Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार पुन्हा ढासळला; ‘या’ शेअर्समध्ये मोठी घसरण!

दोन दिवसांच्या नेत्रदीपक वाढीनंतर, भारतीय शेअर बाजार आज पुन्हा ढासळला आहे. बाजारात आज गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे बुधवारी (ता.११) दुपारच्या व्यवहारात बाजारात मोठी घसरण झाली आहे. दोन दिवसांच्या उच्चांकावरून सेन्सेक्स 700 अंकांनी तर निफ्टी 230 अंकांनी घसरला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 11, 2024 | 04:52 PM
दोन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार पुन्हा ढासळला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण!

दोन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार पुन्हा ढासळला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण!

Follow Us
Close
Follow Us:

चालू आठवड्यात गेले दोन दिवस शेअर बाजारात चांगलीच तेजी पाहायला मिळाली. मात्र आता दोन दिवसांच्या नेत्रदीपक वाढीनंतर, भारतीय शेअर बाजार आज पुन्हा ढासळला आहे. बाजारात आज गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे बुधवारी (ता.११) दुपारच्या व्यवहारात बाजारात मोठी घसरण झाली आहे. दोन दिवसांच्या उच्चांकावरून सेन्सेक्स 700 अंकांनी तर निफ्टी 230 अंकांनी घसरला आहे. ऊर्जा, तेल आणि वायू आणि बँकिंग शेअर्सच्या विक्रीमुळे बाजारात ही घसरण दिसून आली आहे.

आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 398 अंकांच्या घसरणीसह 81,523 अंकांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 123 अंकांच्या घसरणीसह 24,918 अंकांवर बंद झाला आहे. दरम्यान, दोन दिवसांच्या उच्चांकावरून सेन्सेक्स 700 अंकांनी तर निफ्टी 230 अंकांनी घसरला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा गुंतवणुकदारांमध्ये काहीसे निराशेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
(फोटो सौजन्य – istock)

हे देखील वाचा – खुशखबर… दसरा-दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; कच्च्या तेलाचे भाव 3 वर्षांतील नीच्चांकी पातळीवर!

गुंतवणुकदारांना तब्बल 2.53 लाख कोटींचा फटका

मार्केटमध्ये प्रॉफिट बुकींगमुळे आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप 463.49 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 460.96 कोटी रुपये इतके होते. त्यामुळे आजच्या व्यवहारात बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये 2.53 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

या शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 10 शेअर्स वाढीसह बंद झाले आहे. तर 20 शेअर्स घसरणीसह बंद झाले आहेत. निफ्टीच्या 50 समभागांपैकी केवळ 13 शेअर वाढीसह बंद झाले आहे. तर 37 शेअर तोट्यासह बंद झाले आहेत. आज बाजारात वाढत्या शेअर्समध्ये एशियन पेंट्स 2.18 टक्के, बजाज फायनान्स 1.57 टक्के, सन फार्मा 0.88 टक्के, एचयूएल 0.58 टक्के, एचसीएल टेक 0.39 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.37 टक्के, आयटीसी 0.19 टक्के, ॲक्सिस बँक 0.08 टक्के, भारती एअरटेल 0.05 टक्के वाढीसह बंद झाले.

हे देखील वाचा – 3000 कोटींच्या संपत्तीची मालकिण; ‘ही’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फमेड महिला उद्योजक!

हे शेअर्स घसरले

तर आज बाजारात घसरण झालेल्या शेअर्समध्ये टाटा मोटर्स 5.77 टक्के, एनटीपीसी 1.56 टक्के, अदानी पोर्ट्स 1.53 टक्के, एलअँडटी 1.51 टक्के, एसबीआय 1.45 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 1.42 टक्के घसरणीसह बंद झाले आहेत. आजच्या व्यवहारात एफएमसीजी आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली आहे. याशिवाय बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा हेल्थकेअर, धातू, ऊर्जा, तेल आणि वायू, मीडिया क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले आहेत. दरम्यान, आजच्या ट्रेडिंग सत्रात मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली आहे.

Web Title: Stock market closing on 11 september 2024 after two days of gains the stock market fell again big fall in this shares

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 04:50 PM

Topics:  

  • Share Market Today

संबंधित बातम्या

Stock Market Today: आज शेअर बाजारात काय घडणार? तेजी की मंदी? काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या
1

Stock Market Today: आज शेअर बाजारात काय घडणार? तेजी की मंदी? काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या

Stock Market Today: शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण! गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आलं हसू
2

Stock Market Today: शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण! गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आलं हसू

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी की मंदी? आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय घडणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे अंदाज
3

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी की मंदी? आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय घडणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे अंदाज

Stock Market Today: शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करताय? जाणून घ्या कसं असणार आजचं वातावरण
4

Stock Market Today: शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करताय? जाणून घ्या कसं असणार आजचं वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.