Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर बाजारात त्सुनामी… सेन्सेक्स 1272 अंक तर निफ्टी 368 अंकांनी घसरला, गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराची उच्चांकी वाटचाल सुरु होती. मात्र, आता सप्टेंबर 2024 या महिन्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजारात मोठ्या घसरण झाली आहे. ज्यामुळे चालू महिन्यातील बाजारातील तेजीचा संपुर्ण उत्साहच नाहीसा झाला आहे. सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराची मोठी घसरण झाली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 30, 2024 | 06:34 PM
5 दिवसांत गुंतवणूकदारांचे 18 लाख कोटी बुडाले; वाचा... वर्षाअखेर कसा राहील शेअर बाजाराचा मुड!

5 दिवसांत गुंतवणूकदारांचे 18 लाख कोटी बुडाले; वाचा... वर्षाअखेर कसा राहील शेअर बाजाराचा मुड!

Follow Us
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराची उच्चांकी वाटचाल सुरु होती. त्यास ब्रेक लागला असून, सोमवारी (ता.३०) शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 1272 अंकांच्या घसरणीसह 84,299 अंकांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 368 अंकांच्या घसरणीसह 25,811 अंकांवर बंद झाला आहे. त्यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने बँकिंग-ऑटो क्षेत्रातील समभाग आणि शेअर बाजारातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या शेअर्सना मोठा फटका बसल्याने शेअर बाजारात ही घसरण दिसून आली आहे.

कोणते शेअर्स तेजीत, कोणत्या शेअर्समध्ये घसरण

शेअर बाजारात आज (ता.३०) मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 5 समभाग वाढीसह तर 25 समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. वाढत्या समभागांमध्ये जेएसडब्लू स्टील 2.86 टक्क्यांच्या वाढीसह, एनटीपीसी 1.27 टक्क्यांच्या वाढीसह, टाटा स्टील 1.17 टक्क्यांच्या वाढीसह, टायटन 0.41 टक्क्यांनी, एशियन पेंट्स 0.22 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर रिलायन्सचा शेअर ३.२३ टक्के, ॲक्सिस बँक ३.१२ टक्के, आयसीआयसीआय बँक २.५८ टक्के, नेस्ले २.१२ टक्के, टेक महिंद्रा २.१० टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा २.०३ टक्के, मारुती सुझुकीचा शेअर १.९९ टक्के घसरणीसह बंद झाला आहे.

हे देखील वाचा – इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय… केंद्राकडून अधिसूचना जारी

गुंतवणूकदारांचे ३.७० लाख कोटी रुपयांचे नुकसान

सोमवारी झालेल्या शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप घसरून 474.25 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. जे मागील सत्रात 477.93 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे तब्बल 3.68 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक प्रॉफिट बुकींग

दरम्यान, आज शेअर बाजारात सर्वाधिक प्रॉफिट बुकींग बँकिंग शेअर्समध्ये दिसून आली आहे. बँक निफ्टीही 857 अंकांनी घसरून बंद झाला आहे. याशिवाय ऑटो आणि आयटी समभागातही घसरण झाली आहे. फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्येही विक्री झाली. केवळ धातू आणि मीडिया समभाग वाढीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण दिसून आली आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Share market crash sensex down 1272 points nifty down 368 points big loss for investors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 06:34 PM

Topics:  

  • Nifty
  • sensex
  • share market

संबंधित बातम्या

नुसता क्रेझ… Grey Market मध्ये Jio IPO चा धुमाकूळ! GMP थेट ₹170 वर; जाणून घ्या कधी होणार लाँच?
1

नुसता क्रेझ… Grey Market मध्ये Jio IPO चा धुमाकूळ! GMP थेट ₹170 वर; जाणून घ्या कधी होणार लाँच?

Share Market Today: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; या शेअर्समध्ये होऊ शकते हालचाल, काय म्हणाले तज्ज्ञ?
2

Share Market Today: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; या शेअर्समध्ये होऊ शकते हालचाल, काय म्हणाले तज्ज्ञ?

Vedanta चा मोठा धमाका! कंपनीने केली Dividend ची घोषणा; शेअर्समध्ये जोरदार तेजी
3

Vedanta चा मोठा धमाका! कंपनीने केली Dividend ची घोषणा; शेअर्समध्ये जोरदार तेजी

Share Market Today: शेअर बाजारात आज तेजीचे संकेत; या स्टॉक्सवर गुंतवणूकदारांची नजर, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला
4

Share Market Today: शेअर बाजारात आज तेजीचे संकेत; या स्टॉक्सवर गुंतवणूकदारांची नजर, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.