• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Shriram Liquid Fund To Be Launched On November 4 2024 By Shriram Amc

श्रीराम एएमसीतर्फे 4 नोव्हेंबर 2024 ला श्रीराम लिक्विड फंडाचा शुभारंभ होणार!

श्रीराम समूहाचा भाग असलेली श्रीराम ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड येत्या 4 नोव्हेंबर 2024 ला गुंतवणूकदारांसाठी श्रीराम लिक्विड फंड या नवीन योजनेचा शुभारंभ करत आहे. कर्ज आणि मुद्रा बाजारातील विविध साधनांमध्ये हा फंड प्रामुख्याने गुंतवणूक करणार आहे. नवीन फंडाची ऑफर (एनएफओ) येत्या 8 नोव्हेंबर 2024 रोजी बंद होणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 15, 2024 | 08:30 PM
श्रीराम एएमसीतर्फे 4 नोव्हेंबर 2024 ला श्रीराम लिक्विड फंडाचा शुभारंभ होणार!

श्रीराम एएमसीतर्फे 4 नोव्हेंबर 2024 ला श्रीराम लिक्विड फंडाचा शुभारंभ होणार!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

श्रीराम समूहाचा भाग असलेली श्रीराम ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड येत्या 4 नोव्हेंबर 2024 ला गुंतवणूकदारांसाठी श्रीराम लिक्विड फंड या नवीन योजनेचा शुभारंभ करत आहे. कर्ज आणि मुद्रा बाजारातील विविध साधनांमध्ये हा फंड प्रामुख्याने गुंतवणूक करणार आहे. कमी ते मध्यम पातळीची जोखीम स्वीकारत त्याचबरोबर उच्च तरलता राखत गुंतवणूकदारांना इष्टतम परतावा मि‌ळवून देणे, हे या फंडाचे उद्दिष्ट आहे. सरासरी 91 दिवसांपर्यंतची परिपक्वता असलेल्या वित्तीय साधनांमध्येच हा फंड गुंतवणूक करणार आहे. दरम्यान, नवीन फंडाची ऑफर (एनएफओ) येत्या 8 नोव्हेंबर 2024 रोजी बंद होणार आहे.

गुंतवणुकीबाबत फंडाचा दृष्टिकोन

ए वन प्लस दर्जा असलेल्या वित्तीय साधनांमध्येच हा फंड गुंतवणूक करणार आहे. गुंतवणुकीबाबत पद्धतशीर दृष्टिकोन अवलंबताना योजनेच्या परताव्याबाबत इष्टतम समतोल साध्य करताना स्थिरता आणि तरलतेला प्राधान्य देण्याचे उद्दिष्ट फंडाने ठेवलेले आहे. यासाठी हा फंड विविध क्षेत्रांत गुंतवणुक करणार आहे. स्थिर पतमापन दर्जाच्या दृष्टीकोनासह ऐतिहासिकदृष्ट्या सर्वोच्च दर्जा लाभलेल्या मुदतपत्रांतील गुंतवणूकीस प्राधान्य देत गुंतवणूकीत विविधता साधली जाणार आहे.
(फोटो सौजन्य – istock)

ठेव प्रमाणपत्रे, कमर्शियल पेपर्स, टी-बिल, जी-सेक आणि चलन बाजार एनसीडी यासारख्या रोखे विषयक सिक्युरिटीजमधील योग्य संतुलनामुळे सुरक्षितता मिळताना अस्थिरताही अल्प राहणार आहे. संशोधनावर आधारलेल्या प्रक्रियेतून पोर्टफोलिओ साकारला जाणार आहे. त्यामध्ये कर्ज मूल्यमापन आणि कर्ज प्रवाहाबाबत सखोल दृष्टिकोन ठेवत व्याजदराच्या चक्राचा अतिशय बारकाईने विचार केला जाणार आहे.

