10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! २०२७ च्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
दरम्यान राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे.
NEET PG 2026 Counselling: दुसऱ्या फेरीचे शेड्युल बदलले, आता ७ नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा बुधवार, २० जानेवारी २०२७ ते शनिवार, ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत पार पडणार आहेत. त्यानंतर बारावीच्या लेखी परीक्षेला सोमवार, ८ फेब्रुवारी २०२७ पासून सुरुवात होणार आहे. या परीक्षा गुरुवार, १८ मार्च २०२७ पर्यंत चालणार आहेत.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा गुरुवार, २८ जानेवारी २०२७ ते शनिवार, १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होणार आहेत. तर दहावीच्या लेखी परीक्षेला सोमवार, १५ फेब्रुवारी २०२७ पासून सुरुवात होईल. या परीक्षा सोमवार, १५ मार्च २०२७ रोजी संपणार आहेत.
मंडळाने जाहीर केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक ६ नोव्हेंबर २०२६ पासून अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थी आणि पालकांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर जाऊन परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे.
दरम्यान, मंडळाने विद्यार्थ्यांना वेळापत्रकाबाबत महत्त्वाची सूचना दिली आहे. अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले वेळापत्रक हे केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी संबंधित शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आलेले छापील वेळापत्रकच अंतिम मानले जाणार आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेला उपस्थित राहण्यापूर्वी आपल्या शाळा किंवा महाविद्यालयाकडून मिळालेल्या छापील वेळापत्रकाची खात्री करावी. व्हॉट्सॲप, सोशल मीडिया किंवा इतर अ
परीक्षांच्या महत्त्वाच्या तारखा एका नजरेत
| परीक्षेचा तपशील | बारावी (HSC) | दहावी (SSC) |
|---|---|---|
| प्रात्यक्षिक परीक्षा सुरू | २० जानेवारी २०२७ | २८ जानेवारी २०२७ |
| प्रात्यक्षिक परीक्षा समाप्त | ६ फेब्रुवारी २०२७ | १३ फेब्रुवारी २०२७ |
| लेखी परीक्षा सुरू | ८ फेब्रुवारी २०२७ | १५ फेब्रुवारी २०२७ |
| लेखी परीक्षा समाप्त | १८ मार्च २०२७ | १५ मार्च २०२७ |
Ans: बारावीची लेखी परीक्षा सोमवार, ८ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार असून गुरुवार, १८ मार्च २०२७ रोजी संपणार आहे.
Ans: दहावीची लेखी परीक्षा सोमवार, १५ फेब्रुवारी २०२७ ते सोमवार, १५ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे.
Ans: विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांकनिहाय वेळापत्रक पाहता येईल.






