मराठी प्रकाशन विश्वावर शोककळा! मेहता पब्लिशिंग हाऊसचे अनिल मेहता काळाच्या पडद्याआड
अनिल मेहता यांनी १९७६ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेची स्थापना केली होती. मराठी पुस्तक प्रकाशन क्षेत्रात या संस्थेने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. साहित्य, कथा, कादंबऱ्या, वैचारिक लेखन आणि विविध विषयांवरील पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवण्यात मेहता प्रकाशनाने महत्त्वाची भूमिका बजावली.
पुस्तक प्रकाशन क्षेत्रात काम करताना अनिल मेहता यांनी मराठी वाचक आणि लेखक यांच्यातील दुवा मजबूत करण्यासाठी योगदान दिले. नव्या लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, दर्जेदार साहित्य प्रकाशित करणे आणि वाचनसंस्कृतीला चालना देणे, अशा विविध माध्यमांतून मेहता प्रकाशनाने आपला ठसा उमटवला.
गेल्या अनेक दशकांपासून मेहता पब्लिशिंग हाऊस हे नाव मराठी वाचकांच्या परिचयाचे बनले आहे. त्यामुळे संस्थेचे संस्थापक अनिल मेहता यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रातील एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत.
अनिल मेहता यांचे कोल्हापूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मराठी साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Ans: मेहता प्रकाशनाचे संस्थापक अनिल मेहता यांचे कोल्हापूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Ans: अनिल मेहता हे ८६ वर्षांचे होते.
Ans: अनिल मेहता यांनी १९७६ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेची स्थापना केली होती.






