Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Today Silver Rate : चांदी 3 लाखांचा टप्पा गाठणार! सराफा बाजारात मोठी उलाढाल होणार, तज्ज्ञांचं नेमकं म्हणणं काय?

यंदाच्या वर्षातील चांदीच्या ऐतिहासिक चालमुळे गुंतवणूकदार सोनंसोडून चांदीतील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. तुम्हीपण चांदीत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट माहिती असली पाहिजे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 05, 2026 | 11:40 AM
चांदी 3 लाखांचा टप्पा गाठणार! सराफा बाजारात मोठी उलाढाल होणार, तज्ज्ञांचं नेमकं म्हणणं काय? (फोटो सौजन्य-Gemini)

चांदी 3 लाखांचा टप्पा गाठणार! सराफा बाजारात मोठी उलाढाल होणार, तज्ज्ञांचं नेमकं म्हणणं काय? (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Close
Follow Us:
  • ईव्ही क्षेत्रात चांदीला १६ टक्क्यांची मागणी
  • दरात तात्पुरती घसरण शक्य
  • मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी
नाशिक : सोलर पॅनल, ईव्ही दुचाकी, चारचाकी वाहने आणि अन्य पर्यावरणपूरक उपकरणांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे देशातील आणि विदेशी कंपन्यांनी आपले उत्पादन तिपटीने वाढविले आहे. या उपकरणांमध्ये चांदीचा जास्त वापर होत असल्याने परिणामी चांदीची मागणी देखील वाढली आहे. त्यामुळे चांदीचे दर दिवसेंदिवस नवीन विक्रम नोंदवत आहे. सध्या चांदीची मागणी पाहता दर लवकरच प्रति किलो ३ लाखांपर्यंतसजातील, असा अंदाज आहे.

पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेता, बहुतांश देश ईव्ही, सोलर पॅनल वापरण्यावर भर देऊ लागले आहे. हे उपकरणे बनवतांना यात चांदीचा वापर केला जातो. याशिवाय बॅटरी सेमी कंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटची कार्यक्षमता वाढविण्यासाठी देखील चांदीचा मोठा वापर केला जात आहे. परिणामी जगभरामधून चांदीला मागणी वाढली असून, औद्योगिक क्षेत्राची मागणी हि ५८ टक्यांपर्यंत पोहोचली आहे. जागतिक स्तराचा विचार केल्यास जगात चांदीची निर्यातीमध्ये चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु चांदी विकून नफा कमवण्यापेक्षा चीनने स्वस्तात सोलर पॅनल, सेमी कंडक्टर बनवून या उत्पादनांची निर्यात करून अधिकचे परकीय चलन कमविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे चीनने १ जानेवारीपासून चांदीच्या निर्यातीवर निर्बंध घातले असून जागतिक बाजारपेठेत चांदीचा मोठा तुटवडा असल्याचे तज्ञानी स्पष्ट केले आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असून सलग पाचव्या वर्षी पुरवठ्यात शॉर्टेज आले असून चांदीची मागणी अशीच वाढत राहिली तर चांदीचे दर तीन लाखापर्यंत जाऊ शकता, असा अंदाज आहे.

शेअर बाजारात तेजी की मंदी? आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय घडणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे अंदाज

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी

सोलर पॅनल आणि ईव्हीमध्ये चांदीचा वापर वाढला असून चीनने देखील चांदीच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीचा तुटवडा निर्माण होऊन चांदीचे दर वाढत आहे, असं मत सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी व्यक्त केलं आहे.

ईव्ही क्षेत्रात चांदीला १६ टक्क्यांची मागणी

आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलवे वाहने बंद होण्याची शक्यता आहे. सध्या देशी विदेशी कंपन्यानी ईव्ही वाहने बनवण्यावर लक्ष केंद्रित केले असून एक इव्हीत ५० ग्राम चांदीचा वापर होत आहे. एकट्या ईव्ही क्षेत्राचा विचार केला तर या क्षेत्रात चांदीची मागणी १६ टक्यांनी वाढली आहे.

दरात तात्पुरती घसरण शक्य

रविवारी चांदी २ लाख ४४ हजार रुपये प्रति किलो दराने विकली गेली. दर वाढण्यापूर्वी खरेदी केलेली चांदी गुंतवणूकदार विक्रीस काढून नफा बुक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधूनमधून चांदीच्या दरात घसरण शक्य आहे, परंतु दरातील ही घसरण तात्पुरती राहून पुन्हा दर वाढणार आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या भावात पुन्हा चढउतार! तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Web Title: Silver rate to reach the 3 lakh mark huge turnover expected in the bullion market what exactly do the experts say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Business
  • Nashik

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana : धक्कादायक! ‘लाडक्या बहिणीं’चे संकेतस्थळ बंद, ग्रामीण भागात अडचणी
1

Ladki Bahin Yojana : धक्कादायक! ‘लाडक्या बहिणीं’चे संकेतस्थळ बंद, ग्रामीण भागात अडचणी

Nashik News: कॉलेज तरुणी आणि 9 वर्षीय मुलगा बेपत्ता; एकाच दिवशी दोन वेगळ्या भागात घडली घटना; पालकांमध्ये भीतीचे वातावरण
2

Nashik News: कॉलेज तरुणी आणि 9 वर्षीय मुलगा बेपत्ता; एकाच दिवशी दोन वेगळ्या भागात घडली घटना; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या
3

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या

Nashik Municipal Election : शिवसेनेकडून १०१ उमेदवार रिंगणात; मनपा निवडणुकीत जुन्या-नव्यांचा मेळ साधत जिंकण्याची रणनीती
4

Nashik Municipal Election : शिवसेनेकडून १०१ उमेदवार रिंगणात; मनपा निवडणुकीत जुन्या-नव्यांचा मेळ साधत जिंकण्याची रणनीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.