हे देखील वाचा – कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण..! दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? वाचा… सविस्तर

श्रीराम ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. कार्तिक एल. जैन म्हणाले, “गुंतवणूकदारांसाठी आर्थिक लवचिकता वाढवणारे पर्याय सादर करण्याच्या आमच्या ध्येयाशी श्रीराम लिक्विड फंड संरेखित आहे. फंडाचा मूल्य प्रस्ताव एसएलआर दृष्टिकोनावर आधारित असून तो स्थिरता, तरलता आणि परतावा संभाव्यता यांचे संतुलन साधतो. त्यामुळे तो रिटेल आणि कॉर्पोरेट गुंतवणूकदारांसाठी एक आदर्श पर्याय आहे. ही योजना कमी अस्थिरतेसह तरलता प्रदान करत असल्याने बचत खात्यात विनावापर शिल्लक असलेल्या पैशावर अधिक परतावा मिळवून देण्यास हा फंड रिटेल गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त आहे.

त्याचबरोबर कॉर्पोरेट्स जगताला त्यांच्या रोख व्यवस्थापनासाठीसुध्दा उपयुक्त ठरू शकतो. आपला आकस्मिक निधी अतिशय सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने हाताळण्याची इच्छा असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक आदर्श पर्याय आहे. या नवीन गुंतवणूक पर्यायासह, आम्ही आमच्या ग्राहकांच्या विकसनशील गरजा पूर्ण करण्यासाठी आमचा पोर्टफोलिओ वाढवत आहोत. त्याआधारे त्यांना विश्वासार्ह, संशोधनाचे पाठबळ लाभलेल्या गुंतवणूक पर्यायांची निवड करण्याची संधी देताना त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करत आहोत.”

श्रीराम एएमसीचे निधी व्यवस्थापक सुदीप मोरे यांनी सांगितले आहे की,“श्रीराम लिक्विड फंड हा अल्प-मुदतीसाठी उत्पन्न हवे असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी तयार करण्यात आलेला आहे. त्यात उच्च दर्जाच्या वित्तीय साधनांमध्ये गुंतवणूक करून स्थिरता, तरलता आणि परतावा यांच्यात संतुलन साधले जाणार आहे. सीडी आणि सीपीमध्ये 75 टक्के ते 80 टक्के गुंतवणुक करत हा फंड स्थिर पोर्टफोलिओ वाटप आणि जमा धोरण अवलंबिणार आहे.

ओव्हरनाईट पेपर्समध्ये 5 टक्के, ठेवी प्रमाणपत्रांमध्ये 25 टक्के, व्यावसायिक प्रमाणपत्रांमध्ये 50 टक्के आणि टेझरी-बिलांमध्ये 20 टक्के अशा आदर्श प्रमाणात फंडातील निधी गुंतविला जाणार आहे. योजनेच्या माहिती दस्तऐवजात नमूद केलेल्या मालमत्ता वाटप पद्धतीनुसार ही गुंतवणूक केली जाणार आहे. वेगवेगळ्या परिस्थितीनुसार गुंतवणूकीचे प्रमाण बदलू शकते. उच्च-गुणवत्तेचे कर्ज आणि चलन बाजारातील (मनी मार्केट) वित्तीय पर्यायांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच व्याज दर आणि कर्ज जोखीम कमी करताना अल्प अस्थिरतेसह सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचे आमचे ध्येय आहे.”

Web Title: Shriram liquid fund to be launched on november 4 2024 by shriram amc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 08:30 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

Feb 22, 2026 | 11:23 PM
महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

Feb 22, 2026 | 11:10 PM
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
IND vs SA : फेल फेल भारताचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे फेल! SA ने 76 धावांनी मिळवला विजय

IND vs SA : फेल फेल भारताचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे फेल! SA ने 76 धावांनी मिळवला विजय

Feb 22, 2026 | 10:36 PM
किंमत कमी म्हणूनच मार्केटमध्ये भाव जास्त! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, किंमत तर फक्त 5.65 लाखांपासून सुरु

किंमत कमी म्हणूनच मार्केटमध्ये भाव जास्त! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, किंमत तर फक्त 5.65 लाखांपासून सुरु

Feb 22, 2026 | 10:15 PM
Vijay Rashmika Wedding : ‘#virosh’ने दिली खुशखबर! चाहत्यांना बातमी दिली लग्नाची, ते ही गोंडस अंदाजात

Vijay Rashmika Wedding : ‘#virosh’ने दिली खुशखबर! चाहत्यांना बातमी दिली लग्नाची, ते ही गोंडस अंदाजात

Feb 22, 2026 | 10:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.