गोकुळला केंद्रबिंदू मानून सरकारकडून हा कायदा आणण्यात आला आहे.सहकारी संस्थांच्या बाबतीत यापूर्वी हा कायदा केवळ फेडरल इन्स्टिट्यूट, गोकुळ आणि अन्य दोन संस्थांना लागू होणार आहे.सरकारला गोकुळमध्ये सत्ता मिळवायची आहे. जनतेने दिलेला कौल नाकारण्याचे काम सरकार करत आहे.
कालचा दिवस इतिहासातील काळा दिवस म्हणून ओळखला जाईल.बहुमत स्वतःकडे वळवून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.साडेपाच लाख शेतकऱ्यांचा संसार या संस्थेवर अवलंबून आहे.दररोज २० लाख लिटर दूध संकलित केले जाते.शेतकऱ्यांचा कौल सरकारला मान्य नाही.राहुल गांधी यांनी आमच्या बाजूने ट्विट केले आहे.
हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेत कायदा बदलण्याचा निर्णय घेतला.मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर एक शब्दही बोलला गेला नाही. हा कायदा का आणला जात आहे आणि त्याचे काय परिणाम होतील, यावर चर्चा झाली नाही.निवडणुकीपूर्वी हा कायदा केला असता, तर समजू शकलो असतो.
निवडणूक झाली, मतदान झाले आणि निकालही लागला. मात्र, निकाल आपल्या बाजूने लागला नाही म्हणून आता कायदा बदलायचा, हे चुकीचे आहे.
केवळ सत्ता मिळवायची आहे म्हणून जबरदस्तीने कायदा बदलणे चुकीचे आहे.