
Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत! गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स
गुंतवणूकदार आज हीरो मोटर्स, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी, आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स, टाटा एलक्सी, एचसीएल टेक, पॉलीकॅब इंडिया, आरबीएल बँक, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी, आयआरकॉन इंटरनॅशनल, पॉवर ग्रिड, भारतीय हॉटेल्स, स्वान डिफेन्स अँड हेवी इंडस्ट्रीज, टीडी पॉवर सिस्टम्स, विक्रान इंजिनिअरिंग या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे विष्णूकांत उपाध्याय आणि चॉईस ब्रोकिंगचे हितेश टेलर यांनी पुढील १-२ आठवड्यांसाठी गुंतवणूकदारांना सहा स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. विष्णूकांत उपाध्याय यांनी गुंतवणूकदांराना खरेदी करण्यासाठी निवडलेल्या शेअर्समध्ये नेटवेब टेक्नॉलॉजीज, संसेरा इंजिनिअरिंग आणि ग्लँड फार्मा यांचा समावेश आहे. हितेश टेलर यांनी गुंतवणूकदांराना खरेदी करण्यासाठी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल, हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL) आणि साउथ इंडियन बँक या शेअर्सची निवड केली आहे.
शेअर बाजारातील तज्ज्ञांचा आज आयआरकॉन इंटरनॅशनल, भाग्यनगर, इंडिया, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी, एचसीएल टेक, आरबीएल बँक, हिंदुस्तान कंपोझिट्स, आझाद इंजिनिअरिंग, हजूर मल्टी प्रोजेक्ट्स, नझारा टेक्नॉलॉजीज या शेअर्सवर अधिक फोकस असणार आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागातील डेरिव्हेटिव्हज आणि टेक्निकल्सचे प्रमुख, चंदन तापारिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदीसाठी दोन स्टॉक्सची शिफारस केली आहे. तापारिया यांनी पीएनबी हाउसिंग फायनान्स आणि टीव्हीएस मोटर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.