
घसरत्या Share Market ला कधी लागणार ब्रेक? ( सौजन्य - सोशल मीडिया )
पुढील आठवड्यात अमेरिकेत महागाई, घरांची विक्री आणि किरकोळ विक्री यांसारखी महत्त्वाची आकडेवारी प्रसिद्ध केली जाईल. याच काळात भारतही किरकोळ आणि घाऊक महागाई, बेरोजगारी, व्यापार संतुलन आणि परकीय चलन साठा यांवरील आकडेवारी प्रसिद्ध करेल. या सगळ्याचा प्रभाव मार्केटवर पडणार एवढं नक्की आहे. सोबत कच्च्या तेलाच्या किमती, बॉण्डवरील परतावा यील्ड, महागाईची आकडेवारी, तसेच इतर आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत आर्थिक आकडेवारी बाजारातील हालचाली हे महत्त्वाचे घटक निश्चित करणार आहेत.
पुढील आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीही बाजारात मोठी भूमिका बजावतील. सध्या त्या १०० डॉलरच्या वर आहेत. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेने रशियाकडून डिझेल खरेदी करण्याच्या निर्णयामुळे जागतिक तणाव कमी होईल आणि त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती नरम पडू शकतात.
यासगळ्यात ट्रम्प यांचं निवेदन महत्त्वाचं ठरणार आहे. “रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी माझी एक अत्यंत यशस्वी चर्चा झाली,” असे ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथआउट’ या सोशल प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. “यामध्ये असे ठरले की रशिया अमेरिका आणि जागतिक बाजारपेठांना तात्काळ ३,००,००० टनांपेक्षा जास्त डिझेलचा पुरवठा करेल, नोव्हेंबरमध्ये ५,००,००० टन आणि त्यानंतर लवकरच १०,००,००० टन पुरवठा केला जाईल.” या मुद्द्यावरुन गुंतवणूकदार पुढील आठवड्यात अमेरिकन बाँड यील्ड्सकडेही लक्ष ठेवून असतील, जे सातत्याने ५ टक्क्यांपेक्षा जास्त राहिले आहेत.
गेला आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी फायदेशीर ठरला. सेन्सेक्स ५६२.६३ अंकांनी, म्हणजेच ०.७८ टक्क्यांनी वाढून ७२,४७२.३३ अंकांवर पोहोचला, आणि निफ्टी ९८.५० अंकांनी, म्हणजेच ०.४४ टक्क्यांनी वाढून २२,५२०.४५ अंकांवर पोहोचला. गेल्या आठ आठवड्यांत प्रथमच शेअर बाजार साप्ताहिक आधारावर वाढीसह बंद झाला. निर्देशांकांमध्ये, बीएसई टेलिकॉम ३.७२ टक्क्यांच्या, बीएसई एफएमसीजी २.४३ टक्क्यांच्या, बीएसई पीएसयू बँक २.३१ टक्क्यांच्या, बीएसई फायनान्शियल सर्व्हिसेस १.०३ टक्क्यांच्या आणि बीएसई आयटी ०.७६ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. दुसरीकडे, बीएसई रियल्टी -४.१९ टक्के, बीएसई मेटल -४.१८ टक्के, बीएसई युटिलिटीज -२.४८ टक्के, बीएसई कमोडिटीज -२.४६ टक्के आणि बीएसई पॉवर -२.२२ टक्के घसरणीसह बंद झाले.
( Desclaimer : शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या.)
Dhruv Rathee Net Worth : युट्यूबर ध्रुव राठीकडे किती कोटींची मालमत्ता? कुठून होते सर्वाधिक कमाई?