
Share Market Today: आजच्या ट्रेडिंगमध्ये कमाईची संधी? तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी निवडले 'हे' महत्त्वाचे शेअर्स
Todays Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; एका क्लिकमध्ये जाणून घ्या आजचे दर
मंगळवारी भारतीय शेअर बाजार सपाट राहिला आणि बेंचमार्क निफ्टी ५० २४,००० च्या पातळीखाली बंद झाला. सेन्सेक्स ६९.८६ अंकांनी, म्हणजेच ०.०९ टक्क्यांनी घसरून ७६,७६५.९२ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० १०.६० अंकांनी, म्हणजेच ०.०४ टक्क्यांनी घसरून २४,००३.७५ अंकांवर स्थिरावला. (फोटो सौजन्य – AI Created)
प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. वैशाली पारेख यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये नेस्ले इंडिया, एचएफसीएल आणि लार्सन अँड टुब्रो (एलटी) यांचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार अदानी एंटरप्रायझेस, वारी एनर्जीज, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, बजाज हाउसिंग फायनान्स, एल अँड टी, आरव्हीएनएल, सुझलॉन एनर्जी, टाटा कॅपिटल, अंबुजा सिमेंट, डीसीएम श्रीराम, व्हीएसटी इंडस्ट्रीज, एनटीपीसी या शेअर्सवर लक्ष केंद्रित करू शकतात.
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट शेअर्सची निवड केली आहे. ज्यामध्ये ईक्लर्क्स सर्व्हिसेस, युनिव्हर्सल केबल्स, फाईव्ह-स्टार बिझनेस फायनान्स, मॅनकाईंड फार्मा आणि नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स यांचा समावेश आहे.
चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल या शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी सात शेअर्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या या शेअर्समध्ये साई लाईफ सायन्सेस लि. , सारेगामा इंडिया लि. , विप्रो लि. , भारती एअरटेल लि. , जीएमआर एअरपोर्ट्स लि. , गोदावरी पॉवर अँड इस्पात लि . , झुवारी ॲग्रो केमिकल्स लि. आणि इंडो काउंट इंडस्ट्रीज लि. यांचा समावेश आहे.