Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: रक्षाबंधनाला शेअर बाजार सुरूच; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडण्याची शक्यता, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Share Market Update: भारतीय शेअर बाजार आज लाल रंगात उघडू शकतो. तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी विविध शेअर्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये ऑरोबिंदो फार्मा लिमिटेड, एथर एनर्जी लिमिटेड, सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड इत्यादींचा समावेश आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 28, 2026 | 08:58 AM
Share Market Today: रक्षाबंधनाला शेअर बाजार सुरूच; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडण्याची शक्यता, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Share Market Today: रक्षाबंधनाला शेअर बाजार सुरूच; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडण्याची शक्यता, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Follow Us
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टी सुमारे २४,२६६.५ अंकांवर असून मागील बंद भावापेक्षा १५.४ अंकांनी घसरला आहे.
  • मागील सत्रात सेन्सेक्स ५३९.३५ अंकांनी घसरून ७६,९३३.५९, तर निफ्टी ११६.९० अंकांनी घसरून २४,०९०.८५ अंकांवर बंद झाला.
  • तज्ज्ञांनी आजच्या व्यवहारासाठी सीजी पॉवर, लॉरस लॅब्ज, बीएचईएल, अदानी एंटरप्रायझेससह अनेक शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
India Share Market Update: शुक्रवारी, २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असूनही बीएसई आणि एनएसई नियमित व्यवहारांसाठी खुले राहणार आहे. जागतिक पातळीवरील कमकुवत संकेतांचा विचार करता आज, भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट किंवा नकारात्मक पातळीवर उघडू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. गिफ्ट निफ्टीच्या ट्रेंडनेही भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात संथ असल्याचे संकेत दिले. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंद भावापेक्षा १५.४ अंकांनी घसरून सुमारे २४,२६६.५ अंकांवर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोन्याने गाठला 1.63 लाख रुपयांचा टप्पा, चांदीचा भाव 2.59 लाखांवर!

मागील सत्रात देशांतर्गत शेअर निर्देशांक घसरणीसह बंद झाले, बेंचमार्क निफ्टी ५० २४,१०० च्या पातळीखाली बंद झाला. सेन्सेक्स ५३९.३५ अंकांनी, म्हणजेच ०.७० टक्क्यांनी घसरून ७६,९३३.५९ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० ११६.९० अंकांनी, म्हणजेच ०.४८ टक्क्यांनी घसरून २४,०९०.८५ अंकांवर स्थिरावला. (फोटो सौजन्य: Pinterest) 

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे, आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये जिंदाल सॉ लिमिटेड, साई लाईफ सायन्सेस लिमिटेड, ब्लू स्टार लिमिटेड, ऑरोबिंदो फार्मा लिमिटेड, एथर एनर्जी लिमिटेड, सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड, सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी लिमिटेड, आणि श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांचा समावेश आहे.

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवूकदार खरेदी आणि विक्री करण्यासाठी पाइन लॅब्स, अदानी एंटरप्रायझेस आणि एनसीसी या तीन शेअर्सची निवड करू शकतात. रेलिगेअर ब्रोकिंगचे संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी आज गुंतवणूकदारांना सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स, माझगाव डॉक शिपबिल्डर्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या शेअर्सवर फोकस करण्याचा सल्ला दिला आहे.

Real Estate: अलिबागच्या रिअल इस्टेटला नवी झळाळी; 40 एकरच्या प्रकल्पातून 5 वर्षांत 4,500 कोटींच्या महसुलाचे लक्ष्य

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागातील डेरिव्हेटिव्हज आणि टेक्निकल्सचे प्रमुख, चंदन तापारिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज, लॉरस लॅब्ज आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) या शेअर्सची निवड केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market today sensex nifty likely to open flat or negative experts recommend these stocks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Multibagger Penny Stock : ‘या’ शेअरमध्ये तुफान तेजी! गुंतवणूकदारांचे पैसे झाले डबल? कंपनीने दिला 2 वेळा बोनस
1

Multibagger Penny Stock : ‘या’ शेअरमध्ये तुफान तेजी! गुंतवणूकदारांचे पैसे झाले डबल? कंपनीने दिला 2 वेळा बोनस

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; तज्ज्ञांनी खरेदीसाठी सुचवले ‘हे’ शेअर्स, वाचा सविस्तर
2

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; तज्ज्ञांनी खरेदीसाठी सुचवले ‘हे’ शेअर्स, वाचा सविस्तर

Quantum Mutual Fund : क्वांटम म्युच्युअल फंडाचा नवा ‘फ्लेक्सी कॅप फंड’ लाँच! 21 ऑगस्टपासून NFO खुला
3

Quantum Mutual Fund : क्वांटम म्युच्युअल फंडाचा नवा ‘फ्लेक्सी कॅप फंड’ लाँच! 21 ऑगस्टपासून NFO खुला

Share Market Today: गुंतवणूकदारांची चिंता वाढली! बाजारात घसरणीचे संकेत, तज्ज्ञांनी दिला हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला
4

Share Market Today: गुंतवणूकदारांची चिंता वाढली! बाजारात घसरणीचे संकेत, तज्ज्ञांनी दिला हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.