Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: गुंतवणूकदांरानो सावधान! लाल रंगात होऊ शकते बाजाराची सुरुवात; ट्रेडिंगपूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Share Market Update: अमेरिका-इराणमधील वाढत्या भू-राजकीय तणावाचा आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम जागतिक शेअर बाजारांवर दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह होण्याची शक्यता असून, गुंतवणूकदारांनी व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 08, 2026 | 08:17 AM
Share Market Today: गुंतवणूकदांरानो सावधान! लाल रंगात होऊ शकते बाजाराची सुरुवात; ट्रेडिंगपूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Share Market Today: गुंतवणूकदांरानो सावधान! लाल रंगात होऊ शकते बाजाराची सुरुवात; ट्रेडिंगपूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका-इराण तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आज भारतीय शेअर बाजार घसरणीसह सुरू होण्याची शक्यता आहे.
  • गिफ्ट निफ्टी 234 अंकांच्या डिस्काउंटवर व्यवहार करत असून सेन्सेक्स-निफ्टीसाठी गॅप-डाउन ओपनिंगचे संकेत मिळत आहेत.
  • तज्ज्ञांनी आज सोना बीएलडब्ल्यू, हॅवेल्स इंडिया, ग्लँड फार्मा, एलटीएम आणि इंडिया निप्पॉन इलेक्ट्रिकल्स या शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
India Share Market Update: अमेरिका आणि इराण यांच्यामधील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीं यांचा परिणाम शेअर बाजारावर होत आहे. जागतिक बाजारातील कमोजरीचा विचार करता आज बुधवारी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-डाउन सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास २३४ पॉइंट्सच्या डिस्काउंटवर, २४२२५ च्या पातळीवर ट्रेड करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर पुन्हा घसरले! आता 1 तोळा खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

मंगळवारी, भारतीय शेअर बाजाराची चार दिवसांची तेजी थांबली आणि बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स १०४.३५ अंकांनी, म्हणजेच ०.१३ टक्क्यांनी घसरून ७८,१८०.७२ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३१.६५ अंकांनी, म्हणजेच ०.१३ टक्क्यांनी घसरून २४,३९८.७० वर स्थिरावला. बँक निफ्टी निर्देशांक मंगळवारी ९०.८० अंकांनी, म्हणजेच ०.१६ टक्क्यांनी घसरून ५८,२००.७० वर बंद झाला.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार आज कोचीन शिपयार्ड, पूनवाला फिनकॉर्प, प्रीमियर एनर्जीज, आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी, एचसीएल टेक्नॉलॉजीज, सीगल इंडिया, उनो मिंडा, ग्लेनमार्क फार्मा, सिल्व्हर टच टेक्नॉलॉजीज या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच शेअर्सची शिफारस केली आहे. सुमीत बागडिया यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्स, हॅवेल्स इंडिया, ग्लँड फार्मा, एलटीएम आणि इंडिया निप्पॉन इलेक्ट्रिकल्स यांचा समावेश आहे.

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतणूकदारांना तीन शेअर्सची खरेदी आणि विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामध्ये सॅजिलिटी, मॅरिको आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स यांचा समावेश आहे.

SITA ची आर्थिक कामगिरी मजबूत! 2050 पर्यंत 10 अब्ज प्रवाशांचे लक्ष्य, AI मुळे इंधन बचत आणि कमी प्रदूषण

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल या शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी निवडलेल्या शेअर्समध्ये जेबी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड, इंडसइंड बँक लिमिटेड, फेडरल बँक लिमिटेड, स्विगी लिमिटेड, आरबीएल बँक लिमिटेड , आयटीसी हॉटेल्स लिमिटेड, एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि रेन इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Share market updates sensex and nifty 50 are likely to open lower on 8 july 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 08:17 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! आज ‘या’ शेअर्समध्ये होऊ शकते मोठी हालचाल; तज्ज्ञांनी दिला हा सल्ला
1

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! आज ‘या’ शेअर्समध्ये होऊ शकते मोठी हालचाल; तज्ज्ञांनी दिला हा सल्ला

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी आजही दबावात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला, ‘हे’ शेअर्स ठरणार गेमचेंजर
2

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी आजही दबावात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला, ‘हे’ शेअर्स ठरणार गेमचेंजर

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव! तज्ज्ञांनी खरेदीसाठी सुचवले ‘हे’ स्टॉक्स, जाणून घ्या सविस्तर
3

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टीवर दबाव! तज्ज्ञांनी खरेदीसाठी सुचवले ‘हे’ स्टॉक्स, जाणून घ्या सविस्तर

Share Market Today: अशी होणार आठवड्याची सुरुवात! हे स्टॉक्स बदलू शकतात तुमचं नशिब, जाणून घ्या सविस्तर
4

Share Market Today: अशी होणार आठवड्याची सुरुवात! हे स्टॉक्स बदलू शकतात तुमचं नशिब, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.