Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: शेअर बाजारात अस्थिरतेची शक्यता! जागतिक तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींचा परिणाम

Share Market Update: जागतिक बाजारातील संमिश्र संकेत, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि अमेरिका-इराण तणावामुळे भारतीय शेअर बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदार सध्या सावध भूमिकेत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 24, 2026 | 08:59 AM
Stock Market Today: शेअर बाजारात अस्थिरतेची शक्यता! जागतिक तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींचा परिणाम

Stock Market Today: शेअर बाजारात अस्थिरतेची शक्यता! जागतिक तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींचा परिणाम

Follow Us
Follow Us:
  • सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरणीनंतर आज अस्थिर व्यवहार होण्याची शक्यता व्यक्त.
  • गिफ्ट निफ्टीत हलका प्रीमियम दिसत असला तरी जागतिक तणावामुळे बाजारावर दबाव कायम.
  • इन्फोसिस, सिप्ला, अदानी एनर्जी, एलटीआयमाइंडट्री यांसारख्या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष.
India Share Market Update: जागतिक बाजारांमधून मिळणारे संमिश्र संकेत, वाढत्या कच्च्या तेलाच्या किंमती आणि अमेरिका-इराण युद्धावरील अनिश्चिततेचा जागतिक आणि भारतीय शेअर बाजारावर परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज शुक्रवारी २४ एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, शुक्रवारी अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड भारतीय बेंचमार्क निर्देशांकाच्या चांगल्या सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास ७० पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २४,२३३ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठा बदल! खरेदीपूर्वी नक्की वाचा आजचा भाव

गुरुवारी, सलग दुसऱ्या सत्रात विक्रीचा जोर कायम ठेवत भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि बेंचमार्क निफ्टी ५० २४,२०० च्या पातळीखाली बंद झाला. सेन्सेक्स ८५२.४९ अंकांनी, म्हणजेच १.०९ टक्क्यांनी घसरून ७७,६६४.०० वर बंद झाला, तर निफ्टी ५० २०५.०५ अंकांनी, म्हणजेच ०.८४ टक्क्यांनी घसरून २४,१७३.०५ वर स्थिरावला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक ८१९.४५ अंकांनी, म्हणजेच १.४३ टक्क्यांनी घसरून ५६,३०५.०० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest) 

आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार इन्फोसिस, टाटा कॅपिटल, अदानी एनर्जी सोल्युशन्स, सायंट, एलटीआयमाइंडट्री, सिप्ला, इंडियन एनर्जी एक्सचेंज, महिंद्रा लॉजिस्टिक्स, यूटीआय असेट मॅनेजमेंट कंपनी या शेअर्सवर लक्ष ठेऊ शकतात. निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आजच्या व्यवहारात खरेदी करण्यासाठी पाच शेअर्सची शिफारस केली आहे. राजा व्यंकटरमण यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, मॅनकाइंड फार्मा लिमिटेड, कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड, साई लाईफ सायन्सेस लिमिटेड आणि गरवारे हाय-टेक फिल्म्स लिमिटेड यांचा समावेश आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी साई लाईफ सायन्सेस, ब्लॅक बॉक्स, नोसिल, प्रिवी स्पेशालिटी केमिकल्स आणि ग्रॅन्युल्स इंडिया या पाच शेअर्सची शिफारस केली आहे.

Bhujia King : ‘भुजिया किंग’चा प्रवास इथेच थांबला! कोट्यवधींचे साम्राज्य उभं करणारे प्रसिद्ध शिवरतन अग्रवाल यांचे निधन

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी किंवा विक्री करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, नोसिल आणि कोलपाल यांचा समावेश आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज , श्रीराम फायनान्स, इंडसइंड बँक, अदानी ग्रीन एनर्जी, कॅन फिन होम्स, चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन, डीसीबी बँक, हिंदुस्तान झिंक, लोढा डेव्हलपर्स, एल अँड टी फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस, मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स, सुप्रीम पेट्रोकेम, टॅनला प्लॅटफॉर्म्स आणि झेनसार टेक्नॉलॉजीज आज त्यांच्या तिमाही कमाईची घोषणा करणार आहेत.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market today sensex nifty likely to stay volatile amid global cues and oil price surge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

तबाही… Share Market मध्ये तुफानाचे संकेत, अमेरिकन बाजारात मोठी घसरण; आता भारताचा नंबर?
1

तबाही… Share Market मध्ये तुफानाचे संकेत, अमेरिकन बाजारात मोठी घसरण; आता भारताचा नंबर?

CJP Protest : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे शेअर बाजारात धाकधूक? गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
2

CJP Protest : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे शेअर बाजारात धाकधूक? गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?

Rupee vs Dollar : RBI च्या ब्रह्मास्त्राचा जलवा! डॉलरच्या नाकावर टिच्चून रुपयाची झेप, एकाच दिवशी तब्बल ‘इतका’ भाव वधारला
3

Rupee vs Dollar : RBI च्या ब्रह्मास्त्राचा जलवा! डॉलरच्या नाकावर टिच्चून रुपयाची झेप, एकाच दिवशी तब्बल ‘इतका’ भाव वधारला

Share Market Today: शेअर बाजारात आज होणार मोठी उलथापालथ; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा
4

Share Market Today: शेअर बाजारात आज होणार मोठी उलथापालथ; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.