Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: जागतिक संकेतांचा भारतीय बाजारावर परिणाम; सपाट सुरुवात होण्याची शक्यता, ‘या’ स्टॉक्सवर ठेवा लक्ष

Share Market Update: भारतीय शेअर बाजारात सोमवारी तेजी पाहायला मिळाल्यानंतर आजच्या व्यवहाराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. जागतिक बाजारातील संमिश्र संकेत आणि गिफ्ट निफ्टीच्या सपाट ट्रेंडमुळे आज बाजार संथ गतीने उघडण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 19, 2026 | 08:27 AM
Share Market Today: जागतिक संकेतांचा भारतीय बाजारावर परिणाम; सपाट सुरुवात होण्याची शक्यता, ‘या’ स्टॉक्सवर ठेवा लक्ष

Share Market Today: जागतिक संकेतांचा भारतीय बाजारावर परिणाम; सपाट सुरुवात होण्याची शक्यता, ‘या’ स्टॉक्सवर ठेवा लक्ष

Follow Us
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टीमध्ये 22 पॉइंट्सचा प्रीमियम दिसत असून बाजार सपाट उघडण्याची शक्यता आहे.
  • वैशाली पारेख यांनी एंजल वन, आयसीआयसीआय बँक आणि एबीबी इंडिया या शेअर्सची शिफारस केली आहे.
  • आजच्या व्यवहारात BEL, BPCL, इंडियन ऑइल, ल्युपिन आणि अदानी समूहाच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष राहू शकते.
India Share Market Update: भारतीय शेअर बाजारात सोमवारी १८ मे रोजी तेजी पाहायला मिळाली. सोमवारी शेअर बाजार वाढीसह बंद झाला. मात्र आज काय होणार याकडे सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे असा अंदाज वर्तवला जात आहे की, आज १९ मे रोजी मंगळवारी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, मंगळवारी संथ गतीने उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात सपाट दर्शवतात. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास २२ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, सुमारे २३,६८० च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: सोनं झालं स्वस्त; चांदी महागली! मुंबई, दिल्लीसह इतर शहरांतील दर जाणून घ्या

सोमवारी, भारतीय शेअर बाजारात दिवसाच्या नीचांकी पातळीवरून जोरदार सुधारणा झाली आणि तो सकारात्मक कलसह स्थिरावला. सेन्सेक्स ७७.०५ अंकांनी, म्हणजेच ०.१० टक्क्यांनी वाढून ७५,३१५.०४ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० ६.४५ अंकांनी, म्हणजेच ०.०३ टक्क्यांनी वाढून २३,६४९.९५ अंकांवर स्थिरावला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक १७३.३५ अंकांनी, म्हणजेच ०.३२ टक्क्यांनी घसरून ५३,५३७.०० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest) 

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन शेअर्सची शिफारस केली आहे. वैशाली पारेख यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये एंजल वन, आयसीआयसीआय बँक आणि एबीबी इंडिया यांचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, मॅनकाइंड फार्मा आणि झायडस लाइफसायन्सेस, ल्युपिन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, आयशर मोटर्स, अदानी ग्रुप, ऍस्ट्रल, अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, अपोलो मायक्रो सिस्टम्स, डोम्स इंडस्ट्रीज, वास्कॉन इंजिनियर्स या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.

भारतीय विमा क्षेत्रात मोठी घडामोडी! लिबर्टी म्युच्युअलने ‘लिबर्टी जनरल इन्शुरन्स’मधील हिस्सा ७४ टक्क्यांवर नेला

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज मंगळवारी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पीबी फिनटेक, किंगफा सायन्स अँड टेक्नॉलॉजी (इंडिया) आणि डॉ. लाल पाथ लॅब्स या 5 स्टॉक्सची निवड केली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागातील डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख चंदन तापारिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज (BSE) आणि पीबी फिनटेकचे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market today at 19 may 2026 sensex nifty likely to open flat amid mixed global signals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 08:27 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: आजच्या व्यवहारात ‘हे’ शेअर्स देऊ शकतात दमदार परतावा; तज्ज्ञांनी केली शिफारस, वाचा सविस्तर
1

Share Market Today: आजच्या व्यवहारात ‘हे’ शेअर्स देऊ शकतात दमदार परतावा; तज्ज्ञांनी केली शिफारस, वाचा सविस्तर

Share Market Today: गिफ्ट निफ्टीची मजबूत कामगिरी; आज शेअर बाजारात तेजीची शक्यता! ‘हे’ स्टॉक्स पालटणार तुमचं नशिब
2

Share Market Today: गिफ्ट निफ्टीची मजबूत कामगिरी; आज शेअर बाजारात तेजीची शक्यता! ‘हे’ स्टॉक्स पालटणार तुमचं नशिब

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन
3

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन

Share Market Today: आज बाजारात काय घडणार? कोणते शेअर्स देणार कमाईची संधी? जाणून घ्या तज्ज्ञांची निवड
4

Share Market Today: आज बाजारात काय घडणार? कोणते शेअर्स देणार कमाईची संधी? जाणून घ्या तज्ज्ञांची निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.