 | 12:14 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • SBI च्या IPO ने बदलले शेअर बाजाराचे चित्र!
  • जुलै महिन्यात तब्बल 42000 कोटींची गुंतवणूक
  • परदेशी गुंतवणूकदारांकडून आली लाट
SBI Funds Management च्या बहुप्रतिक्षित IPO ला सध्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मार्च ते जून दरम्यान परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री केली होती. पण तरीही देखील जुलैमध्ये हा ट्रेंड थांबताना दिसला. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी म्हणजे FPI ने जुलैमध्ये भारतीय इक्विटीमध्ये निव्वळ खरेदी केली. पण २०२६ मध्ये एकूण गुंतवणुकीवरील दबाव अजूनही कायम आहे. नेमकी ही उलटी लाट का आणि कशी सुरु झाली? सगळं सविस्तर जाणून घेऊयात.

Credit Card : क्रेडिट कार्डचा वापर तुफान वाढला! महिन्याभरात 2 लाख कोटींहून अधिक खर्च; ‘हे’ दोन बँक अव्वल स्थानी

परदेशी गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनात बदल

२४ जुलैपर्यंतची निव्वळ FPI इक्विटी गुंतवणूक अंदाजे १.६ अब्ज डॉलर्स, म्हणजेच अंदाजे १४,९४६ कोटी रुपये होती. मार्च ते जून या सलग चार महिन्यांच्या मोठ्या विक्रीनंतर परदेशी गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनात बदल झाल्याचे दिसून येत आहे. कर्ज खरेदीच्या सातत्यामुळे जुलैमध्ये सर्व मालमत्ता वर्गांमधील एकूण FPI गुंतवणूक जवळपास $४.४ अब्ज म्हणजेच ४१,७९६ कोटींपर्यंत पोहोचली. या वर्षातील आतापर्यंतचा परकीय गुंतवणुकीसाठी हा सर्वात मजबूत महिना होता, ज्याने फेब्रुवारीचा $४.२ अब्ज म्हणजेत ₹३७,८०४ कोटींचा आकडा मागे टाकला. गुंतवणुकीचा एक मोठा भाग SBI Funds च्या IPO मधून आला, ज्यामध्ये परकीय गुंतवणूकदारांनी अँकर आणि QIP या दोन्ही बुक्समध्ये सहभाग घेतला होता.

आउटफ्लो VS इनफ्लो

जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे चीफ इन्वेस्टमेंट स्ट्रॅटर्जिस्ट व्ही. के. विजयकुमार यांनी स्पष्ट केलं की, जुलै महिन्यातील गुंतवणूक प्रामुख्याने प्राथमिक बाजारातील हालचाली आणि सरकारच्या कर बदलांनंतर डेटमध्ये गुंतवणूकदारांच्या सततच्या स्वारस्यामुळे झाली. वर्षाच्या सुरुवातीला इक्विटी सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव होता. मार्चमध्ये १२.७ अब्ज डॉलर्स, एप्रिलमध्ये ६.५ अब्ज डॉलर्स, मेमध्ये ३.५ अब्ज डॉलर्स आणि जूनमध्ये ५.२ अब्ज डॉलर्सचा आउटफ्लो झाला.

२०२६ मधील इक्विटीमधील मासिक निव्वळ FPI गुंतवणूक प्रवाह

जानेवारी 🔴 -३५,९६२
फेब्रुवारी 🟢 २२,६१५
मार्च 🔴 -११७,७७५
एप्रिल  🔴 -६०,८४७
मे 🔴 -३२,९६३
जून 🔴 -४९,३४०
जुलै 🟢 १४,९४६
एकूण 🔴 -२,५९,३२६

ही आकडेवारी २४ जुलै, २०२६ पर्यंतची आहे.
स्रोत: NSDL

आतापर्यंतचा तोटा

या कालावधीतील २७.८ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निव्वळ विक्रीची भरपाई जुलै महिन्यातील गुंतवणुकीमुळे केवळ अंशतः झाली. यामुळे वर्ष-दर-वर्ष इक्विटी गुंतवणुकीतून २७.७ अब्ज डॉलर्सचा निव्वळ आउटफ्लो झाला आहे. याउलट, डेट मार्केट्स मजबूत राहिले असून, २०२६ मध्ये आतापर्यंत ९.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. जुलैमध्ये सुधारणा होऊनही, २०२६ मध्ये आतापर्यंत सर्व मालमत्ता वर्गांमधील एकूण FPI गुंतवणूक १८.४ अब्ज डॉलर्स किंवा १.७ लाख कोटी रुपयांनी तुटीत आहे.

E20 Janta Party: मुद्दा पेटणार? CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एन्ट्री! 100% शुद्ध पेट्रोलची सोशल मीडियावर मोठी मागणी

Web Title: Sbi funds ipo triggers record fpi inflow of 42000 crore in july see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • IPO
  • IPO News
  • SBI
  • SBI Bank
  • share market
  • share market news

संबंधित बातम्या

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे सकारात्मक संकेत; या 8 शेअर्सवर तज्ज्ञांचा फोकस, जाणून घ्या सविस्तर
1

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे सकारात्मक संकेत; या 8 शेअर्सवर तज्ज्ञांचा फोकस, जाणून घ्या सविस्तर

Credit Card : क्रेडिट कार्डचा वापर तुफान वाढला! महिन्याभरात 2 लाख कोटींहून अधिक खर्च; ‘हे’ दोन बँक अव्वल स्थानी
2

Credit Card : क्रेडिट कार्डचा वापर तुफान वाढला! महिन्याभरात 2 लाख कोटींहून अधिक खर्च; ‘हे’ दोन बँक अव्वल स्थानी

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?
3

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?

Infosys Share Price: नव्या बॉसच्या एन्ट्रीने इन्फोसिसला धक्का! शेअर्समध्ये मोठी पडझड, गुंतवणूकदारांचं नुकसान; काय आहे कारण?
4

Infosys Share Price: नव्या बॉसच्या एन्ट्रीने इन्फोसिसला धक्का! शेअर्समध्ये मोठी पडझड, गुंतवणूकदारांचं नुकसान; काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.