Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shriram Finance चा ऐतिहासिक टप्पा! नफ्यात 40% वाढ तर 3 लाख कोटींच्या ‘AUM’ चा रेकॉर्ड ब्रेक आकडा पार

भारतातील आघाडीची बिगर बँकिंग वित्तीय संस्था असलेल्या श्रीराम फायनान्स लिमिटेडने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत आणि पूर्ण आर्थिक वर्षात दमदार कामगिरी नोंदवली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 24, 2026 | 06:27 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Shriram Finance चा ऐतिहासिक टप्पा!
  • आर्थिक निकालांमध्ये महत्त्वाचे मुद्दे
  • 3 लाख कोटींच्या ‘AUM’ चा रेकॉर्ड ब्रेक आकडा
Shriram Finance Profit Growth : भारतातील आघाडीची बिगर बँकिंग वित्तीय संस्था असलेल्या श्रीराम फायनान्स लिमिटेडने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत आणि पूर्ण आर्थिक वर्षात दमदार कामगिरी नोंदवली आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर तब्बल ४०.८६ टक्क्यांची मोठी वाढ झाली असून, कंपनीने ३ लाख कोटी रुपयांच्या ‘असेट्स अंडर मॅनेजमेंट’चा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.

‘शांततेची वाट पाहू नका, कडक निर्णय घ्या!’ अर्थतज्ज्ञ नीलकंठ मिश्रा यांचा भारताला सुधारणांचा वेग वाढवण्याचा सल्ला

आर्थिक निकालांमध्ये महत्त्वाचे मुद्दे

आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीचे लेखापरीक्षित निकाल जाहीर करण्यात आले. चौथ्या तिमाहीत कंपनीचा करानंतरचा निव्वळ नफा ₹३,०१३.५७ कोटी झाला आहे, जो मागील वर्षाच्या याच काळात ₹२,१३९.३९ कोटी होता. कंपनीच्या निव्वळ व्याज उत्पन्नात १५.५८ टक्क्यांची वाढ होऊन ते ₹६,९९४.०८ कोटींवर पोहोचले आहे.
पूर्ण आर्थिक वर्षाचा विचार करता, कंपनीने ₹९,९९८.१५ कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. वार्षिक आधारावर प्रति शेअर उत्पन्नदेखील २०.८० टक्क्यांनी वाढून ₹५३.१५ झाले आहे.

३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी

निव्वळ व्याज उत्पन्न (NII) मध्ये 14.09% वाढ होऊन ते ₹26,051.44 कोटी झाले आहे, जे २०२५ मध्ये ₹22,835.09 कोटी होते. करानंतरचा नफा (PAT) 20.87% वाढून ₹9,998.15 कोटी झाला आहे (अपवादात्मक नफा वगळून), जो मागील वर्षी ₹8,271.61 कोटी होता. मात्र, अपवादात्मक घटक समाविष्ट केल्यास, PAT ₹9,998.15 कोटी असून मागील वर्षी ₹9,761.00 कोटी होता. प्रति शेअर उत्पन्न (EPS – बेसिक): अपवादात्मक नफा वगळून: ₹53.15 (20.80% वाढ) तर अपवादात्मक नफा समाविष्ट करून: ₹53.15 (2.37% वाढ) इतकी वाढ झाली.

एयूएममध्ये विक्रमी वाढ

श्रीराम फायनान्सच्या व्यवसायाचा विस्तार वेगाने होत असल्याचे संकेत ‘असेट्स अंडर मॅनेजमेंट’मधील वाढीवरून मिळत आहेत. ३१ मार्च २०२६ रोजी कंपनीचे एकूण AUM ₹३,०२,२७३.७५ कोटी झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात १४.८५ टक्क्यांची वाढ झाली आहे. प्रामुख्याने ग्राहक वित्त, लघु उद्योजक आणि ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्सना दिलेल्या कर्जपुरवठ्यामुळे ही वाढ शक्य झाली आहे.

भागधारकांसाठी लाभांश वर्षाव

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, संचालक मंडळाने प्रति शेअर ₹६ (३००%) अंतिम लाभांश जाहीर करण्याची शिफारस केली आहे. यापूर्वी कंपनीने ₹४.८० चा अंतरिम लाभांश दिला होता. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात एकूण लाभांश ₹१०.८० प्रति शेअर होणार आहे. हा लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) मंजूर झाल्यानंतर ९ ऑगस्ट २०२६ पर्यंत पात्र भागधारकांना अदा केला जाईल.

देशातील सर्वात मोठ्या एनबीएफसीपैकी एक

१९७९ मध्ये स्थापन झालेली श्रीराम फायनान्स ही आज ३,२२५ शाखांचे विशाल जाळे, ७६,२४१ कर्मचारी आणि ९७.३३ लाख ग्राहकांसह देशातील सर्वात मोठ्या एनबीएफसीपैकी एक बनली आहे. कंपनी जीवन विमा, सामान्य विमा आणि शेअर ब्रोकिंग क्षेत्रातही आपली पकड मजबूत करत आहे.

Amazon Now चा विस्तार होणार दुप्पट! अवघ्या काही मिनिटांत डिलिव्हरी देण्यासाठी सज्ज; तब्ब्ल 2800 कोटींची गुंतवणूक

Web Title: Shriram finance q4 results 2026 profit growth aum record see details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • Business News
  • growing
  • Marathi News
  • shriram

संबंधित बातम्या

AI Shopping Tips: वीकेंड शॉपिंग आता होणार Easy! AI सांगेल काय घ्यायचं, कुठे आणि कितीला
1

AI Shopping Tips: वीकेंड शॉपिंग आता होणार Easy! AI सांगेल काय घ्यायचं, कुठे आणि कितीला

Tujhyakade Tula Magne Actress: राकेश बापटच्या नव्या मालिकेची उत्सुकता वाढली! लोकप्रिय अभिनेत्री साकारणार ‘ही’ खास भूमिका
2

Tujhyakade Tula Magne Actress: राकेश बापटच्या नव्या मालिकेची उत्सुकता वाढली! लोकप्रिय अभिनेत्री साकारणार ‘ही’ खास भूमिका

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर
3

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट
4

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.